अण्णासाहेब पाटील
- डोक्यावरून ओझे वाहणाऱ्यांना माथाडी कामगार म्हणतात. ओझी उचलणे, ट्रक-रेल्वेतून, मालाची थप्पी मारणे,अवजडमालाची ने आन करणे, गोणी शिवणे, अशी विविध कामे हे कामगार करतात.
- पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमधून अनेक नागरिक उपजीविकेच्या शोधार्थ मुंबईत आले विविध गोदामांमध्ये , बाजारांमध्ये ओझे उचलण्याचे काम करू लागले. मात्र, या कामासाठी त्यांना अत्यंत कमी मजुरी मिळायची.
- अनेक कामगारांना शंभर ते दीडशे किलोपर्यंतचे ओझे उचलावे लागायचे. या अतिकामामुळे,शरीराचा त्रास
- हाडांची झीज,पाठदुखी,चक्कर येणे अशा आजारांना सामोरे जावे लागायचे. अंगात ताकद असेपर्यंत कामगार कामे करायचे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नव्हती.
- आवश्यक सुविधा, पुरेसे वेतन, आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षिततेच्या मागणीसाठी माथाडी कामगारांनी साठच्या दशकात संघर्षाला सुरुवात केली.
- हमालांना त्यांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी नेटाने दिलेला लढा य़शवंतराव चव्हाणांनी केलेले सहकार्य यातून ५ जून १९६९ रोजी माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आला.
- या कायद्याच्या धर्तीवर त्यासाठी त्यानुसार, राज्यात पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या सहा विभागांमध्ये तब्बल ३६ माथाडी मंडळे स्थापन करण्यात आली.
मराठा आरक्षण लढा
- 80 च्या दशकात मराठा समाजाचे कोणत्याही प्रकारचे व्यापक संघटन नव्हते छोटे छोटे मंडळ आपआपल्या भागात समाजाचे काम करायचे राज्यस्तरीय कोणतीही संघटना प्रभावी नव्हती.
- अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याची सुरवात १९८० पासून केली.
- अण्णासाहेब पाटील यांना माथाडीची हालाखाची स्थिती माहिती होती. एकूणच सर्व मराठा समाजाची स्थिती अत्यंत नाजूक होती. मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे हे त्यांनी जाणून घेतले.
- छोट्या छोट्या मंडळ आणि संघटनेला एकत्र करून त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केली
- महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाकरिता त्यांनी झंझावाती दौरे काढले.
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने 27/11/1998 रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली आहे.
उद्दिष्टे
- आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना, विशेषत: बेरोजगार तरुणांना सक्षम करणे.
- योजना राबवून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.
या घटकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करावी:
अण्णासाहेब पाटील, Download PDF मराठीमध्ये
More From Us:
MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English
Important Government Schemes For MPSC
NCERT Books for MPSC State Exam 2022
Maharashtra State Board Books PDF
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Comments
write a comment