- Home/
- Maharashtra State Exams (MPSC)/
- MPSC Rajyaseva/
- Article
MPSC परीक्षा पॅटर्न 2022, राज्यसेवा पूर्व परीक्षा,प्रयत्न/ संधींची संख्या, किमान गुण, मुलाखत
By BYJU'S Exam Prep
Updated on: September 25th, 2023

दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध गट अ व गट ब विभागातील पदांसाठी एमपीएससी राज्यसेवा परीक्षा आयोजित करण्यात येते.एमपीएससी राज्यसेवा परीक्षेचा पॅटर्न कसा असतो? हे आपण आजच्या लेखात बघणार आहोत.
Every year MPSC Rajyaseva Examination is conducted by Maharashtra Public Service Commission (MPSC) for various Group A and Group B posts in the Government of Maharashtra. In this article, we have given the Exam pattern of the MPSC Rajyaseva Examination 2022.
Important Links for MPSC Combine (Group B) Prelims Exam 2022, October 08, 2022
Table of content
-
1.
MPSC राज्यसेवा 2022 परीक्षा पॅटर्न
-
2.
MPSC Exam Overview/ठळक वैशिष्ट्ये
-
3.
MPSC Exam 2022: Selection Process/निवड प्रक्रिया
-
4.
MPSC Exam Prelims Exam Pattern/पूर्व परीक्षा पॅटर्न
-
5.
MPSC Exam 2022: Mains Exam Pattern/मुख्य परीक्षा पॅटर्न
-
6.
MPSC Exam 2022: Qualifying Marks/किमान गुण
-
7.
MPSC Exam 2022: Interview/मुलाखत
MPSC राज्यसेवा 2022 परीक्षा पॅटर्न
- महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध संवर्गातील एकूण पदांवरील भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षा आयोजित करण्यात येते.
- MPSC राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याआधी त्या परीक्षेची पद्धत माहिती असणे आवश्यक आहे. परीक्षेची पद्धत माहिती असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी चा वेळ कमी लागतो आणि त्यांना दर्जेदार तयारी सुद्धा करता येते.
- महाराष्ट्र सरकारच्या मागणीनुसार, भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील, पदांची संख्या, आरक्षण, पात्रता इत्यादी, उमेदवारांना जाहिरात किंवा अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येते.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- The decision to limit the number of attempts/opportunities of candidates appearing for various competitive examinations conducted by the Maharashtra Public Service Commission is being cancelled. An announcement in this regard has been published on the Commission’s website.
MPSC राज्यसेवा 2022 परीक्षा पॅटर्न, Download PDF
MPSC Exam Overview/ठळक वैशिष्ट्ये
The following table gives the complete overview of the MPSC exam:
एमपीएससी परीक्षा 2022 |
तपशील |
परीक्षेचे नाव |
एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2022 |
भरती संस्था |
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
परीक्षेची पद्धत |
ऑफलाइन |
परीक्षेचे टप्पे |
पूर्व परीक्षा |
परीक्षेची वारंवारता |
वर्षातून एकदा |
पात्रता निकष |
पदवी आवश्यक |
परीक्षेची भाषा |
इंग्रजी आणि मराठी |
MPSC Exam 2022: Selection Process/निवड प्रक्रिया
- एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 3 टप्प्यांमधून घेतली जाते.
- ते 3 टप्पे खालीलप्रमाणे
- पूर्व परीक्षा / Prelims Exam (400 Marks)
- मुख्य परीक्षा / Mains Exam (800 Marks)
- मुलाखत / Interview (100 Marks)
- MPSC Prelims exam is conducted to limit the number of candidates for the MPSC main examination within the prescribed limits.
- पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या विहित मर्यादेत सिमित करण्यासाठी घेण्यात येते.
- याकरीता पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांस मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येते.
- पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात नाहीत.
- मुख्य परीक्षेकरिता आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतात.
