- Home/
- Maharashtra State Exams (MPSC)/
- Article
महाराष्ट्र पोलीस भरती अपडेट 2021 – Latest मराठीत पोलीस भरती News
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023
पोलीस भरती 2019 मधील विविध पदांसाठी आवेदन केलेल्या उमेदवारांना कळविण्यांत – येते की दिनांक 30/07/2021 रोजी पोलीस कार्यालयातर्फे शुध्दीपत्रक देण्यात आले आहे. त्यामध्ये उमेदवारांना त्यांच्या पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत कळविण्यात आले होते. तसेच पासवर्ड सर्व उमेदवारांना बदलणे गरजेचे आहे.अधिक माहितीसाठी पुढे दिलेली माहिती वाचा.
Table of content
Maharashtra Police Bharti 2021 : Latest Update/महाराष्ट्र पोलीस भरती 2021
पोलीस भरती 2019 मधील विविध पदांसाठी आवेदन केलेल्या उमेदवारांना कळविण्यांत – येते की दिनांक 30/07/2021 रोजी पोलीस कार्यालयातर्फे शुध्दीपत्रक देण्यात आले आहे. त्यामध्ये उमेदवारांना त्यांच्या पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत कळविण्यात आले होते. तसेच पासवर्ड सर्व उमेदवारांना बदलणे गरजेचे आहे. अन्यथा ते पुढील भरती प्रक्रियेत आपले आवेदनपत्र उघडू शकणार नाही. तसेच एसईबीसी (SEBC) च्या उमेदवारांना ‘अराखीव (खुला) किंवा ‘EWS’ यापैकी एक विकल्प देणे गरजेचे आहे. परंतू काही उमेदवारांना त्यांचा Email ID विसरलेला आहे किंवा अन्य कारणास्तव हरविलेला आहे, अशा प्रकारच्या तक्रारिंची दाखल पोलीस कार्यालयाने घेतली आहे.
महत्वाच्या तारखा:
पोलीस कॉन्स्टेबल पोस्ट |
तारीख |
ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख |
03-09-2019 |
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख |
23-09-2019 |
परीक्षेची तारीख |
सप्टेंबर 2021 |
प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख |
परीक्षेच्या तारखेच्या 10 दिवस आधी |
Maharashtra Police Bharti 2021, Download Official Update
त्याअनुषंगाने पुनःश्च असे कळविण्यात येते की ज्या उमेदवारांचे Email ID विसरलेले असतील / लक्षात नसतील किंवा अन्य कारणास्तव उपलब्ध नसतील तर त्यांचा Email अपडेट करण्यासाठी तसेच विकल्प देण्यासाठी सर्व उमेदवारांना दिनांक 22/08/2021 चे रात्री 12 वाजेपर्यंत मुदत वाढवून देण्यात येत आहे. उमेदवारांनी www.mahapolice.gov.in ह्या संकेतस्थळावर जाऊन ‘पोलीस कॉर्नर’ ह्या बटनला क्लीक करुन ‘पोलीस भरती 2019’ येथे क्लीक करावे. संबंधित घटकनिहाय संकेतस्थळावर जाऊन विकल्प दयावा अथवा Email ID / Password बदल करुन घ्यावा.
ईमेल आयडी मध्ये सुधारणा करण्यासाठी खालील प्रमाणे जा.
1) सर्वात आधी www.mahapolice.gov.in येथे क्लिक करा.
2) त्यानंतर उजव्या हाताला कोपऱ्यात तुम्हाला ‘पोलीस कॉर्नर’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
3) त्यानंतर तुम्हाला तिथे एक पेज दिसेल तेथे पुन्हा शेवटी तुम्हाला ‘पोलीस कॉर्नर’ हा पर्याय दिसेल ,त्यावर क्लिक करा.
4) मग तुमच्या समोर एक पेज दिसेल त्यात तुम्ही तुमची LOGIN माहिती भरा.
5) नंतर तुमचा ईमेल आयडी मध्ये सुधारणा करा.
अशा प्रकारे तुम्ही तुमचा ईमेल आयडी मध्ये सुधारणा करू शकतात.
SEBC मधून EWS किंवा अराखीव (खुला) प्रवर्गात बदल करण्यासाठी खाली दिलेल्या क्रमाने जावे.
1) सर्वात आधी https://mhpolicebharti.cbtexam.in/Home/index.aspx या संकेत स्थळावर क्लिक करा.
2) त्यानंतर UNIT NUMBER वर क्लिक करून युनिट निवडा आणि PROCEED वर क्लिक करा.
3) त्यानंतर ‘NEW REGISTRATION’ वर क्लिक करा. त्यात तुमचा युजर आयडी, जन्मतारीख, ईमेल आयडी संबंधित ठिकाणी भरून PROCEED वर वर क्लिक करा.
4) SEND OTP वर क्लिक करून OTP प्रमाणित करून घ्यावा.
5) CHOOSE PASSWORD मध्ये योग्य पासवर्ड टाकून CONFIRM PASSWORD वर क्लिक करा नंतर SET PASSWORD वर क्लिक करून तुमचा पासवर्ड तयार होईल.
6) पुढील पेज छायाचित्र सह संपूर्ण तपशील दर्शवेल. त्यात ‘CATEGORY UPDATE’ वर क्लिक करून तुमचा प्रवर्ग EWS/GENERAL निवडा.
7) नंतर तुम्हाला एक POP-UP दिसेल ते काळजीपूर्वक वाचून OK या बटनावर क्लिक करून SUBMIT करा.
8) फॉर्मची प्रत मिळविण्यासाठी PRINT वर क्लिक करा नंतर बाहेर पडण्यासाठी EXIT वर क्लिक करा.
अंतिम मुदत : 22/08/2021 रात्री 12 वाजेपर्यंत
पोलीस भरती लेखी परीक्षा विषय निहाय अभ्यासक्रम :
विषय |
प्रश्न संख्या |
गुण |
अंकगणित |
25 |
25 |
बुद्धिमत्ता चाचणी |
25 |
25 |
मराठी व्याकरण |
25 |
25 |
चालू घडामोडी व सामान्य ज्ञान |
25 |
25 |
एकूण प्रश्न संख्या: 100 |
एकूण गुण: 100 |
महाराष्ट्र पोलीस भारती परीक्षेशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी :
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2020-21: पात्रता निकष |
|
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा: अभ्यासक्रम |
|
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पद्धती |
|
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा कट ऑफ |
|
महाराष्ट्र पोलीस भारती परीक्षा: मागील वर्षाचे पेपर |
To check in English, click here:
Maharashtra Police Bharti 2021: Latest Update
More From Us: