- Home/
- Maharashtra State Exams (MPSC)/
- Article
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana in Marathi/ प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, Download PDF
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023
![](https://bep-wordpress.byjusexamprep.com/wp-content/uploads/2023/08/23221638/external-image-2465.jpg)
10 सप्टेंबर 2020 रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) लाँच करण्यात आली. पाच वर्षांच्या कालावधीत (2020-2025) मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या शाश्वत विकासाद्वारे ब्लू क्रांती घडवून आणणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. PMMSY ची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2019-20 मध्ये करण्यात आली होती. हा घटक एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा, महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.
Table of content
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
- 20 मे 2020 शुभारंभ 10 सप्टेंबर 2020 कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधून यांच्या हस्ते व्हिडिओ, पंतप्रधान नरेंद्र मोदी
- 2024-25 सालापर्यंत देशातील मत्स्य उत्पादन 70 लाख टनांपर्यंत वाढवणे.
प्रमुख उद्देश
- मत्स्योत्पादन क्षेत्राला चालना देणे आणि मच्छीमारांचे उत्पन्न दुप्पट करणे.
- भारतातील मत्स्यव्यवसायात शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून नीलक्रांती घडवून आणणे.
- अंमलबजावणी कालावधी : 5 वर्षे (2020-21 ते 2024-25).
- या योजनेसाठी केंद्र सरकारने 20,050 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. मत्स्योत्पादन क्षेत्राला प्रथमतःच एवढ्या मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Maharashtra State Exams Online Coaching |
घटक
- केंद्रीय क्षेत्र योजना (CS) 2) केंद्र पुरस्कृत योजना (CSS)
- या योजनेद्वारे क्षेत्रातील हंगामानंतरचे होणारे नुकसान सध्याच्या 20 ते 25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर येईल.
- या योजनेद्वारे मत्स्योत्पादन क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या 55 लाख रोजगार निर्मिती होईल.
या योजनेमध्ये पुढील तीन विभागांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे :
- उत्पादन आणि उत्पादकता क्षमतेमध्ये वाढ
- हंगामानंतरच्या व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधांचा विकास
- मत्स्योद्योग व्यवस्थापन आणि नियामक चौकट
MPSC Combined Mock Test 2021 |
लाभार्थी
- मच्छीमार
- मत्स्य शेतकरी
- (मासे कामगार आणि मासे विक्रेते
- मत्स्यव्यवसाय विकास महामंडळे
- मत्स्यपालन क्षेत्रातील बचत गट (SHGs)/संयुक्त दायित्व गट (JLGs)
- मत्स्यपालन सहकारी संस्था
- मत्स्यपालन महासंघ
- उद्योजक आणि खाजगी कंपन्या
- मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था/कंपन्या (FFPOs/Cs)
- अनुसूचित जाती/जमाती/महिला/विविध सक्षम व्यक्ती
लक्ष्य
- मत्स्य उत्पादनात अतिरिक्त 70 लाख टन वाढ करणे आणि 2024-25 पर्यंत मत्स्यव्यवसाय निर्यात उत्पन्न रु. 1,00,000 कोटी पर्यंत वाढवणे.
- मच्छिमार आणि मत्स्यपालकांचे उत्पन्न दुप्पट करणे.
- काढणीनंतरचे नुकसान 20-25% वरून 10% पर्यंत कमी करणे.
- मत्स्यव्यवसाय क्षेत्र आणि संबंधित क्रियाकलापांमध्ये अतिरिक्त 55 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभदायक रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
बजेट आणि कालावधी
- सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आर्थिक वर्ष (FY) 2020-21 ते FY 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी अंदाजे 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
- ही गुंतवणूक मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वाधिक आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करा:
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ,Download PDF मराठीमध्ये
More From Us:
MPSC Rajyaseva 30 Days Study Plan
MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English
Important Government Schemes For MPSC
NCERT Books for MPSC State Exam 2021
Maharashtra State Board Books PDF
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
Download BYJU’S Exam Prep App
![Pradhan Mantri Matsya Sampada Yojana in Marathi/ प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, Download PDF](https://gs-post-images.grdp.co/2020/3/telegram_png30-1-img1585473029191-76.png-rs-high-webp.png)