जाहिरात/ अधिसूचनेतील तरतुदीनुसार विहित अटींची पूर्तता करणा-या व मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणा-या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येते.
MPSC Exam Prelims Exam Pattern/पूर्व परीक्षा पॅटर्न
- एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षा परीक्षेत दोन पेपर असतात, दोन्ही बहुपर्यायी असतात.
- MPSC Prelims examination consists of two papers, both of which are objective.
Take a look at the table below for MPSC prelims exam pattern in detail.
पेपर्स |
प्रश्न | गुण | परीक्षेचा स्तर | भाषा | परीक्षेचा कालावधी | परीक्षेचे स्वरूप |
पेपर 1 |
100 | 200 | पदवी स्तर | मराठी आणि इंग्रजी | 2 तास | बहुपर्यायी |
पेपर 2 |
80 |
200 | घटक (1) to (5) पदवी स्तर घटक (6) दहावी स्तर घटक (7) दहावी किंवा बारावी स्तर |
मराठी आणि इंग्रजी | 2 तास | बहुपर्यायी |
Important Note/महत्त्वाची माहिती
- When evaluating the answer sheets of objective nature, marks will be given only to the correct answers mentioned in the answer sheets. Also, 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
- वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 0.25 किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मधील Decision making and problem solving या घटकाकरीता नकारात्मक गुणांकन लागू नसेल.
- एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 0.25 किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
- वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच गणण्यात येईल व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
- सामान्य अध्ययन पेपर क्रमांक २ (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) असून अर्हताप्राप्त करण्यासाठी किमान ३३% गुण मिळविणे आवश्यक राहील. या पेपरमध्ये किमान ३३% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
MPSC Exam 2022: Mains Exam Pattern/मुख्य परीक्षा पॅटर्न
- MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये सहा अनिवार्य पेपर असतात.
- पेपर 1 आणि पेपर 1 भाषेचे पेपर आहेत, तर पेपर 3, 4, 5 आणि 6 सामान्य अध्ययन पेपर आहेत.
- एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये पर्यायी विषय नाहीत.
- एमपीएससी राज्यसेवा मेन्सचे वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेत निगेटिव्ह मार्किंग आहे.
The following table gives the exam pattern of the MPSC Mains examination:
पेपर क्रमांक |
विषय | स्तर | माध्यम | परीक्षेचे स्वरूप | गुण | परीक्षेचा कालावधी |
1 |
मराठी आणि इंग्रजी भाषा (निबंध/अनुवाद/सारांश) | 12 वी | मराठी आणि इंग्रजी | वर्णनात्मक | 100 | 3 |
2 |
मराठी आणि इंग्रजी भाषा (निबंध/ व्याकरण/ आकलन) | 12 वी | मराठी आणि इंग्रजी | बहुपर्यायी | 100 | 1 |
3 |
GS पेपर 1: इतिहास, भूगोल आणि कृषी | पदवी | मराठी आणि इंग्रजी | बहुपर्यायी | 150 | 2 |
4 |
GS पेपर 2: भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण | पदवी | मराठी आणि इंग्रजी | बहुपर्यायी | 150 | 2 |
5 |
GS पेपर 3: मानवाधिकार आणि मानव संसाधन विकास | पदवी | मराठी आणि इंग्रजी | बहुपर्यायी | 150 | 2 |
6 |
GS पेपर 4: अर्थव्यवस्था आणि नियोजन, विकासाचे अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास | पदवी | मराठी आणि इंग्रजी | बहुपर्यायी | 150 | 2 |
Important Notes/महत्त्वाची माहिती
- For traditional/descriptive paper No. 1 (Marathi and English), two separate answer sheets for Part-1 (Marathi) and Part-2 (English) will be provided simultaneously. It is mandatory to use separate answer sheets for the Marathi language as well as the English language.
- भाषा पेपर क्रमांक 1 मधील दोन्ही भागांकरीता (मराठी व इंग्रजी) एकच संयुक्त प्रश्नपुस्तिका राहील.
- भाषा पेपर क्रमांक 2 मधील दोन्ही भागांकरीता (मराठी व इंग्रजी) एकच संयुक्त प्रश्नपुस्तिका राहील. त्यामध्ये खालीलप्रमाणे दोन विभाग राहतील:
- (१) मराठी भाषेचे प्रश्न क्रमांक 1 ते 50 आणि
- (२) इंग्रजी भाषेचे प्रश्न क्रमांक 51 ते 100
- पारंपरिक / वर्णनात्मक स्वरुपाच्या पेपर क्रमांक 1 (मराठी व इंग्रजी) करीता भाग-1 (मराठी) व भाग-2 (इंग्रजी) साठी दोन स्वतंत्र उत्तरपुस्तिका एकाच वेळी पुरविण्यात येतील.
- मराठी भाषेसाठी तसेच इंग्रजी भाषेसाठी स्वतंत्र उत्तरपुस्तिकांचा वापर करणे अनिवार्य आहे.
- भाषा पेपर क्रमांक 1 मधील भाग-1 (मराठी) च्या उत्तरपुस्तिकेमध्ये भाग-2 (इंग्रजी) चे प्रश्न सोडविल्यास किंवा भाग-2 (इंग्रजी) च्या उत्तरपुस्तिकेमध्ये भाग-1 (मराठी) चे प्रश्न सोडविल्यास, अशी उत्तरे तपासली जाणार नाहीत व ती दुर्लक्षित केली जातील.
- पारंपरिक स्वरुपाच्या उत्तरपुस्तिकेमध्ये उमेदवाराने प्रश्नांचे उपप्रश्न सोडविताना (अ. ब, क, ड किंवा 1,2,3,4) सलगरित्या सोडवावे.
- एक उपप्रश्न एका पानावर, तर दुसरा उपप्रश्न काही पृष्ठे सोडून अथवा अन्य पृष्ठावर सोडविल्यास असा उपप्रश्न दुर्लक्षित करण्यात येईल.
- भाषा पेपर क्रमांक 2 (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) मधील दोन्ही भागांकरीता एकच सामाईक उत्तरपत्रिका राहील.
MPSC Exam 2022: Qualifying Marks/किमान गुण
- लेखी परीक्षेमधून मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त होण्याकरीता शतमत (Percentile) पध्दत लागू आहे.
- प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळविणा-या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या तुलनेत खालीलप्रमाणे किमान शतमत गुण प्राप्त करणारे उमेदवार मुलाखतीच्या पात्रतेकरीता विचार करण्यास पात्र असतील:
No |
Category |
Minimum Percentile (%) |
1 |
अमागास/Non- Backward |
35 |
2 |
मागासवर्गीय/ Backward |
30 |
3 |
दिव्यांग/ Divyang |
20 |
4 |
खेळाडू/ players |
20 |
5 |
अनाथ/ Orphans |
30 |
MPSC Exam 2022: Interview/मुलाखत
- Eligible candidates will be called for the MPSC Rajyaseva interview test based on the MPSC main examination result as per the prescribed cutoff line.
- The interview will be of 100 marks.
- विहित सीमांकन रेषेनुसार लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.
- मुलाखत 100 गुणांची असेल.
- मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता जाहिरात/अधिसूचनेतील अर्हता/अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्राच्या आधारे तपासली जाईल आणि अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणा-या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
- विहित कागदपत्रे सादर करू न शकणा-या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल व त्याची मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच त्याकरीता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
- वरीलप्रमाणे लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणा-या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या कार्यक्रमानुसार तसेच आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व विहित वेळेस घेण्यात येतील.
Read the article in English, click here:
MPSC Rajyaseva Exam Pattern 2022
Related Links:
Related Important Links |
|
More From Us:
MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English
Important Government Schemes For MPSC
NCERT Books for MPSC State Exam 2022
Maharashtra State Board Books PDF
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
