दैनिक चालू घडामोडी - MPSC Daily Current Affairs 07 October 2022

By Ganesh Mankar|Updated : October 7th, 2022

चालू घडामोडी हा कोणत्याही स्पर्धा परीक्षांमधील एक महत्त्वाचा घटक आहे.चालू घडामोडी या एमपीएससी राज्यसेवाएमपीएससी संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षामहाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

The following daily current affairs news is taken from reliable sources like PIB, AIR News, Loksatta, The Hindu, and Indian Express. You can also download the current affairs PDF in Marathi & English.

byjusexamprep

दैनिक चालू घडामोडी 07.10.2022

ऍस्पेक्ट, क्लॉजर आणि झेलिंगर यांना भौतिकशास्त्राचे नोबेल

byjusexamprep

  • भौतिकशास्त्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार तीन शास्त्रनांना विभागून जाहीर झाला आहे. त्यांनी क्‍वांटम इनफॉरमेशन सायन्समध्ये केलेल्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार मंगळवारी जाहीर केला आहे.
  • अ‍ॅलेन ऍस्पेक्ट, जॉन एफ क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर, अशी पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांची नावे आहेत. रॉयल स्वीडिश अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सचे सचिव हान्स एलग्रीन विजेत्यांची नावे मंगळावारी जाहीर केली. 
  • त्यांच्या संशोधनाचा फायदा गुप्‍तचर क्षेत्रासाठी मोठा होणार आहे. दरम्यान, सोमवारी मानवी उत्क्रांतीच्या संशोधनाचे नोबेल स्वीडनचे स्वांते पाबो यांना जाहीर झाले होते. त्यानंतर मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
  • अॅलेन आस्पेक्ट हे फ्रान्सचे आहे. 
  • ते पॅरिस आणि स्केले यूनिवर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत. जॉन एफ क्लॉजर हे अमेरिकन संशोधक आणि प्राध्यापक आहेत. अँटोन झेलिंगर हे ऑस्ट्रियातील व्हिएन विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि संशोधक आहेत.

2021 मध्ये देखील तीन वैज्ञानिकांना मिळाला होता पुरस्कार 

  • 2021 मध्ये देखील भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार तीन वैज्ञानिकांना मिळाला होता. स्यूकुरो मानेबे, क्लॉस हॅसलमॅन आणि जियोर्जियो पेरिसी यांना गेल्यावर्षी भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

Source: ABP MAZA

जम्मू-काश्मीरमध्ये गुर्जर, बकरवाल, पहाडी समाजाला आरक्षण

byjusexamprep

  • ‘‘जम्मू-काश्मीरमधील गुर्जर, बकरवाल आणि पहाडी समाजाला शर्मा आयोगाच्या शिफारशींनुसार आरक्षणाचा लाभ मिळेल,’’ अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केली होती. 
  • 2019 मध्ये राज्यघटनेतील अनुच्छेद 370 रद्द करण्यात आल्याने जम्मू-काश्मीरमधील समाजातील वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला.
  • न्यायमूर्ती शर्मा आयोगाने या संदर्भात शिफारस केली असून त्यात पहाडी, बकरवाल आणि गुर्जर यांचा अनुसूचित जाती आरक्षणाचा त्यात समावेश आहे. 

परिसीमनानंतर एसटीसाठी 10 टक्के आरक्षण

  • नुकत्याच पार पडलेल्या परिसीमन कवायतीनंतर, प्रथमच, जम्मू आणि काश्मीर विधानसभेत अनुसूचित जमातींना 10 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
  • अनुसूचित जमातीसाठी नऊ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर सात जागा अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव आहेत.

