MPSC संयुक्त पूर्व उत्तरतालिका 2022, MPSC Combined Prelims Official Answer Key Out, Download PDF

By Ganesh Mankar|Updated : October 12th, 2022

MPSC संयुक्त पूर्व उत्तरतालिका 2022: एमपीएससीतर्फे राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये अराजपत्रित वर्ग 2 पदांसाठी संयुक्त गट ब परीक्षा घेतली जाते. ही पदे अनुक्रमे पीएसआय, एसटीआय, एएसओ आणि दुय्यम निबंधक आहेत. एमपीएससी आयोगामार्फत 8 ऑक्टोंबर 2022 रोजी एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला या लेखात या परीक्षेची सर्वात अचूक उत्तर तालिका देण्यात येईल. तसेच आयोगाचे अधिकृत उत्तरतालिका सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल.

byjusexamprep

Table of Content

MPSC संयुक्त पूर्व उत्तरतालिका 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून येत्या 08 October 2022 रोजी MPSC Combined पूर्व परीक्षा 2022 आयोजित करण्यात येणार आहे. एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा ही सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम उपनिबंधक या पदांसाठी आयोजित केली जाणार आहे. आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या नोकर भरती जाहिराती मध्ये 800 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

byjusexamprep

आयोगाकडून ही पूर्व परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला परीक्षेच्या दिवशी या परीक्षेचे सर्वात अचूक उत्तरतालिका या लेखात मिळणार आहे. तसेच जेव्हा आयोग त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर MPSC Combined Answer Key अधिकृत उत्तरतालिका प्रकाशित करेल , तेव्हा तुम्हाला या लेखात अधिकृत उत्तरतालिका सुद्धा मिळून जाईल.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेची उत्तरतालिका डाऊनलोड करू शकतात:

MPSC Combined Prelims Answer Key 2022- Download PDF 

byjusexamprep

एमपीएससी संयुक्त परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला एमपीएससी संयुक्त परीक्षा 2022 च्या महत्वाच्या तारखा मिळणार आहेत:

महत्वाच्या घटनाकालावधी
MPSC संयुक्त 2021 परीक्षा जाहिरात23 जून 2022
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख25 जून 2022
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख15 जुलै 2022
ऑनलाइन फी भरणे15 जुलै 2022
ऑफलाइन फी भरणे19 जुलै 2022
MPSC संयुक्त पूर्वपरीक्षेची तारीख
08 ऑक्टोबर 2022
MPSC संयुक्त पूर्वपरीक्षेची तारीख उत्तर-तालिका
12 ऑक्टोबर 2022

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण कसे मोजावे

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेत फक्त एकच पेपर असतो, त्यात शंभर प्रश्न ही 100 गुणांसाठी असतात, म्हणजेच प्रत्येक प्रश्न हा एका गुणांसाठी असतो. या पूर्व परीक्षा पेपर मध्ये नकारात्मक गुणपद्धती सुद्धा असते. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे बरोबर आलेल्या उत्तरांमधून 0.25 इतके गुण कमी केले जातात.

उमेदवाराला मिळालेले एकूण गुण = (योग्य उत्तरांची संख्या X 1) – (चुकीच्या प्रश्नांची संख्या 0.25)

महत्त्वाची टीप: या प्रश्नांचे उत्तर तुम्ही दिलेच नाही, त्या प्रश्नांसाठी कुठलीही नकारात्मक गुणपद्धती लागू होणार नाही.

byjusexamprep

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा मार्किंग स्कीम (Marking Scheme)

जर तुम्हाला एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण अचूक रीत्या काढायचे असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या तक्त्याचा आधार घेऊ शकतात. यात बरोबर प्रश्नसाठी किती गुण, चुकलेल्या प्रश्नांसाठी किती गुण आणि जर कुठलाही प्रश्न सोडवला नाही, तर त्याच्या साठी किती गुण या सर्व बाबी देण्यात आलेले आहेत.

चिन्हांकित योजना

गुण

बरोबर उत्तर

1

चुकीचे उत्तर

0.25

कोणतेही प्रतिसाद प्रश्न नाहीत

0

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेविषयी हरकती (Objections)

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा झाल्यानंतर आयोगाकडून तीन ते चार दिवसांमध्ये या पूर्व परीक्षेची अधिकृत उत्तरतालिका, जिला पहिली उत्तरतालिका असेसुद्धा म्हणतात, ती जाहीर करण्यात येते. या पहिल्या उत्तरतालिक्याच्या परिपत्रकात आयोगाकडून या उत्तरतालिका संबंधी जर कोणत्याही विद्यार्थ्याला हरकती घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी कालावधी देण्यात येतो. 

