- Home/
- Maharashtra State Exams (MPSC)/
- Article
एमपीएससी प्रकाश – Light for MPSC State Exam in Marathi
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023

Light for MPSC exams / महाराष्ट्राची ‘जलप्रणाली 2021: भौतिकशास्त्र हा MPSC च्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचा विषय आहे. राज्य सेवा परीक्षेत जवळपास यावर सहा ते सात प्रश्न येतात, तसेच एमपीएससी कम्बाईन एक्झाम मध्ये या घटकावर तीन ते चार प्रश्न येतात , पोलीस भरती, आरोग्य विभाग यांसारख्या सर्वच परीक्षांमध्ये भौतिकशास्त्र या विषयांवर प्रश्न येतात. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
Table of content
प्रकाश (Light)
आरसा (गोलीय):
अंतवर्क आरसा
बर्हिवर्क आरसा
वक्रता मध्य (Centre of Curvature):
- गोलीय आरसाचा जो गोलाचा भाग आहे, त्याच्या केंद्र बिंदूला वक्रता मध्य म्हणतात.
ध्रुव (P – Pole):
- गोलीय आरसाच्या मध्य बिंदूला ध्रुव म्हणतात.
मुख्य अक्ष (Principle Axis):
- आरसाचा ध्रुव आणि वक्रतामध्य यांमधून जाणा-या सरळ रेषेला मुख्य अक्ष म्हणतात.
नाभी (F – Focus):
- गोलीय आरसाच्या मुख्य अक्षाला संमांतर येणारे किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षाच्या ज्या बिंदू जवळ एकत्र येतात, त्या बिंदूला त्या आरशाची नाभी म्हणतात.
नाभीय अंतर (f – Focal Length):
- नाभी व ध्रुव यामधील अंतराला नाभीय अंतर म्हणतात.
- कोणत्याही गोलीय आरसाची focal length त्याच्या Radius च्या निम्मी असते. i.e. f= R/2
वक्रता त्रिज्या ( R – Radius of curvature):
- वक्रता मध्य व ध्रुव यामधील अंतराका Radius of Curvature असे म्हणतात.
- त्रिज्या नाभीय अंतराच्या दुप्पट असते. i.e R = 2f
गोलीय आरश्याचे सांकेतिक चिन्ह (Sign Convention)
- गोलीय आरसावरील सर्व अंतरे ध्रुवापासून मोजतात.
- वस्तू नेहमी आरश्याच्या डाव्या बाजूला ठेवतात.
- ध्रुवापासून डावीकडील सर्व अंतरे Negative मोजली जातात.
- वस्तू नेहमी डाव्या बाजूला ठेवत असल्यामुळे वस्तूचे अंतर नेहमी Negative असते.
- गोलीय आरशाच्या डाव्या बाजूकडील सर्व अंतरे Positive मोजली जातात.
- टिप्पणी-
- अंतवर्क आरश्यामध्ये नाभीय अंतर उजव्या बाजूने मोजतात, म्हणून नाभीय अंतर Negative मोजले जाते.
- बर्हिवर्क आरश्यामध्ये नाभीय अंतर डाव्या बाजूने मोजतात, म्हणून नाभीय अंतर Positive मोजले जाते.
- भिंग (Lens)
बहिर्वक्र भिंग (Convex Lens – Converging Action)
अंतर्वक्र भिंग (Concave Lens – Diverging Action)
वक्रता मध्य (C1, C2 )
- भिंगाचे जे दोन गोलाचे भाग आहेत, त्यांच्या केंद्र बिंदूला वक्रता मध्य म्हणतात.
मुख्य अक्ष (Principle Axis)
- दोन्ही वक्रता मध्यातून जाणाऱ्या सरळ रेषेला मुख्य अक्ष म्हणतात.
प्रकाशिय मध्य (Optical Centre)
- भिंगाच्या मध्य बिंदूला प्रकाशिय मध्य म्हणतात.
मुख्य नाभी (Principle focus)
- जेव्हा अपाती किरण मुख्य अक्षाला समांतर येतो व भिंगावरील अपवर्तनानंतर मुख्य अक्षाच्या ज्या बिंदूला छेदतो, त्या बिंदूला मुख्य नाभी म्हणतात.
नाभीय अंतर (focal length)
- प्रकाशिय मध्य व नाभी यामधील अंतराला नाभीय अंतर म्हणतात.
भिंगाचे सांकेतिक चिन्ह (Sign Convention)
- भिंगामध्ये कोणतेही अंतर प्रकाशिय मध्यापासून (from O) मोजतात.
- भिंगाच्या डावीकडील सर्व अंतरे (-ve) Negative, तर उजवीकडील सर्व अंतरे (+ve) Positive मोजले जातात.
