hamburger

Marathi Grammar/ मराठी व्याकरण – वाक्यप्रचार, Download Study Material Notes PDF

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

महाराष्ट्र आरोग्य भरतीसाठी मराठी व्याकरण हा एक महत्त्वाचा विषय आहे तर आजच्या लेखात आपण मराठी व्याकरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे मराठी वाक्यप्रचार बघणार आहोत.

MPSC राज्यसेवा कोर्सची मोफत चाचणी सुरू करण्यासाठी क्लिक करा !

मराठी वाक्यप्रचार

मराठी भाषेतील वाक्यात शब्दसमूह वापरताना, त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या आणि विशिष्ट अर्थाने भाषेत सामान्य झालेल्या शब्दांच्या गटाला भाषेतील वाक्प्रचार असे म्हणतात.

अ.क्र.

वाक्यप्रचार

अर्थ

1

अर्ध्या वचनात असणे

उत्सुकतेने दुसऱ्यांचे शब्द झेलणे

2

अकरावा रुद्र असणे

अतिशय तापट असणे

3

कायापालट होणे

संपूर्ण बदल होणे

4

इंगा दाखविणे

सबक शिकवणे

5

अग्निदिव्य करणे

कठीण कसोटीतून पार पाडणे

6

इतिश्री करणे

समाप्त होणे, शेवट होणे

7

उघड्या माथ्याने मिरविणे

न लाजता फिरणे

8

अकलेचे तारे तोडणे

अविचाराने बडबड करणे

9

अरिष्ट ओढवणे

संकट येणे, आपत्ती येणे

10

कंकण हाती बांधणे

एखादे काम पडण्याची प्रतिज्ञा करणे

11

इजा बिजा तिजा

एकामागून एक असे तीन वेळा

12

उकळी फुटणे

अनुकूल प्रवृत्ती होणे

13

अकलेचा कांदा असणे

बेअकली असणे

14

काळजाचे पाणी होणे काळजाला फेस येणे

अति परिश्रमाने थकून जाणे

15

घबाड मिळणे

अचानक फायदा होणे

16

अमर होणे

कायमची कीर्ती प्राप्त करणे

17

कंठ दाटून येणे

गहिवरून येणे

18

कचाट्यात सापडणे

अडचणीत सापडणे

19

कंठ फुटणे

आवाज काढता येऊ लागणे

20

कळीचा नारद

भांडणे लावणारा

21

कंठ स्नान घालणे

शिरच्छेद करणे

22

उदक सोडणे

हक्क सोडणे

23

कंडी पीकणे

अफवा पसरणे

24

इनमीन साडेतीन

थोडेसे, नगण्य

25

इरेस पडणे

एखादी गोष्ट करण्याची जिद्द करणे

26

अडीच कांड्यावर येणे

वयात येणे

27

इरेस घालणे

आपल्या बचावासाठी दुसऱ्यास पुढे करणे

28

अति खाणे मसणात जाणे

आधाशीपणे खाल्ले तर त्याचे वाईट परिणाम होत असतात कधी कधी मरणही ओढवते.

29

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे

थोडीशी संपत्ती किंवा थोडेसे गुण प्राप्त झाले की गर्व करणे

30

उखळ पांढरे होणे

भरपूर पैसे मिळणे, नशीब उघडणे

31

उघडा पडणे

निराश्रित होणे, खरे स्वरूप प्रकट होणे

32

अन्न त्याग करणे

उपोषण करणे

33

अभय देणे

क्षमा करणे किंवा सुरक्षितपणाची हमी देणे

34

अघळपघळ भाषण करणे

भरपूर आणि मन मोकळे करून बोलणे

35

इंगळ्या डसणे

मनाला झोंबणे, वेदना होणे

36

उचलबांगडी करणे

बळजबरीने स्थलांतर करणे

37

उचलून गोष्ट सांगणे

विरोध दर्शविणे

38

कावकाव करणे

कटकट करणे

39

उठून जाणे

रागाने निघून जाणे

40

काळीज फाटणे

अतिशय दुःख होणे

41

उठता लाथ बसता बुक्की

सदासर्वदा मार

42

काळाने हात धरणे

परिस्थिती अनुकूल होणे

43

उणे उत्तर देणे

अपमानकारक जबाब देणे

44

खीळ बसणे

अडचणी येणे

45

उदो उदो करणे

जय जयकार करणे

46

काळीज काढून देणे

अतिशय प्रिय वस्तू देऊन टाकणे दुःख ग्रस्त होणे किंवा अतिशय घाबरणे

47

खनपटीस बसणे

एखाद्या गोष्टीच्या मागे सारखे लागणे

48

झाक गडणे

संध्याकाळ होणे

49

खूनगाठ बांधणे

निश्चय करणे

50

झील चढणे

मोठेपणा येणे

51

घर डोईवर घेणे

घरात गोंधळ करणे

52

कुसपट काढणे

भांडणाला निमित्त काढणे

53

झुग झुग जिणे

कसेबसे दिवस काढणे

54

कपाळाला आठ्या पडणे

नकोसे वाटणे

55

घरास काठी लावणे

घर उद्ध्वस्त करणे

56

झाडा घेणे

बारकाईने तपासणे

57

घर करणे

बिहाड करून राहणे

58

खडा टाकणे

अंदाज घेणे

59

झुंजूमुंजू होणे

पहाट होणे

60

खुशाल चेंडू

अत्यंत चैनी माणूस

61

झोप उडविणे

अस्वस्थ करून सोडणे

62

खायला काळ भुईला भार

निरुपयोगी मनुष्य

63

घरावर कुत्रे चढविणे

घरात भांडण उत्पन्न करणे

64

खरपूस ताकीद करणे

निक्षून सांगणे

65

घर भंगणे

घरात हिस्से पडणे

66

खापर फोडणे

दुसऱ्यावर दोष ठेवणे

67

घर उघडणे

संसार थाटणे

68

खलबत करणे

चर्चा करणे

69

झील उडणे

वैभव खालावणे

70

घर निघणे

आपला नवरा सोडून पर पुरुषाकडे जाऊन राहणे

71

झाकले माणिक

साधा पण गुणी मनुष्य

72

घडा फोडणे

रहस्य उघडकीस आणणे

73

कब्जा घेणे

ताब्यात घेणे

74

झेंडा नाचवणे

बढाया मारीत फिरणे

75

खिसा कातरणे

भामटेगिरी करणे

76

किंतु येणे

संशय वाटणे

77

खीळ घालणे

अडथळा आणणे

78

कोडकौतुक करणे

लाड करणे

79

खुळ लागणे

वेड लागणे

80

किल्ली फिरविणे

गुप्तपणे मन वळवणे

81

खो घालणे

कामात विघ्न आणणे

82

कोस पाडणे

बारकाईने कामाची पुन्हा पुन्हा चर्चा करणे

83

खोऱ्याने पैसा ओढणे

खूप पैसा मिळविणे

84

कुरघोडी करणे

दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणे

85

घटका भरणे

विनाशकाल जवळ येणे

86

उखळ पांढरे होणे

पुष्कळ द्रव्य मिळणे

87

केसाच्या अंबाड्या होणे

म्हातारपण येणे

88

कोनी निघणे

बाळंत होणे

89

केसाने गळा कापणे

विश्वासघात करणे

90

खसखस पिकणे

मोठ्याने हासणे

91

कुसर धरणे

मनात द्वेष करणे

92

कुत्रे होऊन राहणे

खुशामत करून पोट भरणे

93

झक मारणे

करून नये ती गोष्ट केली असे कबूल करणे

94

झगडा होणे

खलास होणे

95

खडे चोरणे

पराभव करणे

96

कुर्बान करणे

प्राण समर्पण करणे

97

घर दाखविणे

हाकलून देणे

98

कान टोचणे

चूक लक्षात आणून देणे.

99

उर भरून येणे

गदगदून येणे

100

काढता पाय घेणे

प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे

MPSC 2021 Special course for CSAT कोर्सची मोफत चाचणी सुरू करण्यासाठी क्लिक करा !

 या घटकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, येथे क्लिक करा:

मराठी वाक्यप्रचार, Download PDF मराठीमध्ये 

MPSC Combined Comprehensive कोर्सची मोफत चाचणी सुरू करण्यासाठी क्लिक करा !

Socio-Religious Movement Notes Indian States and Its Capitals
Important Days & Themes Basic Concepts of Physics
Important Dams in India Marathi Alankar

 More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य  

Marathi Grammar/ मराठी व्याकरण – वाक्यप्रचार, Download Study Material Notes PDF Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF’s & more, Join our Telegram Group Join Now
Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium