Maharashtra Police Bharti Exam Do's & Don'ts 2021: महाराष्ट्र पोलीस भरती काय करावे? आणि काय करू नये?

By Ganesh Mankar|Updated : August 29th, 2021

Do and Dont's for the Maharashtra Police Bharti Exam 2021: गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली महाराष्ट्र पोलीस भरती ची तारीख जाहीर झाली आहे. त्यात पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलीस पद व पोलीस वाहन चालक यांचा समावेश होता. नुकत्याच महाराष्ट्र पोलीस भरती 2021 परीक्षेची तारीख जाहीर झाल्या. आणि त्या सोबत नुकतेच पोलीस भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी, येथे क्लिक करा. महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 प्रवेश पत्र

आता परीक्षेला फक्त काही दिवस उरले आहेत, तर या उरलेल्या कालावधीचा कशाप्रकारे परिपूर्ण उपयोग करावा. या परीक्षेत खूप सारे उमेदवार नवीनच असतील. त्यांचा हा प्रथमच अनुभव असेल स्पर्धा परीक्षांविषयी. खूप सारे उमेदवार वर्षभर खूप मेहनतीने तयारी करतात, पण शेवटच्या क्षणाला केलेल्या काही चुकांमुळे त्यांना नुकसान होते.  त्यामुळे या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षासाठी काय करावे? आणि काय करू नये? या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत.

Table of Content

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी काय करावे? आणि काय करू नये?

3 सप्टेंबर 2021 पासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत उमेदवारांनी कोणत्या गोष्टी कराव्या? आणि कोणत्या गोष्टी करू नये? यासंबंधी खालील दोन विभागात उमेदवारांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांचे पालन केल्यास येणाऱ्या परीक्षेत तुमच्याकडून होणाऱ्या चुका टाळता येतील. परीक्षा देताना उमेदवारांनी खालील सूचनांचे पालन केले पाहिजे.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021

अ.क्र.

काय करावे ?

कर करू नये?

1

रिविजन साठी वेळापत्रक बनवणे.

मोबाईल फोन किंवा इतर गॅझेट्स घेऊ नका.

2

प्रश्नपत्रिका सोडवण्याचा क्रम ठरवून घ्या.

घाबरून जाऊ नका.

3

जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे.

तुमच्या तयारीवर शंका घेऊ नका.

4

आधीच प्रवेशपत्राची प्रत घ्या.

उपस्थिती पत्रकात चुका करू नका.

5

काळा बॉलपॉईंट पेनच वापरा.

परीक्षेच्या आधी जास्त जेवण करू नका.

6

परीक्षा स्थळ आधीच बघून ठेवणे.

रात्रभर अभ्यास करणे.

7

साधे घड्याळ घाला.

परीक्षा स्थळ वर उशिरा  जाणे.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी काय करावे?

1. रिविजन साठी वेळापत्रक बनवणे

  • आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाचा परीक्षेच्या शेवटच्या दिवसात व्यवस्थित पुनरावलोकन होणे गरजेचे असते.
  • त्यामुळेच तुम्ही एक वास्तववादी वेळापत्रक बनवा.
  • म्हणजे असे वेळापत्रक ज्याचे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने पालन करणे शक्य होईल.
  • पोलीस भरती परीक्षेत चार विषय आहेत. सर्व विषयांसाठी एक व्यवस्थित वेळापत्रक बनवावे.

2. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा क्रम ठरवून घ्या

  • परीक्षेत शंभर प्रश्न असतील, त्यातील कोणत्या विषयाचे प्रश्न तुम्हाला आधी सोडवायचे ते एकदा ठरवून घ्या.
  • सहसा विद्यार्थ्यांनी ‘सामान्य विज्ञान’ या विषयावरील प्रश्न सोडवले पाहिजेत.
  • अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयापासून सुरुवात करू नका. कारण हे विशेष वेळखाऊ विषय आहेत.
  • त्यामुळे सामान्य अध्ययन आणि नंतर मराठी व्याकरण नंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी असा क्रम विद्यार्थ्यांनी निवडावा.

3. जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे

  • महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत ‘नकारात्मक गुणपद्धती’ नसल्याने उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा.
  • तसेच कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न कसे अचूक पद्धतीने सोडवता येतील याकडे सुद्धा लक्ष द्यावे.

4. आधीच प्रवेशपत्राची प्रत घ्या

  • उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्राची प्रिंटआउट घेणे लक्षात ठेवावे. तुमचा फोटो त्यावर स्पष्टपणे दिसत असल्याची खात्री करा.
  • अन्यथा, कृपया ई-अॅडमिट कार्डसह वैध फोटो ओळखपत्र जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इ.कागदपत्रे सोबत ठेवा.
  • प्रवेशपत्राची प्रत खूप आधीच काढून ठेवणे. कारण खूप सारे ठिकाणी शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद असतात.
  • त्यामुळे परीक्षेच्या वेळेवर प्रत काढण्यापेक्षा खूप आधीच दोन ते तीन प्रत काढून ठेवणे.