- वस्तु नेहमी भिंगारथा डाव्याबाजूला ठेवली जाते, म्हणून वस्तूचे अंतर नेहमी Negative मोजले जाते.
- वस्तू नेहमी सुलट ठेवली जाते, म्हणून वस्तूची उंची positive मोजतात.
- टिपण्णी:
- बहिर्वक्र भिंगांचे नाभीय अंतर Positive असते, कारण तो उजव्या बाजूला मोजतात.
- अंतर्वक्र भिंगांचे नाभीय अंतर Negative असते, कारण तो डाव्या बाजूला मोजतात.
- परावर्तन (Reflection)
- जेव्हा प्रकाशकिरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या अपारदर्शक माध्यमात प्रवेश करतो, तेव्हा तो त्याच माध्यमात पुन्हा परत येतो. प्रकाशाच्या या गुणधर्मास परावर्तन म्हणतात.
- परावर्तनामध्ये अपाती कोण व परावर्तीत कोण हा एक सारखा असतो. i.e. i=r
- अपवर्तन (Refraction)
- प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसन्या पारदर्शक माध्यमात जाताना आपली दिशा बदलतो. या दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात.
- वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो, त्यामुळे माध्यम बदलनाना प्रकाशकिरण आपली दिशा बदलतो.
- काचेच्या चिपेतून प्रकाशाचे दोन वेळा अपवर्तन होते.
1.पहिला अपवर्तन
- प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना पहिले अपर्वतन होने – काचेच्या वरच्या भागाने.
- जेव्हा प्रकाशकिरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो, तेव्हा तो Normal कडे झुकतो.
- जेव्हा प्रकाशकिरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो, तेव्हा अपाती कोण हा अपवर्तीत कोणापेक्षा मोठा असतो. या प्रकारात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या अपवर्तनांका पेक्षा जास्त असतो.
- दुसऱ्या माध्यमान्चा अपवर्तनांक जेवढा जास्त असेल, प्रकाशकिरण तेवढा स्तंभिकेकडे झुकतो.
- दुसरा अपवर्तन
- काचेच्या चिपेचे दुसरे अपवर्तन प्रकाशकिरण घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना काचेच्या खालच्या भागावर होते.
- जेव्हा प्रकाशाकिरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो, तेव्हा तो Normal पासून दूर जातो
- या प्रकारांत अपती कोण पेक्षा अपवर्तीत कोण मोठा असतो.
- या ठिकाणी पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक ज्यस्त दुसन्या माध्यमाच्या अपवर्तनांकापेक्षा जास्त असतो.
- या मध्ये पहिल्या माध्यमाची अपवर्तनांकाची किंमत जेवढी जास्त असते, तेवढा जास्त प्रकाशकिरण Normal पासून दूर जातो.
अपवर्तनांक (Refractive Index)
- प्रकाधाकिरण वेगवेगळ्या माध्यमातून जाताना त्यांच्या दिशेतील बदलाचे हमाण वेगवेगळे असते
- ते प्रमाण माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असतात.
- वेगवेगळ्या माध्यमांचा अपवर्तनांक वेगवेगळा असतो, म्हणून वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाची दिशा वेगवेगळी असते..
- पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसन्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असणारे गुणोत्तर होय.
पदार्थ |
अपवर्तनांक |
हवा |
1.003 |
बर्फ |
1.31 |
पाणी |
1.36 |
Alcohol |
1.44 |
Benzene |
1.52 |
हिरा |
2.42 |
- अपस्करण (Dispersion)
- प्रकाशाचे एका पांढऱ्या रंगानून (Colourless) सात वेगवेगळ्या रंगामध्ये विभक्तीकरण होण्याच्या नैसर्गिक घटनेस अपस्करण (Dispersion) म्हणतात.
- तरंगलांबी नुसार उत्तरात (decreasing) क्रम: R, O, Y, G, B, I, V
- वारंवारते नुसार चढता (increasing) क्रम: R, O, Y, G, B, I, V
Que. खालील विधाने विचारात घ्या :
(a) प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो.
(b) वेगवेगळ्या माध्यमामधे प्रकाशाचा वेग वेगवेगळ्य असतो. (MPSC Subordinate Prelim-2019)
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा:
(1) विधान (a) सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण (b) हे होय.
(2) विधाने (a) व (b) दोन्ही सत्य आहेत पण (b) हे त्याचे योग्य स्पष्टीकरण नाही.
(3) विधान (a) सत्य आहे व (b) असत्य आहे.
(4) विधाने (a) व (b) दोन्ही असत्य आहेत.
(तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या)
अधिक माहितीसाठी PDF डाउनलोड करा,येथे क्लिक करा.
प्रकाश, डाउनलोड PDF मराठीमध्ये
To access the content in English, click here
Light
More From Us:
MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
NCERT Books for MPSC State Exam 2021
Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य