Source: Loksatta

रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार कॅरोलिन बर्टोझ्झी, मॉर्टन मेल्डल, आणि बॅरी शार्पलेस यांना जाहीर

byjusexamprep

  • क्लिक केमिस्ट्री आणि बायोऑर्थोगोनल केमिस्ट्रीचा विकास या विषयात केलेल्या संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्काराची घोषणा झालेली आहे.
  • कॅरोलिन आर. बर्टोझी, मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस यांना हा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसनं या पुरस्काराची घोषणा केलेली आहे.
  • कॅरोलिन ह्या रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातील अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात. शार्पलेस हे अमेरिकेतील शास्त्रज्ञ आहेत. स्टिरिओसेलेक्टिव्ह रिअॅक्शन आणि क्लिक केमिस्ट्रीचे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती आहे. तर मार्टन मेल्डल हे डेन्मार्क येथील कोपनहेगन विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
  • शार्पलेस हे 81 वर्षीय आहेत. त्यांना यापूर्वी 2001 मध्ये इतर दोन शास्त्रज्ञांसह या पुरस्काराने गौरविण्यात आलेले होते. बायोर्थोगोनल प्रणालीमुळे कर्करोगावरील संशोधन सुकर होऊ शकले असल्याचं पुरस्कार देणाऱ्या संस्थेनं म्हटलं आहे. एक पदक, 10 दशलक्ष स्वीडिन क्राऊन किंवा $915,072 पुरस्कार स्वरुपात प्रदान केले जातात. शनिवार, दि. 10 डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Source: Sakal

साखर निर्यातीत भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश

byjusexamprep

  • भारत हा साखरेचा जगातला सर्वात मोठा उत्पादक, आणि दुसऱ्या क्रमाकांचा निर्यातदार देश ठरला आहे.
  • साखर हंगाम (ऑक्टोबर -सप्टेंबर) 2021-22 मध्ये, देशात 5000 लाख मेट्रिक टन (एलएमटी) पेक्षा जास्त उसाचे विक्रमी उत्पादन झाले. 
  • त्यापैकी सुमारे 3574 एलएमटी उसाचे गाळप साखर कारखान्यांनी केले आणि सुमारे 394 एलएमटी सुक्रोजचे किंवा नैसर्गिक साखरेचे उत्पादन घेतले. 
  • यापैकी 35 एलएमटी साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवण्यात आली आणि साखर कारखान्यांकडून 359 एलएमटी साखर तयार करण्यात आली.
  •  यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि सर्वाधिक ग्राहक असलेला तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश ठरला आहे.
  • हंगामातील आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही आर्थिक साहाय्याशिवाय आत्तापर्यंतची सर्वाधिक म्हणजे सुमारे 109.8 एलएमटी इतकी विक्रमी साखर निर्यात झाली. 
  • आधारभूत आंतरराष्ट्रीय किमती आणि भारत सरकारच्या धोरणामुळे भारतीय साखर उद्योगाने हे यश साध्य केले. 
  • या निर्यातीतून देशासाठी 40,000 कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले.
  • इथेनॉलच्या विक्रीतून 2021-22 मध्ये साखर कारखानदार/डिस्टिलरींनी सुमारे 18,000 कोटी रुपयांचा महसूल कमावला. यामुळे शेतकऱ्यांची उसाची थकबाकी लवकरात लवकर देण्यात मोठी मदत झाली आहे. 
  • उसाची मळी /साखर-आधारित डिस्टिलरीजची इथेनॉल उत्पादन क्षमता वर्षाला 605 कोटी लिटरपर्यंत वाढली आहे आणि पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत 2025 पर्यंत 20% मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दिशेने प्रगती सुरू आहे.

Source: hindusthanpost

राज्यातल्या रेशनकार्डधारक सुमारे पावणे 2 कोटी कुटुंबांना 100 रुपयांचं दिवाळीच्या फराळाचं साहित्य देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

byjusexamprep

  • दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या पावणे 2 कोटी कुटुंबांना अवघ्या 100 रुपयात फराळासाठी आवश्यक साहित्य देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
  • शिधापत्रिकाधारकांना रवा, चणाडाळ आणि साखर प्रत्येकी एक किलो आणि 1 लिटर पामतेल दिलं जाणार आहे. 
  • यासाठी 513 कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे.
  • या निर्णयाचा राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे. 

Source: AIR

बँक ग्राहकांना ‘सोवा’ व्हायरसचा धोका

byjusexamprep

  • देशातील आघाडीच्या बँकांकडून त्यांच्या ग्राहकांना पैशांच्या सुरक्षिततेबाबत संदेश पाठवला जात आहे. मौल्यवान मालमत्तेवर ‘सोवा’ व्हायरस हल्ला करू शकतो असे एसबीआय, पीएनबी आणि कॅनेरा बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. “सोवा व्हायरस तुमची संपत्ती चोरू शकतो. 
  • त्यामुळे नेहमी विश्वसनीय प्लॅटफॉर्मवरुनच अ‍ॅप्स डाऊनलोड करा’ अशा आशयाचे ट्वीट एसबीआयने केले आहे.

‘सोवा’ व्हायरस काय आहे?

  • सोवा’ हे एक ‘अँन्ड्राईड बँकिंग ट्रोजन मॅलवेअर’ आहे. हा मॅलवेअर बँकेच्या अ‍ॅप्समधून ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरत असल्याचे एसबीआयने सांगितले आहे. 
  • जेव्हा वापरकर्ते नेट बँकिंगच्या अ‍ॅपमध्ये लॉग इन करतात तेव्हा या मॅलवेअरकडून ग्राहकांचा तपशील चोरून बँक खात्यांवर नियंत्रण मिळवले जाते. 
  • हा मॅलवेअर एकदा इंस्टॉल झाल्यानंतर त्याला काढून टाकणे अशक्य आहे.

‘सोवा’ ट्रोजन कसं काम करतो?

  • इतर बँकिंग ट्रोजनप्रमाणेच ‘सोवा’ मॅलवेअर एसएमएसद्वारे ग्राहकांच्या फोनवर पाठवला जातो. 
  • हे बनावट अ‍ॅप एकदा फोनवर इंस्टॉल झाल्यानंतर फोनमधील अ‍ॅप्सची यादी कमांड आणि कंट्रोल सर्व्हरला पाठवली जाते. 
  • हे सर्व्हर सायबर हल्लेखोरांच्या नियंत्रणात असते. या प्रक्रियेतून सायबर हल्लेखोरांना ग्राहकांच्या फोनमधील अ‍ॅप्सची यादी मिळते. 
  • ही यादी मिळाल्यानंतर ग्राहकांच्या खात्यावरुन आर्थिक गैरव्यवहार केले जातात.

Source: Loksatta

निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेत सुधारणांचा प्रस्ताव

byjusexamprep

  • निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफत भेट, योजनांची आश्वासने, घोषणांबाबत निवडणूक आयोगाने आचारसंहितेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव राजकीय पक्षांसमोर ठेवला आहे. निवडणूक आश्वासनांतील आर्थिक व्यवहार्यता आणि तथ्यांबाबत मतदारांना संपूर्ण माहिती देण्याबाबत आयोगाने पक्षांचे मत मागवले आहे.
  • ‘‘निवडणूक आश्वासनांबाबत अपुरी माहिती आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या पोकळ निवडणूक आश्वासनांचे दूरगामी परिणाम होतात. निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांमागील औचित्य दिसले पाहिजे. आश्वासनांत पारदर्शकता, विश्वासार्हता हवी. 
  • ती पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूद कशी आणि कोणत्या माध्यमातून केली जाईल, हे मतदारांना सांगितले पाहिजे. त्यामुळे आश्वासनांची पूर्तता करताना होणाऱ्या आर्थिक परिणामाची माहिती मिळाल्यानंतर मतदार योग्य निर्णय घेऊ शकतील’’, असे आयोगाने राजकीय पक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
  •  आयोगाने सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना १९ ऑक्टोबपर्यंत आपली मते मांडण्यास सांगितले आहे. 