5. काळा बॉलपॉईंट पेनच वापरा

  • आपल्याकडे पूर्व परीक्षेसाठी पुरेशी स्टेशनरी असल्याची खात्री करा.
  • लक्षात ठेवा आयोग OMR शीटवर फक्त काळ्या बॉलपॉईंट पेन वापरण्यास परवानगी देतो.
  • पेन्सिल आणि इतर रंगीत पेनला परवानगी नाही. नेहमी आपल्याकडे सुटे पेन आणि रिफिल ठेवा. 
  • जो पेन तुम्ही परीक्षेत वापरणार आहेत, त्याच्यावर थोडा सराव करून ठेवा. कारण परीक्षेत व्यवस्थित पेन नसल्यामुळे तुमचा वेळ वाया जाऊ शकतो.

6. परीक्षा स्थळ आधीच बघून ठेवणे

  • उमेदवारांनी आधीच परीक्षा स्थळ परीक्षेपूर्वी आदल्या दिवशी एकदा बघून येणे.
  • कारण जर परीक्षा स्थळ तुमच्यासाठी नवीन असेल तर ऐनवेळी परीक्षा स्थळ शोधण्यात तुमचा वेळ जाऊ नये. त्यामुळे आदल्या दिवशी परीक्षा स्थळ बघून येणे.
  • उमेदवारांसाठी परीक्षा स्थळ जर  परिचित असेल त्यांनी मात्र आदल्या दिवशी परीक्षा स्थळावर गेले नाही तरी चालणार आहे.
  • तसेच, जर तुम्ही कॅबमध्ये जाण्याची योजना आखत असाल, तर लक्षात ठेवा की कॅबला प्रचंड मागणी असेल आणि म्हणून तुम्ही 10-15 मिनिटांचा बफर ठेवावा.

7. साधे घड्याळ घाला

  • उमेदवारांसाठी अॅनालॉग घड्याळांना परवानगी आहे.
  • एक परिधान करणे उचित आहे जेणेकरून आपल्याला किती वेळ निघून गेला आहे आणि किती शिल्लक आहे याची आपल्याला नेहमी जाणीव होऊ शकते.
  • त्यासाठी इन्व्हिजिलेटरवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
  • कृपया लक्षात ठेवा की स्मार्टवॉच किंवा डिजिटलला परवानगी नाही.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी  काय करू नये?

1. मोबाईल फोन किंवा इतर गॅझेट्स घेऊ नका

  • परीक्षा हॉलमध्ये, मोबाईल फोन किंवा कॅल्क्युलेटर सारख्या गॅझेट्सना सक्त मनाई आहे.
  • म्हणून, ते न बाळगण्याचा प्रयत्न करा.
  • जर तुम्ही मोबाईल घेऊन गेलात, परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बॅगमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा.

2. घाबरून जाऊ नका

  •  काही उमेदवार खूप चांगली तयारी करतात. परंतु परीक्षा स्थळावर पोहोचल्यावर त्यांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होते.
  • त्यामुळे त्यांचे परीक्षेत मन लागत नाही आणि परीक्षा व्यवस्थित जात नाही. उमेदवारांनी न घाबरता परिक्षेला सामोरे गेले पाहिजे.
  • घाबरू नका, तुम्ही अधिकारी किंवा पोलीस होणारच आहेत. फक्त थोडा संयम आणि खंबीर मन ठेवा. शांत आणि तयार मनाने परीक्षा देणे अत्यंत महत्वाचे आहे.
  • जर तुम्ही घाबरलात, तर तुम्ही जे शिकलात ते पुन्हा आठवू शकणार नाही.
  • तुम्ही योग्य आणि तार्किक विचार करू शकणार नाही, जे परीक्षेत चांगले करणे आवश्यक आहे.
  • जर तुम्हाला वाटत असेल की परीक्षा तुमच्या मार्गाने जात नाही, तर सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माहित असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या.
  • जर तुमच्यासाठी हे अवघड असेल, तर बहुतेक इतरांसाठी ते असू शकते. म्हणून, त्यावर घाबरू नका.

3. तुमच्या तयारीवर शंका घेऊ नका

  •  परीक्षा स्थळावर पोचल्यावर खूप सारे उमेदवार आपापसात परीक्षा संदर्भात चर्चा करत असतात. त्यात ते विविध घटक आणि विषयांवर देखील चर्चा करतात.  
  • आता या चर्चेत जर कोणी नवीन घटक मांडला की तुम्हाला असे वाटते की मी घटक वाचलाच नाही.
  • म्हणजे माझी तयारी अपूर्ण आहे.
  • तुमची तयारी पूर्ण नाही किंवा कमी तयारी आहे असे समजू नका.तुमची तयारी हे वस्तुनिष्ठ वास्तव आहे आणि परीक्षेच्या दिवशी बदलू शकत नाही.एकदा तुम्ही पेपर द्यायचे ठरवले की तुमच्या तयारीचे विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका.फक्त तुम्हाला काय माहित आहे यावर लक्ष केंद्रित करा.

4. उपस्थिती पत्रकात चुका करू नका

  •  तुम्हाला परीक्षेदरम्यान उपस्थिती पत्रक भरावे लागेल जिथे तुम्हाला तुमचा रोल नंबरदेखील भरावी लागतो.  
  • खूप सावधगिरी बाळगा आणि त्याला फक्त 1-2 मिनिटे लागतील. जरी, जर तुम्ही चूक केली तर परीक्षा केंद्रे तुम्हाला मदत करतात, यामुळे तुमचा वेळच वाया जाणार नाही तर अतिरिक्त चिंताही निर्माण होईल.
  • विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पत्रकात चुका करताना पाहणे हे एक सामान्य दृश्य आहे. म्हणून, खूप सावधगिरी बाळगा.

5. परीक्षेच्या आधी जास्त जेवण करू नका

  • जास्त जेवण केल्यामुळे तुम्हाला परीक्षा कालावधीत झोप लागू शकते. त्यामुळे परीक्षेच्या आधी जास्त जेवण करू नये.
  • तुम्ही सकाळी आठ किंवा नऊ वाजता थोडा हलका नाश्ता घ्यावा जेणेकरून परीक्षाकाळात तुमच्या उर्जा असेल.

6. परीक्षा स्थळ वर उशिरा जाणे

  • शेवटच्या मिनिटाला प्रवेश घेण्यापेक्षा किंवा उशिरा येण्यापेक्षा, उशीर होण्याऐवजी आणि परीक्षा देण्यास परवानगी न देण्यापेक्षा तुम्ही आगमन अपेक्षित असलेल्या वेळेपेक्षा 90 मिनिटे अगोदर पोहोचण्याचे नियोजन करणे चांगले आहे.
  • नेहमी ट्रॅफिक जाम किंवा इतर काही आणीबाणीची अपेक्षा करा आणि त्यांच्यासाठी तयार रहा.
  • आपल्याकडे थोडा वेळ अतिरिक्त असावा जेणेकरून आपल्याला आपली खोली आणि आसन क्रमांक सहज मिळेल. तुमच्याकडे परीक्षा सुरू करण्यापूर्वी शांत होण्यासाठी काही मिनिटे असावीत.

7. रात्र भर अभ्यास करणे

  • आदल्या रात्री शांत झोप घ्या.काही उमेदवार परीक्षेच्या आदल्या रात्रभर अभ्यास करत बसतात.
  • त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही आणि परीक्षेच्या दिवशी त्यांचे लक्ष विचलित असतात.
  • त्यामुळे आदल्या रात्री तुम्ही व्यवस्थित आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे.
  • जेणेकरून परीक्षेत तुमचं मन लागेल आणि परीक्षेत तुम्ही एकदम उत्साहाने आणि ऊर्जेने प्रश्न सोडवू शकाल.
  • लक्षात ठेवा अनावश्यक ताण तुम्हाला कोणत्याही प्रकारे घ्यायचा नाही आहे.
  • तणाव दूर करण्यासाठी, परीक्षेच्या दिवसापूर्वी, शांत झोप घेण्याचा सल्ला दिला जातो.
  • हे तुम्हाला ताजे ठेवेल, दुसऱ्या दिवशी सकाळी आणि तुम्ही आत्मविश्वासाने परीक्षेत बसू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा दिनांक/Maharashtra Police Bharti Exam Date

No

विभाग/जिल्हे

तारीख

पदाचे नाव

1

रत्नागिरी,कोल्हापूर

03/09/2021

ब्रॅडमन

2

पुणे, नागपूर, दौंड, नवी मुंबई, गोंदिया

07/09/2021

सशस्त्र पोलीस शिपाई

3

औरंगाबाद, अकोला, कुडसगाव

09/09/2021

सशस्त्र पोलीस शिपाई

4

उर्वरित जिल्हे

गौरी गणपती झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येईल

कारागृह शिपाई/पोलीस शिपाई चालक/ पोलीस शिपाई

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2020-21: पात्रता निकष

Click Here

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा: अभ्यासक्रम

Click Here

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पद्धती 

Click Here

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा कट ऑफ

Click Here 

महाराष्ट्र पोलीस भारती परीक्षा: मागील वर्षाचे पेपर

Click Here

 More from us 

MPSC Complete Study Notes [FREE]

Current Affairs for MPSC Exams PDF

NCERT Summary PDF (English)

Get Unlimited access to Structured Live Courses and Mock Tests- Online Classroom Program

Get Unlimited access to 40+ Mock Tests-BYJU'S Exam Prep Test Series

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment

FAQs

  • हो! महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत उमेदवारांनी मूळ पत्रासोबत त्याची छायांकित प्रत घेऊन जाणे सुद्धा गरजेचे आहे.

  • आयोगाने सांगितल्यानुसार उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळी पूर्वी दीड तास आधी जाणे अनिवार्य आहे.

  • नि:संशयपणे परीक्षेसाठी सर्वोत्तम चालू घडामोडी BYJU'S Exam Prep वर उपलब्ध आहे त्यामुळे BYJU'S Exam Prep चालू घडामोडी साठी सर्वोत्तम वेबसाईट आहे.

  • नाही! पोलीस भरती परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणपद्धती नसते.

  • वरील विषयांसाठी सर्वप्रथम मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका मधील जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा.

Follow us for latest updates