- Home/
- Maharashtra State Exams (MPSC)/
- Article
Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana in Marathi/प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, Download PDF
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023
प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही मुळात भारतातील अन्न सुरक्षा कल्याणकारी योजना आहे. मार्च 2020 मध्ये पहिल्यांदा त्याची घोषणा करण्यात आली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना योजना ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते आणि कार्यक्रम त्याच मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागामार्फत चालविला जातो.या लेखात आपण प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. हा घटक एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा, महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State Exams.
Table of content
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना
- 26 मार्च 2020 रोजी अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते.
- कोविड-19 विरुद्धच्या लढाईत गरीबांना मदत करण्यासाठी PMGKAY हा प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (PMGKP) चा एक भाग आहे.
- हे तीन महिन्यांच्या कालावधीसाठी (एप्रिल, मे आणि जून) जाहीर करण्यात आले होते, ज्यामध्ये 80 कोटी शिधापत्रिकाधारकांचा समावेश होता. ती 30 जून 2020 रोजी संपेल.
- या योजनेचा उद्देश राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत समाविष्ट असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) द्वारे आधीच पुरविलेल्या 5 किलो अनुदानित अन्नधान्याव्यतिरिक्त अतिरिक्त 5 किलो धान्य (गहू किंवा तांदूळ) मोफत देणे हा आहे.
- प्रादेशिक आवडीनुसार लाभार्थींना 1 किलो डाळ मोफत मिळण्यासही पात्र आहे.
Maharashtra State Exams Online Coaching |
वैशिष्ट्ये
- COVID-19 आणि त्याच्याशी संबंधित परिणामाविरुद्ध लढा देण्यासाठी ही योजना देशातील लोकांसाठी एक आर्थिक मदत पॅकेज आहे.
- या पॅकेजअंतर्गत देशातील गरजू लोकांना सुमारे 7 लाख कोटींचे वाटप करण्यात आले आहे.
- या योजनेअंतर्गत सुमारे 80 कोटी गरिबांना पुढील तीन महिने प्रत्येकी पाच किलो तांदूळ किंवा गहू मोफत दिले जाणार आहे. यापूर्वीच अनुदानित स्वरूपात देण्यात आलेल्या 5 किग्रॅ भात आणि गहू खेरीज हे अतिरिक्त अनुदान आहे.
- याशिवाय या गरीबांना प्रति कुटुंब एक किलो मोफत डाळही दिली जाणार आहे.
- या योजनेंतर्गत कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात अग्रक्रमाने सहभागी झालेल्या डॉक्टर, स्वच्छता कामगार, नर्स, पॅरामेडिक्स आणि इतर कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपये इतक्या विमा संरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
- योजनेअंतर्गत वृद्धापकाळ, दिव्यांग आणि निवृत्तीवेतनधारक व्यक्तींच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत 1000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. तीन कोटी व्यक्तींना याचा लाभ होईल.
- या योजनेंतर्गत पुढील 3 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 कोटी महिला जनधन खातेधारकांच्या प्रत्यक्ष खात्यावर प्रति महिना 500 रुपये याप्रमाणे रक्कम जमा केली जाईल.
- महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारासाठीच्या मजुरी दरामध्ये वाढ करुन तो प्रतिदिन 182 रुपयांवरून 202 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- याचा लाभ 62 कोटी कुटुंबांना होणे अपेक्षित आहे.
MPSC Combined Mock Test 2021 |
आव्हान
एक कळीचा मुद्दा असा आहे की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे लाभार्थी हे गेल्या जनगणनेवर (2011) आधारित आहेत. तेव्हापासून अन्न-असुरक्षित लोकांची संख्या वाढली आहे आणि ते अनकव्हर राहतात.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करा:
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ,Download PDF मराठीमध्ये
More From Us: