hamburger

Pradhan Mantri Gram Sadak Yojana in Marathi/प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, Government Schemes PDF

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) ही ग्रामीण भारतातील उत्तम कनेक्टिव्हिटी आणि वाहतुकीसाठी एक योजना आहे.प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) डिसेंबर 2000 मध्ये भारतातील संपर्क नसलेल्या गावांना अनिर्बंध सर्व-हवामान रस्ते कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली.या लेखात आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजने विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तसेच तुम्ही या घटकाची पीडीएफ डाऊनलोड करू शकतात. हा घटक एमपीएससी राज्यसेवाएमपीएससी संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षामहाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना

\

आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (Cabinet Committee on Economic Affairs (CCEA)) रस्ते आणि पुलांच्या बांधकामाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर 2022 पर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-1 आणि II (PMGSY-I आणि II) सुरु ठेवण्यास तर मार्च 2023 पर्यंत उग्रवादी प्रभावित क्षेत्रांसाठी रस्ता जोडणी प्रकल्प सुरू ठेवण्यास देखील मान्यता दिली असल्याकारणाने हा मुद्दा सध्या चर्चेत आहे.

MPSC Combined Mock Test 2021

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग – 1 

Pradhan Mantri Gram Sadak Yojana in Marathi/प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, Government Schemes PDF

  • ही 100% केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यात सन 2000 पासून राबविण्यात येत आहे.
  • योजनेची अंमलबजावणी : ग्रामविकास विभागाच्या आधिपत्याखालील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते. 

मुख्य उद्देश 

  • सन 2001 च्या जनगणनेनुसार सर्वसाधारण क्षेत्रात 1000 पेक्षा जास्त आदिवासी भागातील 500 पेक्षा जास्त पात्र लोकवस्तीची रस्त्याने न जोडलेली गावे बारमाही रस्त्याद्वारे (वर्षभर चालू रहाणारे व क्रॉस ड्रेनेज बांधून) जोडणे.
  • सद्यस्थितीत केंद्र सरकारने न जोडलेल्या बिगर आदिवासी भागातील 500 पेक्षा जास्त, आदिवासी भागातील 250 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आणि नक्षलग्रस्त जिल्हयातील 100 249 लोकसंख्या असलेल्या वाडया-वस्त्यांच्या प्रस्तावांना देखील मान्यता दिलेली आहे.
  • यासोबतच या योजनेत पात्र वस्ती असलेल्या सर्व जिल्ह्यांसाठी अस्तित्वात असलेल्या ग्रामीण रस्त्यांच्या अद्ययावतीकरणाचे घटक देखील समाविष्ट आहेत.
  • प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग-1 अंतर्गत टप्पा 1 ते 13 मध्ये एकूण 24952 कि.मी. लांबीचे रस्ते मंजूर आहेत.

Maharashtra State Exams Online Coaching

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) भाग – 2

Pradhan Mantri Gram Sadak Yojana in Marathi/प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, Government Schemes PDF

  • ही केंद्र शासनाने सन 2013 मध्ये सुरु केलेली असून ज्या राज्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग 1 मध्ये 100% नवीन जोडणी व 90% दर्जात्रतीची कामे प्रदान केलेली आहेत त्या राज्यांसाठी लागू केलेली आहे. 
  • त्यानुसार महाराष्ट्र राज्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग 2 अंतर्गत 2619 कि.मी. रस्त्यांची लांबी मंजूर करण्यात आलेली आहे. या एकूण 27571 कि.मी. मंजूर लांबीपैकी ऑगस्ट, 2019 पर्यंत एकूण 26328कि.मी. रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. 
  • केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग – 1 व 2 मधील सुरु असलेल्या कामांसाठी नोव्हेंबर, 2015 पासून केंद्र व राज्यांच्या हिस्सा पध्दतीत 60:40 असा बदल केला आहे.

आम्ही पीडीएफ का डाऊनलोड करावी?/Why should we download PDF?

लेखात वरील दिलेल्या माहिती सोबत आणखी महत्त्वाची माहिती पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. त्यासाठी तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करू शकतो पीडीएफ मध्ये तुम्हाला खालील घटक मिळतील.

  1. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) भाग – 3
  2. नक्षलग्रस्त भागांसाठी (Naxal-affected areas) रस्ते जोडणी प्रकल्प 
  3. योजनेचे महत्व 
  4. अमलबजावणीसमोरील आव्हाने (Challenges)

हे सर्व घटक तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळतील म्हणून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करावी.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करा:

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ,Download PDF मराठीमध्ये

More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra State Board Books PDF

MPSC Rajyaseva Study Notes PDF

Download BYJU’S Exam Prep App

Pradhan Mantri Gram Sadak Yojana in Marathi/प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, Government Schemes PDF Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF’s & more, Join our Telegram Group Join Now
Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium