hamburger

River system in Maharashtra in Marathi/ महाराष्ट्रातील नदीप्रणाली गोदावरी, Download PDF

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

महाराष्ट्रात अनेक नद्यांचा उगम होतो आणि या नद्यांमुळे महाराष्ट्रातील जीवन प्रणालीवर सुद्धा खूप मोठा प्रभाव पडतो.आजच्या लेखात आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली या विषयी सामान्य माहिती बघणार आहोत तसेच गोदावरी नदी विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.यात आपण गोदावरी नदीचा उगम गोदावरीच्या उपनद्या संगम स्थळे काठावरची शहरे इत्यादी यादी बघणार आहोत.

In today’s article, we will look at the general information about the river system in Maharashtra as well as the complete information about the Godavari river. Download the PDF of the Maharashtra river system in Marathi.

Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

Important Links for MPSC Rajyaseva (State Services) Prelims Exam 21 August 2022 –

महाराष्ट्रातील नदीप्रणाली- गोदावरी /River system in Maharashtra

भारतात साधारणपणे दोन प्रकारच्या नद्या आहेत, म्हणजे

 1. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या
 2. पठाराच्या नद्या

\

महाराष्ट्राची नदी प्रणाली साधारणपणे 4 प्रकारांमध्ये विभागली जाऊ शकते.

दिशा 

नद्या 

पूर्व 

गोदावरी,भीमा,कृष्णा,कोयना,पंचगंगा,पैनगंगा

पश्चिम 

तापी, पूर्णा, नर्मदा, उल्हास, वैतरणा, सावित्री, वशिष्ठी

उत्तर 

वाघूर, गिरणा, पांझरा, काटेपूर्णा, मोरणा

दक्षिण 

वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती

महाराष्ट्रातील नदी खोरे/River Basins in Maharashtra

महाराष्ट्रातील जलप्रणाली व सह्याद्री पश्चिम घाटाचा प्रमुख प्रभाव दिसून येतो.

खाली दिलेल्या सारणी मध्ये महाराष्ट्रातील नदी खोरे व त्यांनी व्यापलेले क्षेत्र दाखवण्यात आलेले आहे.

\

The table below shows the river basins in Maharashtra and the areas covered by them

No

नदीखोरे 

व्यापलेले क्षेत्रे (%)

1

गोदावरी 

49.5

2

भीमा + कृष्णा 

22.6

3

तापी + पूर्णा 

16.7

4

कोकणातील नद्या 

10.7

5

नर्मदा 

0.5

 

एकूण व्यापलेले क्षेत्रे 

100

गोदावरी नदीखोरे / Godavari river basin

\

 • गोदावरी भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. या नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. गोदावरी नदीची लांबी 1,450 किमी (900 मैल) आहे.
 • साधारणपणे आग्नेय दिशेने वाहणारी गोदावरी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री जवळ बंगालच्या उपसागराला मिळते.
 • राजमुंद्रीपासून 10 किमी अंतरावर आणि समुद्रात पोहोचण्यापूर्वी 80 किमी अंतरावर दोन उपनद्यांमध्ये विभागली जाते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठ नदी म्हणतात.
 • गोदावरीतील पाणी हंगामानुसार बदलते. जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यांत नदीतून वाहणारे सुमारे 80% पाणी वाहून जाते.
 • पाण्यामुळे गोदावरी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशची जीवनरेखा मानली जाते. ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते.
 • त्याचबरोबर नांदेड शहर गोदावरीची नाभी-स्थान म्हणून ओळखले जाते.
 • नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नांदेडचा समुद्रकिनारा, उर्वशी समुद्रकिनारा इत्यादी ठिकाणी स्नान करणे खूप महत्वाचे आहे.

\

The general information about the Godavari river is given in the following table.

उगम 

 • ब्रह्मगिरी पर्वत, त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा

लांबी 

 • एकूण लांबी : 1450 KM
 • महाराष्ट्रातील लांबी : 668 KM

क्षेत्रफळ 

 • एकूण क्षेत्रफळ : 3,13,389 चौ.किमी
 • महाराष्ट्रातील क्षेत्रफळ: 1,52,588 चौ.किमी

राजकीय विस्तार 

 • नाशिक, नगर, जालना, बीड परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्हे

भौगोलिक वैशिष्ट्ये

 • उगमाजवळ अतिशय वेगवान 
 • नदीत रांजण, खळगे तयार झालेली आहेत
 • बेसाल्ट  खडकांमुळे खनन कार्य प्रभावी नाही
 • नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कुंभगर्त निर्माण झालेली आहेत

गोदावरीच्या उपनद्या/Tributaries of Godavari

\

गोदावरील उत्तरेकडून (डाव्या बाजू) व दक्षिणेकडून (उजव्या बाजू) येऊन मिळणाऱ्या उपनद्या पासून बनलेली आहे.

 1. उत्तरेकडून येणाऱ्या उपनद्या :प्राणहिता, इंद्रावती, शिवना, दक्षिण पूर्ण, कादवा ,खांब इत्यादी
 2. दक्षिणेकडून येणाऱ्या उपनद्या :मांजरा, प्रवरा, सिंदफणा, दारणा, बिंदुसरा इत्यादी

The table below shows the tributaries coming from the north and the south and their characteristics.

उत्तरेकडून येणाऱ्या उपनद्या

No.

नदी 

वैशिष्टे 

1

शिवना 

 • उगम: सारदगाव, वनी डोंगर रांगांमध्ये 
 • एकूण लांबी: 74 KM
 • प्रवास: निफाड, दिंडोरी (फक्त नाशिक जिल्हा पुरताच) 
 • पालखेड करंजवन प्रकल्प 
 • नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य (रामसर स्थळ)

2

कादवा 

 • उगम: बोलनाथ गाव ,अजिंठा डोंगर
 • प्रवास: नाशिक, औरंगाबाद जिल्हा 
 • लांबी :  110 KM
 • कन्नड तालुक्यात गडदगड धरण 
 • औरंगाबाद मध्ये शिवना येथे प्रकल्प

3

दक्षिण पूर्णा

 • उगम: अजिंठा डोंगर
 • लांबी: 273 Km
 • प्रवास: औरंगाबाद, बुलढाणा, जालना व परभणी 
 • प्रकल्प : खडकपूर्णा, येलदरी, सिद्धेश्वर 
 • उपनद्या:  धामणा. खेळणा, अंजना, गिरीजा,जीवनरेखा, कापरा, दुधना

4

दुधना 

 • उगम : वेरूळ  डोंगर
 • लांबी: 175 KM
 • प्रवास:  औरंगाबाद, जालना, परभणी
 • उपनद्या:  कल्याण, कुंडलिका, सुकना,कसुरा इ.

5

इंद्रावती 

 • उगम: कालाहंडी ,ओडिशा 
 • प्रवास: ओडिसा ,छत्तीसगड, महाराष्ट्र 
 • एकूण लांबी : 535 KM
 • महाराष्ट्रातील लांबी : 129 KM
 • नदीवर चित्रकूट धबधबा

6

प्राणहिता 

 • उगम: चपराळा
 • लांबी : 120 KM
 • वर्धा-वैनगंगा चा एकत्रित प्रवाह म्हणजे प्राणहिता

दक्षिणेकडून येणाऱ्या उपनद्या

No

नद्या 

वैशिष्टे 

1

सिंदफणा

 

 • उगम: पाटोदा तालुका, बीड जिल्हा 
 • लांबी: 122 KM
 • माजलगाव प्रकल्प 
 • प्रवास: शिरूर कासार, माजलगाव तालुक्यात (बीड फक्त)

2

दारणा

 • उगम: कुलगिरीदुर्गा जवळ ,इगतपुरी, जिल्हा नाशिक 
 • उपनद्या: वाकी, बालदेवी, कडवा
 • लांबी: 88 KM

3

 प्रवरा

 

 • उगम: अकोले तालुका. अहमदनगर
 • लांबी: 208 KM
 • नदीवर भंडारदरा धरण (विल्सन बंधारा) आहे 
 • उपनद्या : मुळा व आढळा 
 • प्रवास: अकोले, संगमनेर, श्रीरामपूर व नेवासा तालुके (फक्त अहमदनगर जिल्हा)

4

मांजरा

 

 • उगम: पाटोदा तालुका, बीड,बालाघाट डोंगर रांगा
 • लांबी: 724 KM
 • प्रकल्प: निजामसागर
 • लातूर हे शहर या नदीकाठी वसलेले आहे.
 • प्रवास: महाराष्ट्र ,कर्नाटक, तेलंगणा
 • उपनद्या: तावरजा, तेरणा, केज, रेना, लिंबा, चौसाळा, धरणी, लेंडी, मन्याड 

5

बिंदुसरा

 • सिंदफणा ची उपनदी उजव्या बाजूने
 • उगम: मांजरसुभा गाव, बालाघाट डोंगर 
 • या नदीकाठी बीड शहर वसलेले आहे
 • पाली प्रकल्प

गोदावरी खोऱ्यातील नदी व लांबी यांची यादी

The table below gives the rivers of the Godavari river basin and their length in Maharashtra.

No.

नदी

महाराष्ट्रातील लांबी

1

मांजरा

724 किमी (3 राज्ये मिळून)

2

कादवा

74 किमी

3

दारणा

88 किमी

4

तावरजा

50 किमी

5

गोदावरी

668 किमी

6

सिंदफणा

122 किमी

7

प्रवरा

208 किमी

8

लेंडी

80 किमी

9

मन्याड

225 किमी

10

दक्षिण पूर्णा

273 किमी

11

मूळा

35 किमी

12

शिवना

110 किमी

नदी संगमस्थळे/River Confluence

The table below gives the tributaries of the river Godavari and their confluence

No

मूळ नदी

येऊन मिळणारी नदी

संगम स्थळाचे नाव

जिल्हा

1

गोदावरी

मांजरा

कुंडलवाडी

नांदेड

2

गोदावरी

कादवा

नांदूर-मध्यमेश्वर

नाशिक

3

गोदावरी

खाम

जोगेश्वरी

औरंगाबाद

4

गोदावरी

शिवना

धारेगाव

औरंगाबाद

5

गोदावरी

दारणा

सायखेडा

नाशिक

6

गोदावरी

द.पूर्णा

कोठेश्वर

परभणी

7

गोदावरी

इंद्रावती

सोमनूर

गडचिरोली

8

गोदावरी

प्राणहीता

नगरम

सिरोंचा

9

गोदावरी

प्रवरा

टोके

अहमदनगर

10

गोदावरी

सिंधफणा

पाचेगाव

अहमदनगर

11

प्रवरा

मुळा

मंजरथ

बीड

12

दुधना

दुधना

हट्टागाव

परभणी

गोदावरी काठावरील शहरे/Cities on the banks of Godavari

खाली दिलेल्या सारणी मध्ये गोदावरी नदीच्या काठावरील शहरे व जिल्हे यांची यादी देण्यात आलेली आहे.
The table below lists the towns and districts on the banks of the river Godavari.

No.

नदी

काठावरील शहर

जिल्हे

1

गोदावरी

गंगापूर

नाशिक

2

गोदावरी

जायकवाडी

औरंगाबाद

3

गोदावरी

विष्णुपुरी

नांदेड

4

गोदावरी

बाभळी

नांदेड

5

मांजरा

मांजरा

बीड

6

प्रवरा

निळवंडे

अहमदनगर

7

प्रवरा

भंडारदरा

अहमदनगर

8

शिवना

अंबाडी

औरंगाबाद

9

शिवना

शिवना

औरंगाबाद

10

पूर्णा

येलदरी

हिंगोली

11

सिंदफणा

माजलगाव

बीड

12

सिंदफणा

सिंदफणा

बीड

13

कादवा

नांदूरमध्यमेश्वर

नाशिक

14

पूर्णा

सिद्धेश्वर

परभणी

15

गिरजा

गिरजा

औरंगाबाद

16

मुळा

मुळा

अहमदनगर

17

दारणा

दारणा

नाशिक

18

वाण

वाण

बीड

19

कापरा

कापरा

परभणी

20

कुंडलिका

कुंडलिका

बीड

या घटकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा:

महाराष्ट्रातील नदीप्रणाली गोदावरी,Download PDF मराठीमध्ये

Important Marathi Articles

अशाच पद्धतीचे लेख बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:

Important Subject Links

एमपीएससी महाराष्ट्रातील प्रशासकीय एकके- Administrative Units of Maharashtra for MPSC in Marathi

महाराष्ट्राचा भूगोल एमपीएससी परीक्षा- Geography of Maharashtra for MPSC in Marathi

Geography of Maharashtra Study Notes for MPSC Exam

एमपीएससी भारतीय राज्यघटनेची निर्मिती- Making of the Indian Constitution for MPSC in Marathi

एमपीएससी संविधानाची ऐतिहासिक उत्क्रांती- Historical Evolution of the Constitution in Marathi

एमपीएससी यूरोपीयनांचे भारतातील आगमन- Arrival of Europeans in India for MPSC in Marathi

एमपीएससी विद्युतधारा- Current Electricity for MPSC State Exams in Marathi

Current Electricity Study Notes for MPSC State Exam

More From Us:

Maharashtra Static GK 

MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English

Important Government Schemes For MPSC 

NCERT Books for MPSC State Exam 2022

Maharashtra State Board Books PDF

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Download BYJU’S Exam Prep App

River system in Maharashtra in Marathi/ महाराष्ट्रातील नदीप्रणाली गोदावरी, Download PDF Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF’s & more, Join our Telegram Group Join Now
Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium