hamburger

Alankar Shabdh for Marathi grammar/ अलंकारिक शब्द-मराठी व्याकरण, Download Study Notes PDF

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

ज्याप्रमाणे अलंकार, पोशाख, केशरचना या मानवाच्या सौंदर्यात वाढवतात, त्याचप्रमाणे म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात.कमी शब्दांत व्यापक अर्थ अलंकारिक शब्दांतून व्यक्त केला जातो. अलंकारिक शब्दाचा शाब्दिक अर्थ विचारात न घेता त्याचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. आजच्या लेखात आपण मराठी व्याकरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे अलंकारिक शब्द बघणार आहोत.

In this article, we are going to look at an important element of Marathi grammar, the metaphorical word, Download Alankar Shabdh Study Material PDF.

Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

अलंकारिक शब्द/Alankar Shabdh

खाली दिलेल्या सारणी मध्ये अलंकार शब्द आणि त्यांचे अर्थ देण्यात आले आहेत. हा घटक MPSC राज्यसेवाMPSC संयुक्त MPSC CDPOMPSC गट क आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

Alankar Shabdh for Marathi grammar/ अलंकारिक शब्द-मराठी व्याकरण, Download Study Notes PDF

 

The table below gives the metaphorical words and their meanings.

1

काडी पहेलवान

हडकुळा

2

चामुंडा

भांडखोर व कजाग वृत्तीची स्त्री

3

उंटावरचा शहाणा

मूर्खपणाचा सल्ला देणारा

4

उंबराचे फूल

दुर्मिळ वस्तू

5

चौदावे रत्न

भरपूर मार देणे

6

कर्णाचा अवतार

उदार मनुष्य

7

चतुराई

हुशारी

8

कळसूत्री बाहुले

दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा

9

चंद्रमौळी घर

गरिबाचे मोडकेतोडके घर,अतिशय दारिद्रय

10

जमदग्नीचा अवतार

रागीट

11

चुटक्याचे मांडव

पोकळ प्रतिष्ठेचे बोलणे

12

दगडावरची रेघ

कधीही न बदलणारे

13

चतुर साबाजी

मूर्ख मनुष्य

14

देवमाणूस

चांगला सज्जन

15

चौदा चौकड्यांचे राज्य

चिरकाल टिकणारे राज्य

16

बोकेसंन्यासी

ढोंगी मनुष्य

17

चंडिका

रागीट व कजाग स्त्री

18

भगीरथ प्रयत्न

आटोकाट प्रयत्न

19

चिटपाखरू

कोणीही नसणे

20

भीष्मप्रतिज्ञा

कठीण प्रतिज्ञा

21

चर्पटपंजरी

पाल्हाळ, निरर्थक व लांबलचक भाषण

22

मायेचा पूत

पराक्रमी मनुष्य,मायाळू

23

आकाशाची कुऱ्हाड

निसर्गाने आकस्मात आणलेले भयंकर संकट

24

चारशे वीस

बदमाश व्यक्ती

25

जमीन अस्मानचे अंतर

दोन विरोधी गोष्टी

26

नवकोट नारायण

खूप श्रीमंत

27

पर्वणी

अतिशय दुर्मिळ रोग

28

पांढरा कावळा

निसर्गात नसलेली वस्तू

29

पिकले पान

म्हातारा

30

बृहस्पती

बुद्धिमान

31

36 चा आकडा

शत्रुत्व

32

भित्री भागूबाई

पुळचट मनुष्य

33

फकिरी बाणा

साधेपणाने राहणारा

34

भस्मासूर

विनाश करणारा

35

नंदीबैल

हो ला हो म्हणणारा

36

भोळा सांब

भोळा माणूस पोकळ कल्पना

37

फाल्गुनी वाद्य

बोंब, शंख

38

भ्रमाचा भोपळा

निष्क्रिय व्यक्ती

39

खडाजंगी

मोठी भांडण

40

फुगीर चोट

नसती फुशारकी दाखवणारा

41

जरत्कारू

अशक्त व्यक्ती

42

आंधळा कारभार

अंदाधुंदीचा कारभार

43

जमालगोटा

अत्यंत जालीम उपाय

44

अष्टपैलू

सर्वांचा मित्र अनेक बाबतीत प्रवीण असलेली व्यक्ती

45

अभिजात

उच्च दर्जाचा

46

धुतला तांदूळ

निर्मळ मनाचा माणूस

47

अजातशत्रू

शत्रू नसलेला

48

धूळभेट

उभ्या उभ्या घेतलेली थोड्या वेळाची भेट

49

धन्वंतरी

कुशल वैद्य

50

फुकट फौजदार

उगाचच उठाठेव करणारा

51

ध्रुवतारा

समोर असलेले आदर्श, ध्येय

52

धारवाडी काटा

न्यायाने वागणारा, बिनचूक,वजनाचा काटा

53

अडेलतट्टू

अत्यंत हट्टी, आपलाच हेका चालविणारी

54

भद्रेश्वर दीक्षिती

मध्यस्थी करणे

55

फुटका मणी

क्षुल्लक वस्तू

56

भिजत घोंगडे

लांबणीवर पडलेले काम

57

आंधळ्याची माळ

अंधश्रद्धेने वागणाऱ्या मूर्ख लोकांची चौकडी

58

अळवावरचे पाणी

क्षणभंगुर गोष्ट, जास्त वेळ न टिकणारे

59

भाकडकथा

निरर्थक गोष्ट

60

फुगीर दोडका

गर्विष्ठ, बढाई खोर

61

भानामती

जादू, जादूगारीण

62

धुमचश्चक्री

घनघोर युद्ध

63

भांगेत तुळस

वाईट आईवडिलांपोटी चांगली संतती, दुवर्तनी पित्याचा

64

अव्वाच्या सव्वा

आहे त्यापेक्षा जास्त सांगण्याची वृत्ती

65

भाड्याचा बैल

खायला न देता कामाला जुंपलेला

66

आकाशाची कुऱ्हाड

निसर्गाने आकस्मात आणलेले भयंकर संकट

67

अकबरी प्रथा

चांगली प्रथा

68

जिवाची मुंबई

चैन करणे, अतिशय मौजमजा करणे

69

भारूड

कंटाळवाणे लांबलचक कथन

70

धनदांडगा

संपत्तीमुळे शेफारलेला

71

भरतभेट

फार काळाने झालेली दोन प्रियजनांची भेट

72

फटाकडी

चुणचुणीत सुंदर मुलगी

73

अठराविश्वे दारिद्रय

अत्यंत दारिद्रयावस्था

74

जांबुवंत

म्हातारा व अनुभवी नेता

75

जीवश्च कंठश्च

अत्यंत जिवलग मित्र

76

जमदग्नी

अत्यंत रागीट मनुष्य, शीघ्रकोपी मनुष्य/संतापी

77

जावयाचा बेटा

निरुपयोगी आप्त

78

जखमेवर मीठ

आधीच्या दुःखात पुन्हा अपमान

79

जुलमाचा रामराम

बळजबरीने करावे लागणारे काम

80

जिभेचा पट्टा

तोंडाला येईल ते बोलणे

81

आळशावर गंगा

एखादे कार्य न करता झालेला लाभ

82

आंबट द्राक्ष

मिळण्यास कठीण असलेल्या गोष्टीला नावे ठेवणे

83

पाण्यावरील बुडबुडा

क्षणभंगूर गोष्ट

84

पिकलेले पान

अतिशय वृद्ध मनुष्य

85

पोलादी पुरुष

करारी मनुष्य

86

पराचा कावळा

एखादी गोष्ट वाढवून सांगणे,अतिशयोक्ती करणे

87

पिंपळावरचा मुंजा

सतत भटकंती करणारा

88

पायातील काटा

मार्गातील अडथळा

89

पांढरे कपाळ

दुदैवीं स्त्री, वैधव्य येणे

90

पाप्याचे पितर

रोडका, सडपातळ दुबला मनुष्य

91

पढतमूर्ख

पुस्तकी ज्ञानाने शहाणा,शिकलेला पण मूर्ख मनुष्य

92

पोटचा गोळा

स्वतःचे मूलबाळ

93

पांढरा परीस

निरुपयोगी पण थोड काळ

94

पाण्यावरील रेघ

टिकणारी वस्तू

95

सिंहावलोकन

गतकाळाचे अवलोकन

96

सरड्याची धाव

बुद्धीचा तोकडेपणा

97

सोनेरी टोळी

लबाडांची टोळी

98

सुलतानशाही

जुलमी कारभार

99

सशाचे शिंग

अस्तित्वात नसलेली गोष्ट

100

सतीसावित्री

पतिव्रता स्त्री

या घटकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, येथे क्लिक करा:

अलंकारिक शब्द, Download PDF मराठीमध्ये

Related Important Articles:

संविधानाची ऐतिहासिक उत्क्रांती

भारताचे राष्ट्रपती

1857 चा उठाव

भारताचा प्राकृतिक भूगोल

शेतकरी उठाव

राष्ट्रीय उत्पन्न

More From Us:

Maharashtra Static GK 

MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English

Important Government Schemes For MPSC 

NCERT Books for MPSC State Exam 2022

Maharashtra State Board Books PDF

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Download BYJU’S Exam Prep App

Alankar Shabdh for Marathi grammar/ अलंकारिक शब्द-मराठी व्याकरण, Download Study Notes PDF Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF’s & more, Join our Telegram Group Join Now
Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium