hamburger

Shyam Prasad Mukherji Rurban Mission in Marathi/श्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन मिशन, शासकीय योजना, PDF

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

नॅशनल रुर्बन मिशन “गावांच्या क्लस्टरच्या विकासाचे अनुसरण करते जे ग्रामीण समुदाय जीवनाचे सार जतन करतात आणि त्यांचे पालनपोषण करतात आणि समानता आणि सर्वसमावेशकतेवर लक्ष केंद्रित करतात ज्यात मूलभूतपणे शहरी स्वरूपातील समजल्या जाणार्‍या सुविधांशी तडजोड न करता, अशा प्रकारे ‘ग्रामीण गावे’ एक क्लस्टर तयार केला जातो. या लेखात आपण श्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन अभियान या योजनेविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. 

Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

श्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन अभियान

\

  • ही योजना केंद्रीय कॅबिनेटने 16 सप्टेंबर 2016 रोजी संमत केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 फेब्रुवारी, 2016 रोजी छत्तीसगडमधील राजनंदगाव जिल्ह्यातील कुरूभाट या गावातून ही योजना घोषित केली.
  • रूर्बन म्हणजे rural+urban होय.
  • ही एक क्लस्टर-आधारित विकासाची योजना असून त्यामध्ये ‘ग्रामीण आत्मा आणि शहरी सुविधा’ असलेले क्लस्टर्स विकसित करण्याचा समावेश आहे.
  • हे अभियान स्मार्ट गावे (smart villages) विकसित करण्याची योजना आहे.

मिशनचे उद्दिष्ट/Mission’s Objective

  • श्यामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन (SPMRM) चे उद्दिष्ट स्थानिक आर्थिक विकासाला चालना देणे, मूलभूत सेवा वाढवणे आणि सुनियोजित रर्बन क्लस्टर्स तयार करणे हे आहे.

\

मिशनचे परिणाम/Mission’s Outcomes

\

या मिशन अंतर्गत अपेक्षित मोठे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:

  1. ग्रामीण-शहरी विभागणी कमी करणे -म्हणजे आर्थिक, तांत्रिक आणि सुविधा आणि सेवांशी संबंधित असलेले विभाजन.
  2. ग्रामीण भागातील गरिबी आणि बेरोजगारी कमी करण्यावर भर देऊन स्थानिक आर्थिक विकासाला चालना देणे.
  3. प्रदेशात विकासाचा प्रसार.
  4. ग्रामीण भागात गुंतवणूक आकर्षित करणे.

वैशिष्ट्ये

\

  • हे क्लस्टर्स योग्यपणे सीमांकीत असलेले व नियोजित लेआऊट असलेली क्षेत्रे असतील, राज्य शासनामार्फत ती अधिसूचित केली जातील.
  • या क्लस्टर्सची निवड राज्य शासनामार्फत केली जाईल. हे क्लस्टर्स सपाट व किनारी भागात 25,000 ते 50,000 लोकसंख्या असलेले, तर डोंगराळ / आदिवासी / वाळवंटी भागात 5,000 ते 15,000 लोकसंख्या असलेले ग्राम पंचायतींचे भौगोलिकदृष्ट्या सलग क्षेत्रे असतील.
  • ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत या क्लस्टर्सची निवड करण्यासाठी शास्त्रीय प्रक्रियेचा वापर केला जाईल. त्यामध्ये जिल्हा, तालुका व गाव पातळीवर लोकसंख्या, अर्थव्यवस्था, पर्यटन आणि यात्राविषयक महत्व यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले जाईल.
  • पुढील 3 वर्षांमध्ये 300 असे रूरबन क्लस्टर्स निर्माण करण्याचे लक्ष्य आहे.
  • घटक: कौशल्य विकास, कृषि प्रक्रिया/ कृषि सेवा/साठवणूक/गोदामे, डिजिटल साक्षरता, स्वच्छता.
  • पाईप्ड पाणी पुरवठा, घन व द्रव कचरा व्यवस्थापन, गावातील रस्ते व गटारी, पथदिवे, संपूर्ण, सोयींसहित मोबाईल आरोग्य केंद्रे, शाळा/उच्च शिक्षण सुविधांचे दर्जावर्धन, गावागावांमधील रस्ते जोडणी, संपूर्ण कनेक्टीव्हिटी, नागरिक सेवा केंद्रे, सार्वजनिक वाहतूक, एल.पी.जी. गॅस कनेक्शन.

\

या योजनेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करा:

श्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन अभियान ,Download PDF मराठीमध्ये

More From Us:

Maharashtra Static GK 

MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English

Important Government Schemes For MPSC 

NCERT Books for MPSC State Exam 2022

Maharashtra State Board Books PDF

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Download BYJU’S Exam Prep App

Shyam Prasad Mukherji Rurban Mission in Marathi/श्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन मिशन, शासकीय योजना, PDF Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF’s & more, Join our Telegram Group Join Now
Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium