नाशिक जिल्हा माहिती/ Nashik District

By Ganesh Mankar|Updated : September 28th, 2021

महाराष्ट्र भरती परीक्षा ही जिल्हानिहाय होत असते आणि जिल्हानिहाय परीक्षेत संबंधित जिल्ह्याविषयी दोन ते तीन प्रश्न आपल्याला बघावयास मिळतात.उमेदवारांना संबंधित जिल्ह्याविषयी माहिती मिळवण्यात खूप साऱ्या अडचणी येत असतात त्यामुळेच आजच्या या लेखात तुम्हाला महाराष्ट्रातील एका जिल्ह्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे.महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी आजचा हा लेख फार महत्त्वाचा आहे.आजच्या या लेखात आपण नाशिक या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत. यात आपण नाशिक जिल्ह्याची भौगोलिक रचना, उद्योग, प्रमुख स्थळे, पर्यटन स्थळे, महत्त्वाचे व्यक्ती इत्यादी माहिती बघणार आहोत.

Table of Content

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्हा सामान्य माहिती

byjusexamprep

 • नाशिकमधेच काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च 1930 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला.
 • नाशिक (ओझर) येथे मिग विमानाचा कारखाना आहे.
 • नाशिक रोड येथे सिक्युरिटी प्रेस आहे.
 • नाशिक येथे महाराष्ट्र राज्य पोलिस अकॅडमी ही संस्था आहे.
 • हा जिल्हा महाराष्ट्रातील पाच आणि गुजरातमधील दोन जिल्ह्यांनी वेढलेला आहे.
 • निफाड आणि लासलगाव परिसर कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
 • द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
 • देशातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे.
 • नाशिक शहर तापी आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यांमध्ये वसलेल्या दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे.
 • गोदावरीच्या काठावर वसलेले हे शहर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. कुंभमेळा येथे दर बारा वर्षांनी भरतो.

नाशिक प्रशासकीय विभाग

byjusexamprep

खाली दिलेल्या सारणी मध्ये नाशिक प्रशासकीय विभागात विषयी सामान्य माहिती देण्यात आलेली आहे.

मुख्य ठिकाण 

नाशिक

क्षेत्रफळ (चौ.कि.मी.)

15,530

लोकसंख्या (2011 जनगणना)

61,09,052

तालुक्यांची संख्या

15 तालुके

तालुक्यांची नावे

नाशिक, इगतपुरी बागलाण(सटाणा),देवळा, मालेगांव,नांदगांव सुरगणा, पेठ, कळवण, दिंडोरी, चांदवड,निफाड, येवले,सिन्नर,त्रंबकेश्वर,

सीमा

 • उत्तरेला धुळे जिल्हा
 • पश्चिमेला ठाणे जिल्हा
 • पूर्वेला जळगांव जिल्हा
 • दक्षिणेस अहमदनगर जिल्हा
 • आग्नेयेला औरंगाबाद जिल्हा
 • ईशान्येला धुळे जिल्हा
 • वायव्येला गुजरात मधील डांग व सूरत हे दोन जिल्हे

नाशिक जिल्हा:वैशिष्ट्ये

byjusexamprep

 • त्र्यंबकेश्वर– बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर हे स्थळ नाशिक जिल्ह्यातच आहे.
 • मालेगाव– पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे.
 • येवले– तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे. डॉ. आंबेडकरांनी येथेच आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता.
 • सापुतरा– निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे.
 • भगूर– स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान.
 • नांदूर– मध्यमेश्वर – भरतपुर नावाचे अभयारण्य येथेच आहे.
 • भोजापूर– खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर.
 • देवळाली– सैन्याचे प्रशिक्षण केंद्र, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध.
 • गंगापूर– गोवर्धन म्हणून सातवाहन शिलालेखात उल्लेखलेले हे ठिकाण.
 • सप्तश्रुंगी– साडेतीन पीठापैकी एक पीठ. मोठ्या संख्येने येथे लोक दर्शनाले येतात.
 • सिन्नर– यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी व 9 व्या शतकातील व 12 व्या शतकातील मंदिरासाठी प्रसिद्ध.
 • दिंडोरी– छत्रपती शिवाजी महाराज व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी प्रसिद्ध.

लोकसंख्याशास्त्र

 • 2011 च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या 6,109,052, (भारतात 11 वा) (महाराष्ट्रातील तिसरा) आहे, जो एल साल्वाडोर किंवा अमेरिकेच्या मिसौरी राज्याच्या बरोबरीने आहे. हे त्याला भारतातील 11 व्या क्रमांकाचे (एकूण 640 पैकी) देते. जिल्ह्याची लोकसंख्या घनता 393 रहिवासी प्रति चौरस किलोमीटर (1,020/चौरस मैल) आहे. 2001-2011 या दशकात त्याचा लोकसंख्या वाढीचा दर 22.33%होता. नाशिकमध्ये प्रत्येक 1000 पुरुषांमागे 931 महिलांचे लिंग गुणोत्तर आणि साक्षरतेचा दर 80.96%आहे. शहरी लोकसंख्या 58.67 % आहे
 • लोकसंख्येच्या दृष्टीने नाशिक हे महाराष्ट्रातील चौथे मोठे शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, नाशिकची लोकसंख्या 1,486,053 होती. पुरुष लोकसंख्या 782,517 आणि स्त्रिया 703,536 आहेत. महानगर नाशिकची लोकसंख्या 1,561,809 होती ज्यात 821,921 पुरुष आणि 739,888 महिला होत्या. नाशिक शहराचा सरासरी साक्षरता दर 89.85%होता: पुरुष साक्षरता 93.40%, आणि महिला साक्षरता 85.92%.
 • नाशिक शहरासाठी लिंग गुणोत्तर प्रति 1000 पुरुषांमागे 894 आहे. बाल लिंग गुणोत्तर प्रति 1000 मुलांमागे 865 मुली आहेत. नाशिकमध्ये 11.42% लोकसंख्या 6 वर्षांखालील आहे.2001च्या जनगणनेत नाशिक शहरी समुदायाची लोकसंख्या 11,52,326 होती. अशाप्रकारे मुंबई, पुणे आणि नागपूर नंतर हे महाराष्ट्र राज्याचे चौथे मोठे शहरी क्षेत्र होते. 11 नोव्हेंबर 2012 रोजी नाशिक शहरी समूह (ज्यामध्ये देवळाली सारख्या शहरी भागांचा समावेश आहे) ची अंदाजित लोकसंख्या 15,62,769 आहे.

Source: Nashik.gov.in

नाशिक जिल्ह्याची अर्थव्यवस्था

No

Sectors

Information

1

कृषि

 • रावसाहेब जयराम कृष्ण गायकवाड यांनी 1925 च्या सुरुवातीला नाशिकजवळच्या ओझर या छोट्या शहरात टेबल द्राक्ष क्रांती सुरू केली.
 • आज, टेबल द्राक्षे युरोप, मध्य पूर्व आणि आशियामध्ये निर्यात केली जातात.
 • सरासरी खरिप पीक क्षेत्र 663,200 हेक्टर आहे तर रब्बी पीक क्षेत्र सरासरी 136500 हेक्टर आहे.
 • पेरणी केलेले क्षेत्र 658,763 हेक्टर (99%) आणि जंगलाची जमीन 340,000 हेक्टर (21.75%) आहे. अशेती क्षेत्र 23,000 हेक्टर (1.48%) आहे.

2

उद्योग

 • इगतपुरी-नाशिक-सिन्नर गुंतवणूक क्षेत्र हा 90 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पातील एक महत्त्वाचा भाग आहे.
 • नाशिकपासून 10 मैल (16 किमी) अंतरावर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड विमान निर्मिती प्रकल्प आहे.
 •  करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिकरोडवर आहेत, जिथे अनुक्रमे भारतीय चलन आणि सरकारी स्टॅम्प पेपर छापलेले आहेत.
 • नाशिक जिल्ह्यातील विद्यमान औद्योगिक क्षेत्रे म्हणजे सातपूर, अंबड, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी आणि विंचूर.
 • प्रस्तावित क्षेत्रे अतिरिक्त सिन्नर आणि मालेगाव MIDC आहेत.

