Ayushman Bharat Scheme in Marathi/आयुष्मान भारत योजना, Download PDF

By Ganesh Mankar|Updated : January 13th, 2022

आयुष्मान भारत कार्यक्रम ही भारत सरकारची एक-छत्री आरोग्य योजना आहे. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले. सरकारी योजना हा MPSC अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि दरवर्षी MPSC परीक्षेत त्यावर प्रश्न विचारले जातात. या लेखात, तुम्हाला आयुष्मान भारत कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती मिळेल. हा घटक MPSC राज्यसेवाMPSC संयुक्त, पोलीस भरतीआरोग्य भरती MPSC CDPOMPSC गट क आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे. 

Download BYJU'S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

Table of Content

आयुष्मान भारत योजना

byjusexamprep

  • सुरवात: २३ सप्टेंबर २०१८ रोजी 'आयुष्मान भारत' किंवा 'प्रधानमंत्री जनआरोग्य योजना'चे शुभारंभ केले.
  • कोठे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे
  • ही गरीबांसाठीची योजना आहे व अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तिन्ही देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळणा आहे.

Maharashtra State Exams Online Coaching

योजनेचे वैशिष्ट्ये 

  • एकाच वेळी ४४५ जिल्ह्यात ही योजना लागू झाली आहे.
  • एकूण १३ हजार रुग्णालये या योजनेमध्ये सहभागी झाली आहेत.
  • यामध्ये कर्करोग, हृदयरोग, किडनी व लिव्हरचे आजार, मधुमेह ४ यासह १३०० आजारांचा समावेश या योजनेमध्ये केला आहे.
  • या योजनेंतर्गत लाभार्थीच्या कुटुंबासाठी सुमारे एक ते दीड लाखापर्यंत आरोग्य विम्याची तरतूद करण्यात येईल. त्यासाठी आरोग्यसेवेची गरज पडल्यास त्याचा खर्च थेट राज्य सरकार मार्फत करण्यात येईल.
  • आयुष्मान भारत योजनेसाठी शहरी भागातील ११ वर्गातील कुटुंबाचा समावेश केला आहे. यामध्ये कचरा वेचणारे, बांधकाम मजूर, घरकाम करणारे, फेरीवाले, भिकारी इ.ग्रामीण भागामध्ये घराची भौगोलिक स्थिती कुटुंबातील कमावत्या व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी वर्गातील कुटुंबाची निवड केली आहे.

उद्देश 

byjusexamprep

  • गरीब, वंचित ग्रामीण कुटुंबांना आरोग्य सेवा पुरविणे हा या योजनेचा मुळ उद्देश आहे.
  • २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील ८.०३ कोटी कुटुंबे आणि शहरी भागातील २.३३ कोटी कुटुंबांना या योजनेच्या अंतर्गत समाविष्ठ केले आहे.
  • सुमारे ५० कोटी जनतेचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये ही योजना कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

MPSC Combined Mock Test 2021

अपात्रता

  • सरकारी नोकरीधारक व त्यांचे कुटुंब
  • दुचाकी, तिचाकी, ट्रॅक्टर अथवा कोणतेही वाहन चारचाकी वाहन मालक असल्यास.
  • कुटुंबांमध्ये कोणाकडेही रु.५०,०००/- पेक्षा जास्त रकमेच्या मर्यादेचे क्रेडिट कार्ड असल्यास.
  • कुटुंबंतील व्यक्तींचे अथवा स्वतःचे मासिक उत्पन्न रु. १०,००० पेक्षा जास्त असल्यास.
  • जनआरोग्य योजनेसाठी नियुक्त टीपीए (थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेशन) मार्फतच केली जाईल व याची रक्कम थेट सरकारमार्फत दिली जाईल.
  • रुग्णालयामार्फत करण्यात येणाऱ्या दाव्यांच्या तपासणीसाठी स्वतंत्र टीम स्थापन करण्यात येणार आहे.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करा:

आयुष्मान भारत योजना, Download PDF मराठीमध्ये

More From Us:

MPSC Rajyaseva 30 Days Study Plan 

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

Important Government Schemes For MPSC 

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra State Board Books PDF

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Download BYJU'S Exam Prep App

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment

Follow us for latest updates