hamburger

Sharad Pawar Gram Samridhi Yojana in Marathi/शरद पवार ग्राम समृद्धी योजना, शासकीय योजना Download PDF

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

3 फेब्रुवारी 2021 रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या निर्णयानुसार “शरद पवार ग्राम समृद्धी” योजना सुरू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. आजच्या या लेखात आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजना विषयी ची संपूर्ण माहिती बघणार आहोत.  हा घटक एमपीएससी राज्यसेवाएमपीएससी संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षामहाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

\

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) च्या संयुक्त विद्यमाने शरद पवार ग्राम समृद्धी योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने 12 डिसेंबर 2020 रोजी घेतला आहे. शासन निर्णयानुसार 3 फेब्रुवारी 2021 पासून राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
  • ‘मी समृद्ध, माझे गाव समृद्ध आणि माझा महाराष्ट्र समृद्ध’ या ध्येयासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजनेत वैयक्तिक लाभाच्या चार योजना राबविण्यात येणार आहेत.
  • गायी आणि म्हशींसाठी कायमस्वरूपी गोठ्यांचे बांधकाम तसेच चार वैयक्तिक कामांद्वारे प्रत्येक लाभार्थ्याला लाभ दिला जाईल.

MPSC Combined Mock Test 2021

उद्दिष्ट/Objective

  • 2022 पर्यंत प्रत्येक ग्रामपंचायती आणि त्यातील घटक गावांना कामांच्या माध्यमातून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून समृद्ध करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
  • कामाअभावी स्थलांतर थांबले पाहिजे.
  • या योजनांद्वारे प्रत्येक शेतकरी समृद्ध झाला पाहिजे.
  • ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक व सार्वजनिक कामे करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्याद्वारे कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करणे.
  • योजनेतील कामासाठी आवश्यक असलेले 60:40 अकुशल, कुशल गुणोत्तर संतुलित करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या विविध योजनांचा समन्वय साधणे.

Maharashtra State Exams Online Coaching

वैयक्तिक लाभाच्या योजना 

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेमध्ये चार वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या काय आहेत हे आपण जाणून घेऊ या. वैयक्तिक लाभाच्या योजना पुढील सारणी मध्ये नमूद करण्यात आले आहे.

No

वैयक्तिक लाभाच्या योजना 

तरतूद

1

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग

  • जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया करून कृषी उत्पादन वाढविण्यासाठी शेतात नाडेप तयार करण्याची योजना आहे.
  • या नाडेपमध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, चिकणमाती आणि माती एकावर एक रचली जाते.
  • नाडेपच्या बांधकामासाठी दोन ते तीन महिन्यांत 10,537 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

3

शेळीपालन शेड बांधणे  

  • शेळ्या-मेंढ्यांसाठी चांगल्या दर्जाचे शेड बांधल्यास या जनावरांचे आरोग्यही सुधारेल आणि वाया जाणारे खत व मूत्र यांचा शेतीमध्ये उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून वापर करता येईल.
  • भूमिहीन मजूर आणि किमान दोन शेळ्या असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • एका शेडची किंमत 49 हजार 284 रुपये आहे.
  • शेड सिमेंट आणि विटा तसेच लोखंडी बीमच्या आधारे बांधण्यात येणार असून, प्रति कुटुंब जास्तीत जास्त 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान मंजूर करण्यात येणार आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना विषयीची अधिक माहिती साठी तुम्हाला खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करावी लागेल. ज्यात तुम्हाला या योजनेसाठी चे अनुदान कशा पद्धतीचे दिले जाणार आहे. तसेच वैयक्तिक लाभाच्या संपूर्ण योजना तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये मिळणार आहे.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करा:

शरद पवार ग्राम समृद्धी योजना,Download PDF मराठीमध्ये

More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Important Government Schemes For MPSC

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra State Board Books PDF

MPSC Rajyaseva Study Notes PDF

Download BYJU’S Exam Prep App

Sharad Pawar Gram Samridhi Yojana in Marathi/शरद पवार ग्राम समृद्धी योजना, शासकीय योजना Download PDF Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF’s & more, Join our Telegram Group Join Now
Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium