प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
- 20 मे 2020 शुभारंभ 10 सप्टेंबर 2020 कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधून यांच्या हस्ते व्हिडिओ, पंतप्रधान नरेंद्र मोदी
- 2024-25 सालापर्यंत देशातील मत्स्य उत्पादन 70 लाख टनांपर्यंत वाढवणे.
प्रमुख उद्देश
- मत्स्योत्पादन क्षेत्राला चालना देणे आणि मच्छीमारांचे उत्पन्न दुप्पट करणे.
- भारतातील मत्स्यव्यवसायात शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून नीलक्रांती घडवून आणणे.
- अंमलबजावणी कालावधी : 5 वर्षे (2020-21 ते 2024-25).
- या योजनेसाठी केंद्र सरकारने 20,050 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. मत्स्योत्पादन क्षेत्राला प्रथमतःच एवढ्या मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Maharashtra State Exams Online Coaching |
घटक
- केंद्रीय क्षेत्र योजना (CS) 2) केंद्र पुरस्कृत योजना (CSS)
- या योजनेद्वारे क्षेत्रातील हंगामानंतरचे होणारे नुकसान सध्याच्या 20 ते 25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर येईल.
- या योजनेद्वारे मत्स्योत्पादन क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या 55 लाख रोजगार निर्मिती होईल.
या योजनेमध्ये पुढील तीन विभागांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे :
- उत्पादन आणि उत्पादकता क्षमतेमध्ये वाढ
- हंगामानंतरच्या व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधांचा विकास
- मत्स्योद्योग व्यवस्थापन आणि नियामक चौकट
MPSC Combined Mock Test 2021 |
लाभार्थी
- मच्छीमार
- मत्स्य शेतकरी
- (मासे कामगार आणि मासे विक्रेते
- मत्स्यव्यवसाय विकास महामंडळे
- मत्स्यपालन क्षेत्रातील बचत गट (SHGs)/संयुक्त दायित्व गट (JLGs)
- मत्स्यपालन सहकारी संस्था
- मत्स्यपालन महासंघ
- उद्योजक आणि खाजगी कंपन्या
- मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था/कंपन्या (FFPOs/Cs)
- अनुसूचित जाती/जमाती/महिला/विविध सक्षम व्यक्ती
लक्ष्य
- मत्स्य उत्पादनात अतिरिक्त 70 लाख टन वाढ करणे आणि 2024-25 पर्यंत मत्स्यव्यवसाय निर्यात उत्पन्न रु. 1,00,000 कोटी पर्यंत वाढवणे.
- मच्छिमार आणि मत्स्यपालकांचे उत्पन्न दुप्पट करणे.
- काढणीनंतरचे नुकसान 20-25% वरून 10% पर्यंत कमी करणे.
- मत्स्यव्यवसाय क्षेत्र आणि संबंधित क्रियाकलापांमध्ये अतिरिक्त 55 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभदायक रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
बजेट आणि कालावधी
- सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आर्थिक वर्ष (FY) 2020-21 ते FY 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी अंदाजे 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
- ही गुंतवणूक मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वाधिक आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करा:
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ,Download PDF मराठीमध्ये
More From Us:
MPSC Rajyaseva 30 Days Study Plan
MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English
Important Government Schemes For MPSC
NCERT Books for MPSC State Exam 2021
Maharashtra State Board Books PDF
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
Download BYJU'S Exam Prep App

Comments
write a comment