  • प्रथम उत्तर तालिका वर हरकती घेण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2022 पर्यंत असेल.
  • आयोगाकडून देण्यात आलेला कालावधी संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या हरकती आयोगाकडून लक्षात घेतले जात नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीतच आपल्या हरकती नोंदवाव्या.
  • या हरकती नोंदवून घेण्यासाठी तुम्ही आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ज्या प्रश्नाविषयी तुम्हाला हरकती घ्यायचे असेल. त्या प्रश्नाचे तुम्ही योग्य उत्तर व आयोगाकडून जो काही शिल्लक असेल तो भरून तुम्ही हरकत घेऊ शकतात.

To read the article in English, click here: MPSC Combined Answer Key

Related Important Links
MPSC Combined Result

MPSC Combined Answer Key

MPSC Subordinate Services Cut Off 2022

MPSC Combine Analysis

MPSC Combined Question Papers

MPSC Combined Admit Card

Comments

write a comment

MPSC संयुक्त पूर्व उत्तरतालिका 2022 FAQs

  • आयोगाकडून  MPSC Combined पूर्व परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात येते. या उत्तर तालिकेत पार पडलेल्या पूर्व परीक्षेच्या सर्व प्रश्नांचे अधिकृत उत्तरे दिली जातात, या उत्तर तालिकेत सर्व सेट साठी उत्तरे असतात.

  • ज्या विद्यार्थ्यांना MPSC Combined Answer Key डाउनलोड करायचे असेल, ते आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकतात. तसेच तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या परीक्षेची अधिकृत उत्तरतालिका डाऊनलोड करू शकतात.

    MPSC Combined Answer Key डाउनलोड करायचे असेल, ते आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकतात. तसेच तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या परीक्षेची अधिकृत उत्तरतालिका डाऊनलोड करू शकतात.

    MPSC Combined Prelims 2022: Answer Key, Download PDF

  • आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेच्या उत्तर तालिका मुळे तुम्हाला तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत व किती प्रश्न चुकलेले आहेत हे समजते. यावरूनच तुम्ही तुमचा संभावित स्कोर काय आहे हेसुद्धा जाणून घेऊ शकतात.

  • ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेच्या पहिल्या उत्तरतालिका विषयी काही हरकती असतील तर त्या आयोगाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन त्यांच्या हरकती नोंदवू शकतात. यासाठी त्यांना प्रत्येक प्रश्नाचे आयोगाकडून निर्धारित करण्यात आलेले शुल्क भरावे लागेल, तसेच संबंधित प्रश्नाचे बरोबर उत्तर काय आहे याची पुरावेदेखील द्यावे लागतील.

  • जर तुम्हाला एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेच्या अधिकृत उत्तरतालिका वर काही हरकती घ्यायचे असते तर आयोग त्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर करत अस.ते यात आयोग तुम्ही कधी पर्यंत या हरकती घेऊ शकतात हा कालावधी देतं, तसेच कोणत्या पद्धतीने तुम्ही या हरकती घेऊ शकतात हे सुद्धा नमूद केलेले असते. सध्या आयोग ऑनलाइन पद्धतीनेच हरकती घेत असते. ऑनलाइन पद्धती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने सादर करण्यात आलेल्या हरकती आयोग विचारात घेत नाही.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार उत्तर तालिका वरील हरकती ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याकरता शंभर रुपये प्रति प्रश्न/हरकत, तसेच 44 रुपये शुल्क लागू करण्यात येते.

  • एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेत फक्त एकच पेपर असतो, त्यात शंभर प्रश्न ही 100 गुणांसाठी असतात, म्हणजेच प्रत्येक प्रश्न हा एका गुणांसाठी असतो. या पूर्व परीक्षा पेपर मध्ये नकारात्मक गुणपद्धती सुद्धा असते. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे बरोबर आलेल्या उत्तरांमधून 0.25 इतके गुण कमी केले जातात.

    उमेदवाराला मिळालेले एकूण गुण = (योग्य उत्तरांची संख्या X 1) – (चुकीच्या प्रश्नांची संख्या 0.25)

Follow us for latest updates