महाराष्ट्रातील प्रमुख घाट, महत्त्वाचे घाटरस्ते, Passes in Maharashtra, Passes in Western Ghats, PDF

By Ganesh Mankar|Updated : February 10th, 2022

सह्याद्री पर्वत हा कोकण व महाराष्ट्र पठार यांच्यादरम्यान असल्याने कोकणातून पठारावर जाण्याकरिता सह्याद्री पर्वत ओलांडून जावे लागते. याकरिता सह्याद्री पर्वताची उंची जेथे जेथे कमी झालेली आहे, त्या ठिकाणी घाटमार्ग तयार करण्यात आले आहेत. या लेखात आपण महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे घाटरस्ते व त्यांच्यामुळे जोडली गेलेली ठिकाणी या सर्वांबद्दलची आपण सखोल माहिती घेणार आहोत. 

Download BYJU'S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

Table of Content

महाराष्ट्रातील प्रमुख घाट

 • सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्राला घाट मार्गांचे वरदान लाभले आहे. हे घाट आणि रस्ते महाराष्ट्रातील वाहतुकीचे महत्त्वाचे साधन आहेत, त्यामुळे ते व्यापार, वाहतूक आणि पर्यटन यांसारख्या आर्थिक क्रियाकलापांना हातभार लावतात. नाणे घाटासारखे घाटमार्ग अनादी काळापासून वापरात आहेत, तर माळशेज घाट हे नेहमीच पर्यटन स्थळ राहिले आहे.
 • घाट रस्त्यांबाबतही आयोगाने वारंवार प्रश्न विचारले आहेत. प्रश्नांचे स्वरूप प्रामुख्याने घाटांची नावे आणि त्यांना जोडणारी शहरे आणि सह्याद्रीतील घाटांचा उत्तर-दक्षिण किंवा दक्षिण-उत्तर क्रम असा असतो. या लेखात आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घाट मार्गांची माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला परीक्षेचे पुनरावलोकन करण्यास मदत होईल.

byjusexamprep

खाली दिलेल्या सारणीमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाटमार्ग, त्यांना जोडणारी शहरे दिलेली आहे.

घाटाचे नाव (Name of Passes)

जोडली जाणारी ठिकाणे (Places to connect)

शिरघाट किंवा शिरसाट घाट

नाशिक-जव्हार

फोंडा घाट

सावंतवाडी-कोल्हापूर (कोल्हापूर -पणजी )

चंदनापुरी घाट

पुणे-नाशिक

रूपत्या घाट

पुणे -महाड

सारसा

सिरोंचा-चंद्रपूर

कशेडी घाट

महाड-खेड-दापोली

कात्रज / खंबाटकी घाट

पुणे- सातारा

परसणी घाट

पाचगणी(सातारा)-वाई

बोर घाट

मुंबई-पुणे

वरंधा घाट

पुणे-महाड

माळशेज घाट

मुंबई-नाशिक (ठाणे-नगर)

ताम्हणी घाट

पुणे – माणगाव

पार घाट / रणतुंडी घाट

महाड- महाबळेश्वर (सातारा-रत्नागिरी)

थळ घाट /कसारा घाट

मुंबई – नाशिक

हातलाटे घाट

सातारा-रत्नागिरी

केळघर घाट

सातारा-रत्नागिरी

फिट्स जीराल्डा घाट

महाबळेश्वर – अलिबाग

करूळ घाट

कोल्हापूर – विजयदुर्ग (कोल्हापूर – राजापूर)

कुंभार्ली घाट

सातारा – रत्नागिरी (चिपळूण -कराड)

आंबा घाट

कोल्हापूर – रत्नागिरी

अनुस्कुरा घाट

कोल्हापूर – राजापूर

औट्रम / कन्नड घाट

धुळे – औरंगाबाद

दिवेघाट

पुणे – बारामती

आंबनेळी घाट

महाबळेश्वर – पोलादपूर

रामघाट

कोल्हापूर – सावंतवाडी

बावडा घाट

कोल्हापूर – खारेपाटण

उत्तर तिवरा घाट

सातारा-रत्नागिरी

नाणेघाट

अहमदनगर-मुंबई (कल्याण-जुन्नर)

लळिंग घाट

नाशिक – धुळे

हनुमंते घाट

कोल्हापूर – कुडाळ (कोल्हापूर – कणकवली)

कुसूर घाट

पुणे -पनवेल

आंबोली घाट

सावंतवाडी – बेळगाव (कोल्हापूर-सावंतवाडी)

भीमाशंकर घाट

पनवेल-नारायणगाव (मंचरमार्गे) / पुणे-महाड

उत्तर-दक्षिण क्रम (North-South Sequence)

byjusexamprep

एमपीएससी आयोगाने अनेकदा हा दक्षिण-उत्तर किंवा उत्तर-दक्षिण क्रम विचारला आहे. 

यामुळेच विद्यार्थ्यांनी नकाशा च्या साह्याने या घटकांचा अभ्यास करावा.

 1. थळ घाट
 2. माळशेज घाट
 3. बोर घाट
 4. वरंधा घाट
 5. रणतुंडी घाट
 6. कुंभार्ली घाट
 7. आंबा घाट
 8. फोंडा घाट
 9. आंबोली घाट

byjusexamprep

या घटकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:

महाराष्ट्रातील प्रमुख घाट, Download PDF मराठीमध्ये

Related Important Articles: 

Socio-Religious Movement Notes

Indian States and Its Capitals

Current Electricity Study Notes

Basic Concepts of Physics

Important Dams in India

Marathi Alankar

More From Us:

Maharashtra Static GK 

MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English

Important Government Schemes For MPSC 

NCERT Books for MPSC State Exam 2022

Maharashtra State Board Books PDF

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Download BYJU'S Exam Prep App

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment

FAQs

 • गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर चोरला घाट आहे.

 • फोंडा घाट हा सावंतवाडी-कोल्हापूर (कोल्हापूर -पणजी ) या दोन ठिकाणांना जोडतो.

 • मुंबई व पुणे यांच्या दरम्यान बोर घाट आहे

Follow us for latest updates