- Home/
- Maharashtra State Exams (MPSC)/
- Article
महाराष्ट्राची जलप्रणाली/ Drainage System of Maharashtra for MPSC in Marathi
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023

महाराष्ट्राची ‘जलप्रणाली: कोणत्याही प्रदेशातील मुख्य नदी, तिला मिळणाऱ्या उपनद्या, उपनद्यांना मिळणाऱ्या सहाय्यक नद्या व सहाय्यक नद्यांना मिळणारे नाले ओढे या सर्व लहान मोठ्या प्रवाहांचा वाहण्याचा जो विशिष्ट क्रम असतो त्या प्रवाहाच्या जाळ्याला ‘जलप्रणाली’ असे म्हणतात. आजच्या लेखात आपण महाराष्ट्रातील जलप्रणाली विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या लेखाची पीडीएफ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकतात.
Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.
Table of content
महाराष्ट्राची ‘जलप्रणाली’
कोणत्याही प्रदेशातील मुख्य नदी, तिला मिळणाऱ्या उपनद्या, उपनद्यांना मिळणाऱ्या सहाय्यक नद्या व सहाय्यक नद्यांना मिळणारे नाले ओढे या सर्व लहान मोठ्या प्रवाहांचा वाहण्याचा जो विशिष्ट क्रम असतो त्या प्रवाहाच्या जाळ्याला ‘जलप्रणाली’ असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध वैशिष्ट्ये आहेत आणि महाराष्ट्र चा भौगोलिक प्रदेश सुद्धा याला अपवाद नाही. महाराष्ट्राचा प्रदेश हा विविधतेने नटलेला आहे. येथील भौगोलिक वैशिष्टयांमुळे महाराष्ट्रातील नदीप्रणालीला विशिष्ट आकार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रात विविध प्रकारची जलप्रणाली आढळते. हा घटक MPSC राज्यसेवा, MPSC संयुक्त , MPSC CDPO, MPSC गट क आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
- वृक्षाकार जलप्रणाली: या प्रकारात प्रमुख नदी व तिला मिळणाऱ्या उपनद्या यांचा विकास वृक्षाच्या मुळाप्रमाणे झालेला दिसतो. उदा. गोदावरी, भीमा.
- समांतर जलप्रणाली: एखाद्या प्रदेशात एकाच दिशेने उतार असल्यामुळे या उतारावरून वाहणाऱ्या नद्या एकमेकांना समांतर असतात. उदा. कोकणातील नद्या .
- केंद्रत्यागी जलप्रणाली: या पर्वतावरून उगम पावणाऱ्या नद्यांचे प्रवाह एका उंच केंद्राकडून सर्व दिशांना वाहत जातात . उदा. महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या नद्या.
- अनिश्चित जलप्रणाली: जेथे लहान मोठे सरोवरे, तलाव असतात तेथे नद्या विशिष्ट असा प्रवाह तयार करू शकत नाहीत. जलप्रणालीचा हा एक नद्यांचा समन्वय नसणारा प्रकार आहे. मुख्यतः भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आढळून येतात.
महाराष्ट्रातील नदीप्रणाली
सह्याद्री पर्वताला प्रमुख जलविभाजक मानून महाराष्ट्रातील नदीप्रणालीचे दोन विभाग पडतात:
१. पूर्व वाहिनी नद्या, उदा. गोदावरी, कृष्णा.
२. पश्चिम वाहिनी नद्या, उदा. नर्मदा, तापी आणि कोकणातील नद्या
महाराष्ट्र नदी-बेसिन नकाशा
महाराष्ट्रातील नद्यांची खोरे
महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत आणि पठारावरील इतर निरनिराळ्या पर्वत रांगामुळे मुख्यतः नद्यांची ४ खोरे आढळून येतात.
- गोदावरी खोरे
- कृष्णा आणि भीमा खोरे
- तापी-पूर्णा खोरे
- कोकणातील नदी खोरे
1. गोदावरीचे खोरे
गोदावरी:
- गोदावरीचा उगम मध्य भारतात पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथे होतो आणि १,४६५. किमी वाहून हि नदी आंध्र प्रदेशमध्ये बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. ही नदी महाराष्ट्रात 668 किमी वाहते. लांबी, पाणलोट क्षेत्र आणि प्रवाह या दृष्टीने गोदावरी ही भारतीय द्वीपकल्पावरील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरीचे खोरे सुमारे ३,१२,८१२ चौ.कि.मी.पर्यंत पसरलेले आहे, ज्यात महाराष्ट्राने 49% (१,५३,७७९ चौ.कि.मी.) व्यापले आहे. ही महाराष्ट्राव्यतिरिक्त, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओरिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते.
- गोदावरीला खालच्या भागात पावसामुळे पुराचा सामना करावा लागतो. राजामुंद्री नंतर गोदावरी विविध शाखा मध्ये विभागली जाते. ज्यामुळे मोठा त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. ही नदी ‘पवित्र नदी’ म्हणून मानली जाते. गोदावरीच्या आकार व विशालतेमुळे तिला ‘वृद्ध गंगा किंवा दक्षिणा गंगा’ असेही संबोधले जाते. तिला उजव्या तीराने प्रवरा, सिंदफणा, दारणा, मुळा, बोर, बिंदुसरा, कुंडलिका आणि डाव्या तीराने कादवा, शिवणा, पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती, या उपनद्या मिळतात. गोदावरीचा प्रवाह नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या महाराष्ट्रातील जिल्ह्यातून जातो.
गोदावरीच्या महत्वाच्या उपनद्या
- मांजरा : या नदीचा उगम बालाघाट डोंगर रांगेत बीड जिल्ह्यातील पाटोद्याजवळ होतो. हि नदी ७२४ कि.मी. वाहत जाऊन कुंडलवाडीजवळ गोदावरीस मिळते.
- पूर्णा : या नदीचा उगम अजिंठा पर्वत रांगेत होतो. हि नदी २७४ कि.मी. वाहत जाऊन कंठेश्वर येथे गोदावरीस मिळते.
- वर्धा : ही नदी सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिण उतारावर उगम पावते. या नदीचा प्रवाह सामान्यतः दक्षिण उत्तर असून तिचा महाराष्ट्रातील प्रवाह ४५५ कि.मी. आहे.
- वैनगंगा : वैनगंगा ही नदी मैकल पर्वत रांगेत मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकडी जवळ उगम पावते. हि नदी उत्तर-दक्षिण दिशेने ३०० कि.मी. वाहते.
या घटकाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करा:
महाराष्ट्राची जलप्रणाली, Download PDF मराठीमध्ये
To access the article in English, click here:
Drainage System of Maharashtra
mportant Subject Links
More From Us:
Maharashtra Static GK
MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English
Important Government Schemes For MPSC
NCERT Books for MPSC State Exam 2022
Maharashtra State Board Books PDF
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
Download BYJU’S Exam Prep App