3

वाइन उद्योग

 • जिल्ह्यातील असंख्य वायनरींमुळे बिझनेस स्टँडर्डचे आलोक चंद्रा यांनी नाशिकला भारताची वाइन कॅपिटल असे वर्णन केले गेले आहे; . 2013 पर्यंत, नाशिक विभागाने दरवर्षी 10,000 टन द्राक्षांचे उत्पादन केल्याचे कळते.
 • नाशिकमध्ये एकूण 46 वायनरींपैकी 22 वाइनरीज आहेत.
 • कापणीच्या हंगामात सुलाफेस्ट सारख्या अनेक वाइन फेस्टिवल्सचे नाशिक आहे.

 

शिक्षण

 • शहरात दोन राज्यशासित विद्यापीठे आहेत, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.

नाशिकमध्ये अनेक सरकारी कंपन्या तसेच उपक्रम

 • ओझर-मीग येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (संरक्षण मंत्रालय)
 • भारताचे सुरक्षा प्रेस, नाशिक स्ट्रीट
 • चलन नोट, नाशिक स्ट्रीटच्या दाबा
 • एकलहरे येथे थर्मल पी. प्लांट
 • नाशिकच्या स्ट्रीट कॅम्पमध्ये आर्टिलरी सेंटर.
 • आर्टिलरी स्कूल, देवळाली
 • महाराष्ट्र अभियांत्रिकी आर. संस्था (मेरी)
 • महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठ, (एमयूएचएस)
 • वाय.सी महाराष्ट्र ओ. युनिव्हर्सिटी, (वाईसीएमयूयू)
 • महाराष्ट्र पोलिस अकादमी (एमपीए)
 • कॅन्टोनमेंट बी. देवळाली, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे

महत्वाचे ठिकाण

माहिती

आर्टिलरी सेंटर

देवळाली तोफखाना हे नाशिक शहरातील नाशिक रोड या ठिकाणी आहे. तसेच या ठिकाणी कॅन्टोनमेंट बोर्ड देखील आहे. तसेच या ठिकाणी रणगाडे/ तोफखाना संग्रहणालय आहे. आशिया खंडातील हे सर्वात मोठे तोफखाना केंद्र आहे. सदरचे तोफखाना केंद्र सन 1947 मध्ये पाकिस्तानमधून नाशिक येथे स्थलांतरीत झालेले आहे. भारतीय सैन्य दलातील अधिकारी तसेच जवानांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. तसेच बोफोर्स तोफांचे देखील या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते.

नाणे संग्रहालय

नाशिक शहरापसून सुमारे 20 कि.मी. अंतरावर नाशिक ते त्र्यंबकेश्वर रोडवर नाणे संग्रहणालय आहे. नाणे संग्राहलयात भारतातील नोटांचा व नाण्यांचा इतिहास व शोधांबद्दल या ठिछकाणी चांगल्या प्रकारे माहिती उपलब्ध आहे. सदर नाणेसंग्रहालय हे सन 1980 मध्ये सुरु करण्यात आलेले आहे. अशा प्रकारचे आशिया खंडामधील ते एकमेव संग्रहालय आहे.

गारगोटी खनिज संग्रहालय

सदरचे गारगोटी संग्रहालय हे सिन्नर येथील माळेगांव एमआयडीसी क्षेत्रामध्ये नाशिक पासून सुमारे 28 कि.मी. अंतरावर आहे. सिन्नर हे छोटी नगरपालिका असलेले शहर असून या ठिकाणच्या गारगोटी संग्रहालयाने वेगवेगळे पुरस्कार प्राप्त केलेले आहे. हिरासदृश्य विविध खनिजांचे हे अत्युकृष्ट असे संग्रहालय आहे. या संग्रहालयास प्राईड ऑफ इंडिया, सरस्वती पुरस्कार, सिन्नर गौरव अशा प्रकारचे विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विविध प्रकारचे रंगीबेरंगी खडक, स्फटीक, वेगवेगळया प्रकारामध्ये व आकारामध्ये या ठिकाणी आकर्षकपणे प्रदर्शित केलेले हे भारतातील एकमेव संग्रहालय आहे. या ठिकाणी दोन प्रकारची दालने असून पहिल्या मजल्यावर दख्खनचे पठार खनिजे तर तळमजल्यावर प्रतिष्ठा गॅलरी प्रदिर्शित केलेली आहे.

दादासाहेब फाळके संग्रहालय

सदरचे संग्रहालय हे नाशिक शहराजवळच नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वर नाशिक मुख्य बसस्टॅण्ड पासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर आहे. भारतीय सिनेमाचा आत्मा म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते. भारतीय सिनेमा सृष्टीचे ते आद्यजनक होते. त्यांचा जन्म नाशिक येथे 30 एप्रिल 1870 रोजी झाला होता. नाशिकच्या स्टुडीओमध्ये 1932 पर्यंत त्यांनी 95 चित्रपट व 26 डॉक्युमेंटरी चित्रपट बनविले. सुमारे 29 एकराच्या भव्य परीसरामध्ये हे स्मारक/संग्रहालय वसलेले आहे. या ठिकाणी बुध्द स्मारक, सुशोभित बगीचा व गाण्यांवर नाचणारे कारंजे देखील आहेत.

दुधसागर धबधबा

नाशिक सदरचा दुधसागर धबधबा हा नाशिक पासून सुमारे 8 कि.मी. अंतरावरील सोमेश्वर येथे आहे. सदर धबधबा हा प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. सुमारे 10 मीटरचा शुभ्र पाण्याच्या फेसाने फेसाळलेला या धबधब्याला दुध सागर हे नाव पडलेले आहे. दुधसागर म्हणजे एक प्रकारे दुधाच्या समुद्राचा आभास सदर ठिकाणी निर्माण होतो.

दुगारवाडी धबधबा

त्र्यंबकेश्वर जव्हार रोडवर त्र्यंबकेश्वर पासून 10 कि.मी. अंतरावर दुगारवाडी धबधबा आहे. नाशिकच्या काही अत्युकृष्ट नैसर्गिक सौदर्यापैकी दुगारवाडी हा एक धबधबा आहे. जव्हाररोडपासून सुमारे 2 कि.मी. आतमध्ये हा धबधबा आहे.

नाशिक जिल्ह्यातील मंदिरे

मुक्‍तीधाम

कपालेश्वर मंदिर

शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर

कोदंडधारी राम मंदिर

टाकळी मठ

श्री काळाराम मंदिर

खंडोबा मंदिर

सुंदरनारायण मंदिर

सोमेश्वर मंदिर

सीतागुंफ़ा

भक्‍तीधाम

नारोशंकर मंदिर

चामराज लेणी

कार्तिकस्वामी मंदिर

गुरुगंगेश्वर वेद मंदिर

अक्षरधाम मंदिर

रेणुकादेवी मंदिर

त्र्यंबकेश्वर मंदिर

गंगाद्वार मंदिर

श्री सोमेश्वर मंदीर

मांगी तुगी मंदीर

श्री सप्तश्रृंगी गड

संत निवृत्तिनाथ मंदिर

 

नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

 1. पंचवटी
 2. पांडव लेणी
 3. धम्मगिरी
 4. कुशावर्त तिर्थ
 5. रामकुंड
 6. नांदुरमध्यमेश्वर पक्षी निरीक्षण केंद्र
 7. चंदनपूरी
 8. ब्रम्हगिरी किल्ला

नाशिक मधील प्रसिध्द व्यक्तीमत्व

 1. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
 2. हुतात्मा अनंत कान्हेरे
 3. वि.वा.शिरवाडकर तथा कवि कुसुमाग्रज
 4. समर्थ रामदास स्वामी
 5. प्रा.वसंत कानेटकर
 6. दादासाहेब फाळके
 7. कर्मवीर दादासाहेब गायकवाड
 8. बाबूराब बागूल
 9. वामनदादा कर्डक
 10. पं.विष्णु दिगंबर पलुस्कर
 11. तात्या टोपे
 12. महादेव गोविंद रानडे

Que. हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांची हत्या कोणत्या नाट्यगृहात/थिएटरमध्ये केली होती?

*(तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा)

आजच्या लेखातील माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच तुम्हाला पुढे कोणते जिल्हे विषयी माहिती पाहिजे आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही तुम्हाला नक्कीच त्या जिल्ह्याविषयी ची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देऊ. आजचा लेक जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरु नका. तुमच्या इतर सूचनांचे सुद्धा स्वागत!!

या घटकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, येथे क्लिक करा:

नाशिक जिल्हा,Download PDF मराठीमध्ये

More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य  

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now.

Comments

write a comment

Follow us for latest updates