- Home/
- Maharashtra State Exams (MPSC)/
- Article
यूरोपीयनांचे भारतातील आगमन/ Arrival of Europeans in India in Marathi, MPSC History Notes PDF
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023

1453 साली ऑटोमन तुर्कस्तानने बायझेन्टाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टन्टिनोपाल (आताचे इस्तंबूल) हे शहर जिंकल्याने भारत-युरोप यांमधील ‘इराणचे आखात-कॉन्स्टन्टिनोपाल-इटली’ हा खुष्कीचा व्यापारी मार्ग बंद झाला.परिणामी भारताकडे जाणाऱ्या नव्या व्यापारी मार्गांचा अथवा समुद्रमार्गांचा शोध लावणे युरोपियनांना क्रमप्राप्त ठरले. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आजच्या या लेखात आपण विविध युरोपियनांचे भारतात कशाप्रकारे आगमन झाले ते आता आपण बघणार आहोत.
Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.
Table of content
यूरोपीयनांचे भारतातील आगमन
युरोपियन कंपन्यांच्या स्थापनेचा क्रम
क्रम |
युरोपियन कंपन्या |
वर्ष |
1 |
पोर्तुगीज |
1498 |
2 |
इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी |
1600 |
3 |
डच ईस्ट इंडिया कंपनी |
1602 |
4 |
फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी |
1664 |
पोर्तुगीज
- वास्को द गामा:वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला. तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत या बंदरात 20 मे 1498 रोजी उतरला. कालिकतचा हिंदू राजा झामोरीनने त्याचे स्वागत केले.
- पोर्तुगीज वसाहती – पश्चिम किनाऱ्यावर कोचीन, गोवा, दमन, चोल (1531), दीव (1532) साष्टी/ सालसेट व वसई (1534) इत्यादी.
- गव्हर्नर: 1505 ला फ्रान्सिस्को डी अल्मेडा याला भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले. 1509 ला अल्फान्सो डी अल्बुकर्क हा दुसरा गव्हर्नर झाला. त्याने 1510 मधे विजापूरच्या आदिलशाहकडून गोवा जिंकून घेतले.
डच
- मार्च 1602 मधे हॉलंडमधील काही व्यापाऱ्यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.
- 1759 मध्ये बेदाराच्या लढाईत डचांचा इंग्रजांकडून पराभव झाला आणि करारानुसार, डचांनी इंडोनेशियावर आणि ब्रिटीशांवर भारत, श्रीलंका आणि मालेवर नियंत्रण मिळवले.
- वसाहती: त्यांनी 1605 मध्ये मसुलीपट्टनम येथे त्यांचा पहिली वसाहत उभारला. त्यांचे इतर वसाहती पुलीकट, चिनसुरा, पाटणा, बालासोर, नागा पट्टणम, कोचीन, सुरत, कारिकल आणि कासिमबाजार येथे होते.
इंग्रज
- 1599 मधे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.इंग्लंडची राणी एलिझाबेथने या कंपनीला 31 डिसेंबर 1600 मध्ये सनद देऊन पुढील 15 वर्षांसाठी भारतासहित पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा एकाधिकार दिला.
- इंग्रजांची भारतातील पहिली वखार 1611 मधे मसलीपट्टणम येथे स्थापन झाली होती.मुघल बादशाह जहांगीरने 1613 मध्ये सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी दिली.
- इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याचा राजदूत म्हणून 1615 मधे सर थॉमस रो जहांगीरच्या दरबारात आला व तेथे तो 1618 पर्यंत थांबला या काळात अनेक ठिकाणी व्यापारी वसाहती स्थापन करण्याच्या परवानग्या त्याने मिळवल्या.
- 1717 मध्ये, जॉन सुरमनने फारुखसियारकडून एक फरमान मिळवला, ज्याने कंपनीला मोठ्या सवलती दिल्या. या फार्मनला कंपनीचे मॅग्ना कार्टा म्हटले गेले आहे.
- प्लासीची लढाई (1757): इंग्रजांनी बंगालचा नवाब सिराजुद्दौलाचा पराभव केला.
- बक्सरची लढाई (1764) : कॅप्टन मुनरोने मीर कासिम (बंगाल), शुजाउद्दौला (अवध) आणि शाह आलम दुसरा (मुघल) यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला.
फ्रेंच
- 1664 मध्ये फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. फ्रेंचाची भारतातील पहिली वसाहत 1668 मध्ये केरॉन नेमण्यात याने सुरत येथे स्थापन केली. 1669 मध्ये मसलीपट्टणम येथे वसाहत येथे स्थापन केली.
- 1673 मधे मार्टिन व लेस्पी यांनी वालीकोंडपुरमच्या मुघल गव्हर्नरकडून एक गाव मिळवले हेच गाव पुढे पाँडिचेरी म्हणून विकसित झाले. मार्टिनला पहिला गव्हर्नर नेमण्यात आले.
- 1690 मध्ये फ्रेंचांनी मुघलांकडून बंगालमधील चंद्रनगर मिळविले. 1725 मध्ये माहे व यानम व 1739 मध्ये कारीकल मिळविले.
- 1742 मध्ये डूप्ले हा फ्रेंच गव्हर्नर म्हणून भारतात आला.
अधिक माहितीसाठी PDF Download करा,येथे क्लिक करा:
यूरोपीयनांचे भारतातील आगमन,Download PDF मराठीमध्ये
To access the content in English, click here:
Arrival of Europeans in India
Important Subject Links
More From Us:
Maharashtra Static GK
MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English
Important Government Schemes For MPSC
NCERT Books for MPSC State Exam 2022
Maharashtra State Board Books PDF
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
Download BYJU’S Exam Prep App
