- Home/
- Maharashtra State Exams (MPSC)/
- Article
MPSC Profile Update 2021: Update MPSC Profile for Upcoming Exam/उमेदवारांचे खाते अद्ययावत करण्याबाबत
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 30 सप्टेंबर 2021 रोजी एमपीएससी प्रोफाइल अपडेटबाबत उमेदवारांसाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळामध्ये बदल करण्यात आला असून सद्यस्थितीत आयोगाची ऑनलाईन अर्जप्रणाली या संकेतस्थळावर स्थापित करण्यात आली आहे. तसेच, यापूर्वीच्या या संकेतस्थळावरील ऑनलाईन अर्जप्रणालीमधील उमेदवारांची खाती बंद करुन सदर खाती नवीन संकेतस्थळावर वर्ग करण्यात येत आहेत. एमपीएससी राज्य सेवा परीक्षा आणि एमपीएससी संयुक्त परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हे अपडेट महत्त्वाचे आहे.
Table of content
MPSC Profile Update/ MPSC उमेदवारांचे खाते अद्ययावत करण्याबाबत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून लवकरच स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे. जाहिराती प्रसिध्द झाल्यानंतर खाते अद्ययावत करण्यात आलेले नसल्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज करणे शक्य होणार नाही. यास्तव, उमेदवारांनी जाहिरातीस अनुसरुन सुलभपणे अर्ज करता यावा, याकरीता तात्काळ त्यांच्या खात्याचा पासवर्ड व खाते अद्ययावत करुन घ्यावे.
आयोगाकडून उर्वरित प्रलंबित भरती प्रक्रियेसाठी आणि नव्याने लागू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी नजीकच्या भविष्यात उमेदवारांची खाती अपडेट करणे आवश्यक आहे. खाती अद्ययावत केल्याशिवाय उमेदवार नवीन अर्ज सादर करू शकणार नाहीत आणि वेळेवर नवीन खाते तयार करणे कठीण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांना आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर त्यांच्या खात्याचे पासवर्ड आणि खात्याचे तपशील त्वरित अपडेट करणे बंधनकारक आहे.
To download the official notification PDF, click here:
MPSC Profile Update, Download Official Notification
आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरील खात्याचा वापर करण्यासंदर्भात उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना / प्रक्रिया सदर संकेतस्थळावरील ‘Guidelines for Candidate’ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सदर प्रक्रिया / सूचनांचे अवलोकन केल्यास उमेदवारांना खाते अद्ययावत करणे सुलभ होऊ शकेल.
MPSC प्रोफाइल कसे अपडेट करावे?
आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीवर खाते अद्ययावत करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे:
- STEP 1: mpsconline.gov.in या नवीन ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरील ‘Registration मधील Forgot / Reset Password’ या लिंकवर क्लिक करा.
- STEP 2: आपल्या जुन्या खात्याचा User Name, नोंदणीकृत Email Id. नोंदणीकृत Mobile Number यापैकी आपल्याला ज्ञात असलेला पर्याय निवडा व त्याप्रमाणे तपशील प्रविष्ट करुन Get OTP’ या बटणावर क्लिक करा.
- STEP 3: आपल्या जुन्या खात्यामध्ये नोंदणीकृत असणा-या ईमेल आयडी व अथवा मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणारा OTP प्रविष्ट करुन सत्यापित करण्यासाठी Verify’ बटणावर क्लिक करा.
- STEP 4: खात्यामध्ये नमूद केलेला आपला जन्मदिनांक नोंदवून ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
- STEP 5:आपल्या पसंतीप्रमाणे 8 ते 15 क्रमांकाचा असा पासवर्ड प्रविष्ट करा की ज्यामध्ये किमान एक मोठे (Capital case). एक लहान (Small case), एक विशेष चिन्ह (Special character). एक अंक असावा.
- STEP 6: उपलब्ध होणा-या सहा सुरक्षा प्रश्नांची अचूक उत्तरे नमूद करुन ‘Reset’ बटणावर क्लिक करा.
- STEP 7: पासवर्ड बदलल्यानंतर सध्याचे युजर नेम कार्यान्वित राहणार नाही. नवीन ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे नोंदणीकृत ईमेल आयडी अथवा मोबाईल क्रमांक व नवीन पासवर्ड वापरुन लॉग इन करता येईल.
तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास :
उपरोक्त विहित कार्यपध्दतीनुसार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर खाते अद्ययावत करताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या 1800-1234-275 किंवा 1800-2673-889 या टोल फ्री क्रमांकावर अथवा support-online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.
लक्ष्यात ठेवा :
खाते अद्ययावत करण्याच्या कार्यवाहीकरीता कोणतीही कालमर्यादा नाही. तथापि, विहित कालमर्यादेत करावयाच्या बाबींकरीता (उदा. परीक्षेचे प्रवेशप्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे, अर्ज करणे इत्यादी) ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर खाते अद्ययावत करणे उमेदवारांच्या हिताचे राहील.
Check the update in English, click here:
MPSC Online Registration Process Changed, Know More Here
More From Us: