दैनिक चालू घडामोडी 11.08.2022
न्या. यू. यू. लळित यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती
बातम्यांमध्ये का:
- न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांची बुधवारी देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते देशाचे ४९ वे सरन्यायाधीश आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लळित यांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केली. २७ ऑगस्ट रोजी न्या. लळित यांचा शपथविधी होणार आहे.
मूख्य मुद्दे
- सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट रोजी समाप्त होत असल्याने दुसऱ्या दिवशी न्या. लळित कार्यभार स्वीकारतील.
- केवळ तीन महिने न्या. लळित या पदावर असतील. ८ नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे.
- न्या. लळित हे दुसरे सरन्यायाधीश असतील, ज्यांना वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात स्थान देण्यात आले.
- १९७१मध्ये एस. एम. सिक्री यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली, जे मार्च १९६४मध्ये थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात नियुक्त झालेले पहिले वकील होते.
लळित यांच्याविषयी..
- ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. यू. यू. लळित यांचा जन्म झाला. त्यांचे पिता यू. आर. लळित हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायाधीश होते.
- न्या. लळित यांनी मुंबई उच्च न्यायालयात जून १९८३ मध्ये वकिलीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १९८६पासून दिल्ली न्यायालयात वकिली केली. एप्रिल २००४ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त झाले.
- १३ ऑगस्ट २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
- सर्वोच्च न्यायालयातील अनेक ऐतिहासिक निकालांचा ते भाग होते. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ऑगस्ट २०१७ मध्ये ३-२ अशा बहुमताने ‘तिहेरी तलाक’ घटनाबाह्य असल्याचा निकाल दिला होता.
- या तीन न्यायाधीशांमध्ये न्या. लळित यांचाही समावेश होता.
Source: Loksataa
रुपी बँकेचा परवाना रद्द
बातम्यांमध्ये का:
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) अर्थात RBI ने राज्यातील अजून एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केलीय. आरबीआयने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा (Rupee Cooperative Bank) परवानाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मूख्य मुद्दे
- मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशानंतर आरबीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे. महत्वाची बाब म्हणजे आरबीआयचा हा आदेश आजपासून सहा आठवड्यानंतर अर्थात 22 सप्टेंबर 2022 पासून लागू होईल, अशी माहिती आरबीआयकडून देण्यात आलीय.
- आरबीआयने 8 ऑगस्ट 2022 च्या आदेशानुसार रुपी को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, पुणे या बँकेचा परवाना रद्द केला आहे.
- त्यामुळे 22 सप्टेंबर 2022 बँकेला गाशा गुंडाळावा लागेल. सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक यांनाही बँक बंद करण्याबाबत आदेश जारी करण्याचे आणि त्यासाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती करण्यात आली आहे.
बँकेचा परवाना रद्द करण्याचं कारण काय?
- बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईची शक्यताही नाही. त्यामुळे ते बँक कायदा 1949 च्या कलम 56 सह कलम 11 (1) आणि कलम 22 (3) (d)मधील तरतुदींचं पालन झालं नाही
- बँक कलम 22(3) (A), 22 (3) (B), 22(3)(C), 22(3) (D) आणि 22(3)(E) अंतर्गत असलेल्या गरजांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली
- बँक चालू ठेवणे ठेविदारांच्या हिताविरोधात आहे.
- सध्याच्या आर्थिक स्थितीनुसार बँक ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही
- बँकेला व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
रुपी बँकेला बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई
- बँकेचा परवाना रद्द केल्यामुळे रुपी बँकेला बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई असेल. त्यात अन्य गोष्टींप्रमाणे ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे या गोष्टींचाही समावेश आहे.
- दरम्यान, लिक्विडेशनवर सर्व ठेवीदारांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून 5 लाखाच्या मर्यादेपर्यंतच्या ठेवींचा ठेव विमा दाव्याची रक्कम मिळवण्याचा अधिकार असेल.
- बँकेनं सादर केलेल्या आकडेवारीनुसार 99 टक्क्यांपेक्षा जास्त ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची सर्व रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार आहे.
- DICGC कडून 18 मे 2022 पर्यंत ठेवीदारांच्या मागणीनुसार एकूण विमान उतरलेल्या ठेवींपैकी 700.44 कोटी रुपये आधीच भरले आहेत.
Source: TV9Marathi
आजच्या संपूर्ण चालू घडामोडी तुम्हाला खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये मिळतील. या घटकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, येथे क्लिक करा:
दैनिक चालू घडामोडी-11 August 2022, Download PDF
Daily Current Affairs-11 August 2022, Download PDF
More From Us:
MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English
Important Government Schemes For MPSC
NCERT Books for MPSC State Exam 2022
Maharashtra State Board Books PDF
Comments
write a comment