Time Left - 30:00 mins

MPSC Combined Most Expected Questions

Attempt now to get your rank among 124 students!

Question 1

'प्रधानमंत्री उज्वला योजनेबाबत' खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

Question 2

'स्कीम फॉर अॅग्रोमरीन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ अॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टर्स' या योजनेचे नाव बदलून कोणते नाव ठरविण्यात आले आहे?

Question 3

जोड्या लावा (अरुण साधु यांचे साहित्यिक कार्य)

Question 4

अल्पसंख्याकांचे सक्षमीकरण उद्देश असलेल्या कोणत्या योजनेचा प्रारंभ जानेवारी, 2016 मध्ये जम्मू व काश्मिर येथे झाला?

Question 5

किदांबी श्रीकांत बाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. तो ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.

ब. तो इंडोनेशिया ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.

क. तो चीन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.

ड. तो स्वीस ग्रँड प्रिक्स गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

Question 6

राष्ट्रपती निवडणूक-2017 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

Question 7

भारतातील एका पर्यटन स्थळासाठी शून्य-उत्सर्जन (प्रदूषण) अशी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. हे पर्यटन स्थळ ______राज्यात आहे.

Question 8

भारतीय क्रीडा मंत्रालयाने प्रथमच राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय स्थापन करण्याचे योजिले आहे. हे संग्रहालय______शहरात असेल.

Question 9

साहित्यात मिळालेला 2017 नोबेल पुरस्काराच्या संदर्भात पुढील विधानांवर विचार करा.

अ. विजेत्याचे नाव काझुओ इशिगुरो आहे.

ब. तो एक ब्रिटिश लेखक आहे.

क. त्यांचा जपानमध्ये जन्म झाला.

वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत?

Question 10

ब्रिक्स्-ए.आर.पी.ची स्थापना करण्यासाठी भारत आणि विविध ब्रिक्स देशांमधील एका सामंजस्य करारास (एम ओ यू) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या कराराची ______ उद्दिष्ट्ये आहेत.

Question 11

जोड्या लावा.

Question 12

19 व्या शतकात प्रकाशित झालेली पुस्तके व त्यांचे लेखक/संपादक यांच्या जोड्या जुळवा.

Question 13

पुढील वृत्तपत्रे व ती जेथून प्रकाशित होतात ती स्थळे यांच्या जोड्या जुळवा.

Question 14

______यांच्या प्रोत्साहनाने कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी मराठीत 'शिवचरित्र' लिहिले.

Question 15

बडोदा वत्सल, राघव भूषण आणि अंबा लहरी ही ______ चालवलेली वृत्तपत्रे होती.

Question 16

पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा.

Question 17

जोड्या लावा.

Question 18

तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?

Question 19

सातपुडा दोन भागात ______ मुळे विभागला जातो.

Question 20

भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे?

अ. बिहार

ब. कर्नाटक

. तेलंगणा

ड. मध्यप्रदेश

Question 21

योग्य कथन/कथने ओळखा.

अ. सिक्कीमच्या विधानसभेत 32 सदस्य आहेत.

ब. विधानसभेत कमीत कमी सदस्य संख्या 60 असते.

Question 22

योग्य कथन/कथने ओळखा.

अ. राज्याच्या महाअधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात.

ब. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात.

क. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची नियुक्ती राज्यपाल करतात.

Question 23

अनुच्छेद 12 नुसार राज्य' मध्ये याचा समावेश होतो.

अ. भारताचे शासन व संसद

ब. प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळ

क. सर्व स्थानिक संस्था (नगरपालिका, जिल्हा बोर्ड)

ड. भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था

Question 24

भारतीय राज्यघटनेतील कोणत्या तरतूदी न्यायालयाच्या स्वतंत्रतेशी संबंधित आहे?

अ. न्यायाधिशांची नियुक्ती व पदच्युती

ब. कार्यकाळाची सुरक्षा

क. वेतन व सेवा शर्ती

ड. न्यायालयास अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार

Question 25

आंतरराष्ट्रीय संबंधातील वर्तनाबाबत खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश राज्यघटनेत झालेला नाही?

Question 26

भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे?

Question 27

भारतीय राज्यघटनेची खालील वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्त्रोत यांच्या जोड्या लावा :

Question 28

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.

अ. सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे.

ब. सरनाम्यातील तरतूदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात.

क. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्त्रोत म्हणून कार्य करू शकतो.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

Question 29

माहितीचा अधिकार अधिनियम या उद्देशाने पारीत केला आहे?

Question 30

खालीलपैकी केंव्हा मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना त्यांच्या पदावरून दूर करण्यात येईल?

अ. पंतप्रधान यांनी राष्ट्रपती यांचेकडे शिफारस केल्यावरून

ब. राष्ट्रपतींच्या आदेशावरून सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केल्यानंतर

क. शाबीत झालेल्या गैरवर्तनाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तव

ड. उच्च न्यायालयाने पदावरून दूर केले पाहिजे, असा अभिप्राय दिल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

Question 31

माहितीचा अधिकार हा _______ आहे.

Question 32

______ म्हणजे ज्या सिस्टिममध्ये सिक्युर की ची जोडी असून त्यातील "प्रायव्हेट की" ही डिजिटल सिग्नेचर तयार करते व "पब्लिक की" वापरून त्याचा पडताळा करते.

Question 33

संगणकात छापील प्रतिमा साठविण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते?

Question 34

भारताच्या ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट (MHRD) ने डिजिटल लर्निंग क्षेत्रातील डिझाईनमधील आयसीटी वापर करून तयार केलेली प्रणालीचे नाव _______आहे.

Question 35

एम.एच.आर.डी.चे _______हे प्रोजेक्ट शास्त्रज्ञ, विद्वान, लेक्चरर्स व इतर आर आणि डी संस्था ह्यांची एकत्रित डेटाबेस इनफ्लीबनेट" या द्वारे संकलित करते.

Question 36

संगणकाच्या परिभाषेनुसार किलोबिट्स (Kb) या संज्ञेद्वारे किती बिट्स दर्शवले जातात?

Question 37

संगणक परिभाषेनुसार वापरली जाणारी टी. बी. (TB) ही संज्ञा नेमके काय स्पष्ट करते?

Question 38

भारताच्या नियंत्रक सर्टिफाईंग अॅथोरिटिने खालीलपैकी कोणाला डिजिटल सर्टिफाईंग अॅथोरिटि म्हणून नेमले आहे?

Question 39

SRAM, DRAM, EDO-RAM हे संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत?

Question 40

संगणकाचा वेग वाढविण्याच्या उद्देशाने सी.पी.यू. व रॅम (CPU and RAM) यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरले जाते?

Question 41

खालीलपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू' समजली जाते?

Question 42

विधान परिषदेची निर्मिती अथवा रद्द करण्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.

अ. विधान परिषद निर्मिती करणे अथवा रद्द करण्याबाबतचे अधिकार अनुच्छेद 169 अन्वये संसदेला आहे.

ब. जेथे विधान परिषद निर्माण करावयाची आहे अथवा असलेली रद्द करावयाची आहे त्या संबंधित राज्याच्या विधानसभेने तसा ठराव साध्या बहुमताने मंजूर करणे आवश्यक असते.

. संसदेमध्ये तसा ठराव/अधिनियम हा साध्या बहुमताने मंजूर केला जातो.

वरीलपैकी कोणते विधान /ने बरोबर आहे/त?

Question 43

खालीलपैकी कोणत्या बाबतीत केवळ निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने घटनादुरुस्ती करणे शक्य होते?

Question 44

खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही?

Question 45

खालील विधाने विचारात घ्या.

अ. जवाहरलाल नेहरु यांच्या अध्यक्षतेखालील जे.व्ही.पी. समितीने आपला अहवाल 1948 मध्ये सादर केला.

ब. द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन राज्य पुनर्रचना अधिनियमाद्वारे झाले.

क. द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन बॉम्बे पुनर्रचना अधिनियमाद्वारे झाले.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

Question 46

भारताचा नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या.

अ. नियंत्रक व महालेखापरीक्षकांचा दर्जा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बरोबरीचा आहे. परंतु पदनाम तालिकेनुसार (Order of precedence) राज्यसभेच्या उपाध्यक्षांपेक्षा वरचा आहे.

ब. भारतीय लेखा व लेखा परीक्षण (Audit and Accounts Department) विभागामधील सेवेतील व्यक्तिंच्या सेवेच्या अटी नियंत्रक व महालेखापरीक्षक हे राष्ट्रपतीबरोबर सल्लामसलत करून निश्चित करतात.

Question 47

सचिवालय विभागाची योग्य पदसोपान परंपरा (hierarchy)________अशी आहे.

Question 48

कॅबीनेट सचिवालयाची खालीलपैकी कोणते/ती कार्य/ये आहे/त?

अ. कॅबीनेटच्या बैठकीची विषयपत्रिका तयार करणे

ब. कॅबीनेट समित्यांना सचिवालयात्मक सहाय्य पुरविणे

क. मंत्र्यांना आर्थिक साधनांचे वाटप करणे

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

Question 49

खालील विधाने विचारात घ्या.

अ. 95 व्या घटनादुरुस्ती अधिनियम - 2009 अन्वये लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची मुदत 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ब. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद - 334 यात स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागेची तरतूद नाही आणि म्हणून महिलांसाठी राखीव जागा या विशिष्ट मुदतीसाठी मर्यादित नाहीत.

Question 50

खालीलपैकी कोणते केन्द्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत?

अ. राष्ट्रपती

ब. मंत्रिमंडळ

क. महान्यायवादी

ड. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक

  • 124 attempts
  • 1 upvote
  • 0 comments

Tags :

MPSCGS/GK
Oct 4MPSC