प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण
2022 पर्यंत "सर्वांसाठी घरे" हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, पूर्वीची ग्रामीण गृहनिर्माण योजना इंदिरा आवास योजना (IAY) ची पुनर्रचना 1 एप्रिल, 2016 पासून प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) मध्ये करण्यात आली.
चर्चेत असण्याचे कारण
- प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G) या योजनेला 20 नोव्हेंबर 2021 रोजी 5 वर्षे पूर्ण झाली असून कोविड-19 च्या प्रतिकूल परिणामामुळे 2020-2021 या कालावधीत PMAY-G अंतर्गत मंजूर केलेल्या घरांपैकी केवळ 5.4% घरे पूर्ण झाली आहेत.
- यामुळे हि योजना आता गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत शहरी भागात योजना लागू करण्यात आली असल्याकारणाने हा मुद्दा सध्या चर्चेत आहे.
MPSC Combined Mock Test 2021 |
ठळक बाबी
- पूर्वीची ग्रामीण गृहनिर्माण योजना – इंदिरा आवास योजनेची (IAY) 1 एप्रिल 2016 पासून PMAY-G म्हणून पुनर्रचना करून वर्ष 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले.
- मंत्रालय : ग्रामीण विकास मंत्रालय.
उद्दिष्ट
- सर्व ग्रामीण कुटुंबांना म्हणजेच ज्यांना स्वतःचे घर नाही किंवा कच्चा किंवा जे ग्रामीण कुटुंब मोडकळीस आलेल्या घरात राहतात त्यांना मुलभूत सुविधांसह एक पक्के घर मार्च 2022 अखेर उपलब्ध करून देणे.
- दारिद्र्यरेषेखालील (BPL) ग्रामीण लोकांना गृहनिर्माण युनिटचे बांधकाम आणि सध्याच्या निरुपयोगी कच्चा घरांच्या अपग्रेडेशनमध्ये संपूर्ण अनुदान सहाय्य म्हणून मदत करणे.
Maharashtra State Exams Online Coaching |
लाभार्थी
- अनुसूचित जाती आणि जमाती मधील लोक, मोफत बंधपत्रित मजूर आणि गैर-SC/ST श्रेणी, विधवा किंवा कारवाईत ठार झालेल्या संरक्षण कर्मचार्यांचे नातेवाईक (हुतात्मा झालेल्या सैनिकांचे कुटुंब), माजी सैनिक आणि निमलष्करी दलातील निवृत्त सदस्य, अपंग व्यक्ती आणि अल्पसंख्याक.
- लाभार्थ्यांची निवड : तीन टप्प्यांतून - सामाजिक आर्थिक धर्मनिहाय जनगणना 2011, ग्रामसभा आणि जिओ - टॅगिंग या माध्यमातून करण्यात येईल.
- खर्चातील हिस्सा : केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये मैदानी भागात 60:40 आणि ईशान्येकडील आणि डोंगराळ राज्यांमध्ये 90:10 च्या खर्च सामायिक करण्यात आला आहे
वैशिष्ट्ये
- योजनेच्या यामाध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या घरांमध्ये स्वच्छ स्वयंपाकाच्या जागेसह घराचा किमान आकार 25 चौरस मीटर (20 चौरस मीटर वरून) वाढविला गेला.
- सपाट राज्यांमध्ये प्रति घर मदत रु.70,000 वरून रु.1.20 लाख आणि डोंगराळ राज्यांमध्ये रु.75,000 ते रु.1.30 लाख अशी करण्यात आली आहे.
- शौचालय बांधण्यासाठी मदत : स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण (SBM-G), MGNREGA किंवा इतर कोणत्याही निधीच्या माध्यमातून ही योजना एकरूप केल्या जाईल.
- पाइपद्वारे पिण्याचे पाणी, वीज कनेक्शन, एलपीजी गॅस कनेक्शन अशा विविध सरकारी सुविधांच्या उपलब्धीसाठी ही या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करा:
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण ,Download PDF मराठीमध्ये
More From Us:
MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
NCERT Books for MPSC State Exam 2021
Maharashtra State Board Books PDF
MPSC Rajyaseva Study Notes PDF
Download BYJU'S Exam Prep App

Comments
write a comment