Source: Loksatta

राष्ट्रकुल स्पर्धेतून कुस्तीला वगळले! ; 2026च्या स्पर्धेसाठी नेमबाजीचा समावेश

byjusexamprep

  • ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचे पुनरागमन होणार असून कुस्ती आणि तिरंदाजी या खेळांना मात्र स्पर्धेतून वगळण्यात आले आहे.
  • राष्ट्रकुल क्रीडा महासंघ (सीजीएफ) आणि राष्ट्रकुल क्रीडा ऑस्ट्रेलियाने मिळून बुधवारी 2026 च्या स्पर्धेसाठीच्या खेळांची यादी जाहीर केली. यात 20 खेळ आणि 26 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
  • या वर्षी बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वादग्रस्तरीत्या वगळण्यात आले होते. मात्र, 2026च्या स्पर्धेत नेमबाजीचे पुनरागमन होणे ही भारतासाठी सकारात्मक बाब आहे. 
  • राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारताला सर्वाधिक 135 पदके (63 सुवर्ण, 44 रौप्य व 28 कांस्य) ही नेमबाजीत मिळाली आहे. 
  • 2018 च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला एकूण पदकांपैकी 25 टक्के पदके ही नेमबाजांनी मिळवून दिली होती. या स्पर्धेत भारताने एकूण 66 पदके जिंकली होती, ज्यापैकी 16 पदके (7 सुवर्ण, 4 रौप्य, 5 कांस्य) नेमबाजीत मिळाली होती.  
  • कुस्तीला राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळण्यात येणे हा भारतासाठी खूप मोठा धक्का आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला कुस्तीपटूंनी वर्चस्व गाजवताना सर्व 12 वजनी गटांत पदके (6 सुवर्ण, 1 रौप्य, 5 कांस्य) पटकावली होती. 2010 पासून सलग चार पर्वामध्ये कुस्तीचा समावेश होता. 

Source: Loksatta

श्रीजेश, सविता सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ; ‘एफआयएच’कडून सलग दुसऱ्या वर्षी सन्मान

byjusexamprep

  •  भारतीय हॉकी संघांचे गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि सविता पुनियाची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून (एफआयएच) सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली. ‘एफआयएच’ने बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली.
  • श्रीजेशने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी मधील सर्व 16 सामने खेळताना आपले महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केले. भारताने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने रौप्यपदकाची कमाई केली आणि या स्पर्धेतही श्रीजेश सहाही सामने खेळला होता. 
  • एफआयएच’ने घेतलेल्या मतदानात श्रीजेशला सर्वाधिक 39.9 टक्के मते मिळाली. त्याने बेल्जियमचा लॉईक व्हॅन डोरेन (26.3 गुण), नेदरलँड्सचा प्रिमिन ब्लाक (23.2 गुणे) यांना मागे टाकले. 
  • या पुरस्काराला 2014 पासून सुरुवात झाली आणि त्यानंतर हा सन्मान मिळविणारी सविता तिसरी भारतीय खेळाडू ठरली. 

Source: Loksatta

फर्स्ट ट्रेनिंग स्क्वाड्रन कुवैतमध्ये दाखल

  • आयएनएस तीर, सुजाता आणि सीजीएस सारथी या जहाजांचा समावेश असलेली पहिली ट्रेनिंग स्क्वॉड्रन (1TS) 04 ऑक्टोबर 22 रोजी पोर्ट अल-शुवैख, कुवेत येथे दाखल झाले. ही जहाजे आपल्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून पर्शियन आखाताला भेट देत आहेत.
  • कुवैती नौदल दलातील वरिष्ठ अधिकारी, सीमा सुरक्षा दल, भारतीय दूतावासाचे अधिकारी आणि शाळकरी मुलांनी या जहाजांचे भव्य स्वागत केले. या जहाजांच्या तीन दिवसांच्या बंदर भेटीमध्ये व्यावसायिक चर्चा, परस्परांच्या जहाजांना भेटी, स्थानिक समुदायाबरोबर भेट आणि सामाजिक संवाद अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.
  • फर्स्ट ट्रेनिंग स्क्वॉड्रनची जहाजे कोची येथे स्थित भारतीय नौदलाच्या प्रशिक्षण कमांडच्या दक्षिणी नौदल कमांडचा भाग आहेत.
  • प्रशिक्षणार्थींना समुद्रातील विविध प्रकारच्या घडामोडी आणि बंदरांचा परिचय करून देणे हे फर्स्ट ट्रेनिंग स्क्वॉड्रनच्या भेटीचे उद्दिष्ट आहे. या भेटीमुळे प्रशिक्षणार्थींना देशाच्या सागरी क्षेत्रातील शेजारील मित्र राष्ट्रांशी भारताचे सामाजिक राजकीय, लष्करी आणि सागरी संबंध जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.

