Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana in Marathi/ दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना,PDF

By Ganesh Mankar|Updated : December 5th, 2021

दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) ही भारतातील ग्रामीण विकासावर केंद्रित असलेली एक महत्त्वाची सरकारी योजना आहे. एमपीएससी परीक्षेच्या प्रिलिम आणि मुख्यसाठी सरकारी योजना खूप महत्त्वाच्या आहेत. या लेखात, तुम्ही दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY), त्यातील तरतुदी, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये इ. बद्दल सर्व वाचू शकता. हा घटक एमपीएससी राज्यसेवाएमपीएससी संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षामहाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

Download BYJU'S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

Table of Content

दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

byjusexamprep

 • ही केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाची मागणी-आधारित प्लेसमेंटशी कौशल्य प्रशिक्षणाची योजना असून 'राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियाना'चा एक भाग आहे.
 • पूर्वीच्या स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आजीविका योजनेचा भाग असलेल्या 'स्पेशल प्रोजेक्ट्स' या योजनेची पुनर्रचना करून २५ सप्टेंबर, २०१४ रोजी ही योजना घोषित करण्यात आली.
 • ग्रामीण गरीब कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये वैविध्य आणणे आणि ग्रामीण तरूणांच्या करियरविषयक आकांक्षांची पूर्तता करणे.

MPSC Combined Mock Test 2021

वैशिष्ट्ये (Features):

 • या योजनेंतर्गत खाजगी शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण तज्ज्ञांना आधुनिक व सर्व सोयींनी युक्त असलेली प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यासाठी निधी दिला जाईल. त्यांची पाहणी व मूल्यमापन करण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर असेल.
 • या केंद्रांमध्ये १५ ते ३५ वयोगटातील व्यक्तींना रोजगाराधारित कौशल्याबरोबरच संगणक / टॅबलेटचा वापर, इंग्रजी बोलणे आणि इतर जीवन-कौशल्यांचे पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. महिला, अपंग इत्यादींसाठी ३५ वर्षे वयाचे बंधन नसेल.
 • प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर नावाजलेल्या संस्थांमध्ये नोकरी मिळण्यासाठी मदत केली जाईल. नोकरी मिळाल्यानंतर प्राप्त होईल. २ ते ६ महिन्यांसाठी योजनेंतर्गत सॅलरी टॉप-अप
 • सध्या योजनेंतर्गत १,१०० प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहेत. त्यांची संख्या २-३ वर्षांत २,००० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
 • सध्या ३३० हून अधिक ट्रेड्समध्ये प्रशिक्षण उपलब्ध आहे. ती संख्या ५०० पर्यंत वाढेल.
 • या योजनेंतर्गत जम्मू व काश्मिरमधील व्यक्तींसाठी 'हिमायत' नावाचा, तर डाव्या अतिरेकाने प्रभावित नक्षल प्रभावित जिल्ह्यांमधील व्यक्तींसाठी रोशनी' नावाचा विशेष प्रशिक्षण प्लेसमेंटचा कार्यक्रम चालविला जात आहे.
 • सामाजिक समावेशनाच्या उद्देशाने योजनेंतर्गत ५० टक्के निधी अनुसूचित जाती व जमातींसाठी, १५ टक्के अल्पसंख्यांकांसाठी, ३ टक्के अपंगांनासाठी राखून ठेवला जाईल. प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमात ३३ टक्के जागा महिलांसाठी असतील.

Maharashtra State Exams Online Coaching

अंमलबजावणी मॉडेल

DDU-GKY 3-स्तरीय अंमलबजावणी मॉडेलचे अनुसरण करते. MoRD मधील DDU-GKY नॅशनल युनिट धोरण-निर्धारण, तांत्रिक समर्थन आणि सुविधा एजन्सी म्हणून कार्य करते. DDU-GKY राज्य मिशन अंमलबजावणी समर्थन प्रदान करतात; आणि प्रकल्प अंमलबजावणी एजन्सी (PIAs) कौशल्य आणि प्लेसमेंट प्रकल्पांद्वारे कार्यक्रम राबवतात.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करा:

दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ,Download PDF मराठीमध्ये

More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra State Board Books PDF

MPSC Rajyaseva Study Notes PDF

Download BYJU'S Exam Prep App

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment

FAQs

 • पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि व्यंकय्या नायडू यांनी 25 सप्टेंबर 2014 रोजी DDU-GKY लाँच केले होते.

 • DDU-GKY हा भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचा (MoRD) मागणी-आधारित प्लेसमेंट-लिंक्ड कौशल्य प्रशिक्षण उपक्रम आहे, ज्याचा उद्देश गरीबांमध्ये उत्पन्नातील विविधता निर्माण करण्याच्या उद्देशाने 15 ते 35 वर्षे वयोगटातील ग्रामीण गरीब तरुणांसाठी आहे. कुटुंबे आणि ग्रामीण तरुणांना त्यांच्या करिअरच्या आकांक्षा पूर्ण करण्यास मदत करतात.

Follow us for latest updates