- Home/
- Maharashtra State Exams (MPSC)/
- Article
अण्णासाहेब पाटील, कार्ये, योगदान, अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, Annasaheb Patil
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023

अण्णासाहेब पाटील यांचा जन्म 25 सप्टेंबर 1933 ला पाटण तालुक्यातील मंगरुळे गावात झाला. अण्णासाहेब पाटील हे कामगार व माथाडी नेते म्हणून त्याकाळात ओळखले जात. आजच्या लेखात आपण अण्णासाहेब पाटील यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहे. त्यांचे कार्य, योगदान तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजने विषयी सुद्धा माहिती घेणार आहोत. या लेखाची पीडीएफ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकतात.
Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.
Table of content
अण्णासाहेब पाटील
- डोक्यावरून ओझे वाहणाऱ्यांना माथाडी कामगार म्हणतात. ओझी उचलणे, ट्रक-रेल्वेतून, मालाची थप्पी मारणे,अवजडमालाची ने आन करणे, गोणी शिवणे, अशी विविध कामे हे कामगार करतात.
- पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमधून अनेक नागरिक उपजीविकेच्या शोधार्थ मुंबईत आले विविध गोदामांमध्ये , बाजारांमध्ये ओझे उचलण्याचे काम करू लागले. मात्र, या कामासाठी त्यांना अत्यंत कमी मजुरी मिळायची.
- अनेक कामगारांना शंभर ते दीडशे किलोपर्यंतचे ओझे उचलावे लागायचे. या अतिकामामुळे,शरीराचा त्रास
- हाडांची झीज,पाठदुखी,चक्कर येणे अशा आजारांना सामोरे जावे लागायचे. अंगात ताकद असेपर्यंत कामगार कामे करायचे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नव्हती.
- आवश्यक सुविधा, पुरेसे वेतन, आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षिततेच्या मागणीसाठी माथाडी कामगारांनी साठच्या दशकात संघर्षाला सुरुवात केली.
- हमालांना त्यांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी नेटाने दिलेला लढा य़शवंतराव चव्हाणांनी केलेले सहकार्य यातून ५ जून १९६९ रोजी माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आला.
- या कायद्याच्या धर्तीवर त्यासाठी त्यानुसार, राज्यात पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या सहा विभागांमध्ये तब्बल ३६ माथाडी मंडळे स्थापन करण्यात आली.
मराठा आरक्षण लढा
- 80 च्या दशकात मराठा समाजाचे कोणत्याही प्रकारचे व्यापक संघटन नव्हते छोटे छोटे मंडळ आपआपल्या भागात समाजाचे काम करायचे राज्यस्तरीय कोणतीही संघटना प्रभावी नव्हती.
- अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याची सुरवात १९८० पासून केली.
- अण्णासाहेब पाटील यांना माथाडीची हालाखाची स्थिती माहिती होती. एकूणच सर्व मराठा समाजाची स्थिती अत्यंत नाजूक होती. मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे हे त्यांनी जाणून घेतले.
- छोट्या छोट्या मंडळ आणि संघटनेला एकत्र करून त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केली
- महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाकरिता त्यांनी झंझावाती दौरे काढले.
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने 27/11/1998 रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली आहे.
उद्दिष्टे
- आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना, विशेषत: बेरोजगार तरुणांना सक्षम करणे.
- योजना राबवून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.
या घटकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करावी:
अण्णासाहेब पाटील, Download PDF मराठीमध्ये
More From Us:
MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English
Important Government Schemes For MPSC
NCERT Books for MPSC State Exam 2022
Maharashtra State Board Books PDF
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