Source: PIB

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023

byjusexamprep

  • आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष - 2023 साजरे करण्याच्या दृष्टीने, भरड धान्याच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून आखण्यात आलेल्या उपक्रमांना चालना देण्याच्या अनुषंगाने, कृषी आणि कृषक कल्याण विभाग आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ मर्यादित - नाफेड, यांच्यातील सामंजस्य करारावर काल नवी दिल्ली इथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांसमोर प्रस्तावित केलेला आणि जगभरात साजरा होणारा “आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (आयवायओएम) - 2023” हा उपक्रम लक्षात घेऊन, भरड धान्य - आधारित उत्पादनांच्या प्रचार आणि विपणनासाठी दोन्ही संस्था एकत्र काम करतील, या अनुषंगाने हा करार करण्यात आला आहे. जगभरात भरड धान्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारत तयारी करत असून देशभरातील भरड धान्यावर आधारित उत्पादनांच्या वापरात जास्तीत जास्त वाढ करण्याच्या दृष्टीने, या दोन्ही संस्था भरड धान्य - आधारित उत्पादनांना पाठबळ देतील, व्यवस्थापन, प्रचार करतील आणि बाजारपेठा उपलब्ध करून देतील.

Source: PIB

7 ऑक्टोबर - जागतिक कापूस दिवस

byjusexamprep

  • कापसाचे महत्त्व ओळखण्यासाठी दरवर्षी 7 ऑक्टोबर रोजी जागतिक कापूस दिन साजरा केला जातो. कापसाची जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
  • जागतिक कापूस दिवस 2021 ची थीम: ‘Cotton for Good.’
  • 2019 रोजी पहिला जागतिक कापूस दिवस साजरा केला गेला. या वेळी महात्मा गांधी यांना जागतिक कापूस दिनाचे ‘आयकॉन’ म्हणून निवडले गेले होते आणि पहिल्या जागतिक कापूस दिनाचे औचित्य साधून भारत ‘डब्ल्यूटीओ’ला महात्मा गांधींच्या चरख्याची प्रतिकृती देली होती.
  • जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक भारत आहे, म्हणून जागतिक कापूस दिनाचे समर्थन देत जागतिक बाजारपेठ म्हणून कापसाचे महत्त्व ओळखण्याची संधी आणि त्याही महत्त्वाचे म्हणजे लाखो लघु व सीमांत शेतकऱ्यांच्या रोजी रोटीचे स्रोत आहे. दु
  • सऱ्या जागतिक कापूस दिनी भारतीय कापसासाठी प्रथमच ब्रँड आणि लोगोचा शुभारंभ केला गेला. जागतिक कापूस बाजारात आता भारताचे प्रमुख सूत ‘कस्तुरी सूत’ म्हणून ओळखले जाईल.

Source: marathisrushti

आजच्या संपूर्ण चालू घडामोडी तुम्हाला खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये मिळतील. या घटकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, येथे क्लिक करा:

दैनिक चालू घडामोडी-07 October 2022, Download PDF

Daily Current Affairs-07 October 2022, Download PDF (To be notified)

More from us:

Candidates can check the relevant links given below for more comprehensive preparation for the upcoming MPSC Exam:

Important Links
Maharashtra Static GK Maharashtra State Board Books PDF
MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & EnglishMPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
Important Government Schemes For MPSC MPSC Free Exam Preparation

Comments

write a comment

Follow us for latest updates