नाबार्ड
- 1979 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्विलोकन समिती श्री.बी. शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती, या शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्ड कायदा 1981 संसदेत पास करण्यात आला ,वरील कृषी पतविभाग ,ग्रामीण नियोजन आणि पतकक्ष व कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ यांच्या एकत्रीकरणातुन 12 जुलै 1982 मध्ये भारतात नाबार्ड (NABARD-National Bank for Agriculture and Rural Development) या शिखर बँकेची स्थापना करण्यात आली .
- पूर्वी शेतकी व ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची जी कामे भारतीय रिझर्व बँक करीत असे ती सर्व कामे नाबार्डकडे सोपविण्यात आली. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर संस्था आहे.
नाबार्ड म्हणजे काय व स्थापन करण्यामागचा उद्देश
- नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट आणि भारतीय ग्रामीण बँकिंग व्यवस्थेतील सर्वोच्च नियामक संस्था आहे. ही एक विकास बँक आहे ज्याचा उद्देश ग्रामीण भागात पतपुरवठा आणि नियमन करणे आहे.
- नाबार्ड ही कृषी आणि ग्रामीण विकासासाठी एक राष्ट्रीय बँक आहे, जी कृषी, लघु उद्योग, कुटीर ग्रामोद्योग, हस्तकला, आणि इतर ग्रामीण हस्तकला आणि संलग्न आर्थिक क्रियाकलापांच्या विकासासाठी क्रेडिट आणि इतर सुविधा प्रदान आणि नियमन करण्याच्या उद्देशाने स्थापन केली गेली.
नाबार्डचे व्यवस्थापन
- नाबार्डचे मुख्यालय मुंबईत असून 28 प्रादेशिक कार्यालये व 1 उपकार्यालय आहे.
- नाबार्डची 6 प्रशिक्षण केंद्र आहेत.
- नाबार्डचा कारभार संचालक मंडळाकडून पाहिला जातो.
- नाबार्डच्या 2 संलग्न संस्था नाबार्ड कंसल्टंसी सर्व्हिसेस आणि नाबर्ड फायनशिल सर्व्हिसेस कार्यरत आहेत.
- रिझर्व्ह बँकेचा डेप्युटी गव्हर्नर हा नाबार्डचा अध्यक्ष असतो.
- या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँक तीन संचालक नेमते.
- केंद्रसरकार तीन संचालक नियुक्त करते.
- सहकारी बँकामधील दोन आणि व्यापारी बँकामधील एक तज्ञ संचालक नेमले जातात.
- ग्रामीण अर्थव्यवस्था व ग्रामीण विकास यांच्याशी संबंधित दोन संचालक नियुक्त केले जातात.
राज्य सरकार दोन संचालक नियुक्त करतात
1.याशिवाय एक व्यवस्था संचालक असतो.
2.आणि एक पूर्ण वेळ संचालक असतो
नाबार्डचे भांडवल:
1)नाबार्डचे सुरुवातीचे अधिकृत भांडवल 500 कोटी रुपये स्थापनेवेळी नाबार्डचे भाग भांडवल 100 कोटी रु. होते नंतर ते नाबार्ड सुधारणा कायदा-2000 नुसार 2001 पासून 2000 कोटी रु. करण्यात आले.
2)नाबार्डमध्ये सर्वाधिक भांडवल रिझर्व्ह बँकेचे होते अलीकडे रिझर्व बँकेने या भांडवलातील 71.5%वाटा (1430 कोटी रु.) भारत सराकारकडे वर्ग केला आहे ,तर रिझर्व्ह बँकेकडे फक्त 1% वाटा राहिला आहे.
या घटकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करावी:
नाबार्ड, Download PDF मराठीमध्ये
More From Us:
MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English
Important Government Schemes For MPSC
NCERT Books for MPSC State Exam 2022
Maharashtra State Board Books PDF
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Comments
write a comment