MPSC Subordinate Services Salary 2021 - Salary and Job Profile in Marathi /पगार आणि नोकरी प्रोफाइल

By Saroj Singh|Updated : October 28th, 2021

सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या पदांवरील भरती करता राज्य लोकसेवा आयोग संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करते. म्हणजे PSI, STI and  ASO या तिन्ही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समानच असते.  पण प्रत्येक पदासाठीचा या संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल वेगवेगळा घोषित करण्यात येतो. आणि त्यांची मुख्य परीक्षाही वेगवेगळी घेतली जाते. म्हणजे त्यांचे मुक्य परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम भिन्नभिन्न असते. PSI, STI आणि ASO या तिन्ही पदांपैकी फक्त PSI साठी शारीरिक चाचणी आणि मुलाखत असते. STI आणि ASO या दोन्ही पदांसाठी फक्त मुख्य परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात. मुख्य परीक्षा २०० गुणांची असते. याच  २०० गुणांवर STI आणि ASO ची अंतिम यादी जाहीर होते. PSI पदासाठी मात्र आणखी दोन टप्पे म्हणजे शारीरिक चाचणी १०० गुणांसाठी आणि मुलाखत ४० गुणांपैकी केली जाते. चला आता आपण या पदांपाद्द्ल आणखी माहिती देऊया.

MPSC Combined Comprehensive कोर्सची मोफत चाचणी सुरू करण्यासाठी क्लिक करा !

MPSC अधीनस्थ सेवा (संयुक्त) परीक्षा: वेतन आणि जॉब प्रोफाइल

 

PSI, STI and  ASO या तिन्ही पदांचे पगार रु .३८,६००/- ते १,२२,८००/- दरमहा यांच्या दरम्यान भेटते. 

PSI: Police Sub Inspector / पोलिस उपनिरीक्षक 

कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या: 

पोलीस उपनिरीक्षक हा त्याच्यापेक्षा वरचा अधिकारी आणि त्याच्या खाली असलेल्या कॉन्स्टेबल्स मधील सर्वात महत्वाचा अधिकारी आहे. तो सामान्यतः पहिला तपास अधिकारी असतो जो भारतीय पोलिसांच्या कायदा आणि नियमांनुसार न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकतो. सामान्यत: ग्रामीण पोलीस ठाणे आणि लहान पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक (PSI) कडे देण्यात येतात. तेथे तो  SHO (स्टेशन हाऊस ऑफिसर) म्हणून ओळखला जातो. मध्यम स्तरीय आणि अवजड पोलीस ठाण्यांचे व्यवस्थापन पोलीस निरीक्षक (PI) पदाच्या अधिकाऱ्यांद्वारे केले जाते. प्रोमोशन च्या आधारे तो सहाय्यक पोलीस निरीक्षक (Asst. PI) आणि नंतर त्याही वरच्या पदावर जाऊ शकतो.   

वेतन: ९३००-३४८०० /- ग्रेड पे रुपये + ४३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते. 

STI: Sales tax Inspector / राज्य कर निरीक्षक 

कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या: 

राज्य कर निरीक्षक विक्रेत्यांकडून विक्रीकर भरण्याशी संबंधित प्रकरणे हाताळतात. त्यात थकबाकीदारांशी संपर्क साधून त्यांना कर भरण्याबाबत माहिती देणे आणि लागेलतर त्याअंतर्गत नोटीस पाठविणे या जबाबदाऱ्या असतात. अटॅचमेंट वा वॉरंट च्या अंमलबजावणीसाठी राज्य कर निरीक्षक (STI) ला व्यवसाय, दुकान, कारखाना, गोडाऊन इत्यादींना भेटीही द्यावी लागतात. मालमत्तेच्या लिलावाचा पंचनामा काढणे आणि ऑक्शन दरम्यान उपस्थित राहणे हेही काम त्याच्या कडे असते.  STI पुढे प्रोमोशने विक्री कर अधिकारी बनू शकतो. 

वेतन: ९३००-३४८०० /- ग्रेड पे रुपये + ४३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते. 

ASO: Assistant Section Officer / सहाय्यक कक्ष अधिकारी 

कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या: 

ASO पदाची नियुक्ती मंत्रालयाती (मुंबई) भिन्नभिन्न विभागात होऊ शकते. काही जागा MPSC च्या कार्यालयातही असतात. म्हणजे त्याचे सहाय्यकाचे काम विभागानुसार बदलू शकते.  प्रोमोशनमुळे ASO ला  “सेक्शन ऑफिस” चे पद मिळू शकते.  

वेतन: ९३००-३४८०० /- ग्रेड पे रुपये + ४३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.  

More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य  

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment

Follow us for latest updates