MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2022
MPSC ने म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 21 ऑगस्ट 2022 रोजी MPSC Exam 2022 चे आयोजन केले आहे. ही परीक्षा 161 रिक्त पदांसाठी घेण्यात येणार आहे. जे अर्जदार प्रिलिम परीक्षेसाठी पात्र ठरतील त्यांना मुख्य परीक्षेत प्रवेश दिला जाईल. एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही दोन सत्रात आयोजित केली जाणार आहे. पहिल्या सत्रात GS पेपर 1 म्हणजे सामान्य अध्ययनाचे पेपर होणार आहे व दुसऱ्या सत्रात CSAT पेपर दोन होणार आहे. या दोन्ही पेपरचे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला याच लेखात मिळणार आहे.
MPSC राज्यसेवा पूर्व विश्लेषण 2022 - मुख्य ठळक मुद्दे
- MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 August 2022 रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येईल.
- परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी
- GS पेपर 1 मध्ये एकूण 100 आणि CSAT पेपर 2 मध्ये 80 प्रश्न आहेत.
- परीक्षा ऑफलाइन पद्धतीने (OMR-आधारित) घेण्यात येणार.
- परीक्षेचे स्वरूप: MCQs
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 : मुख्य मुद्दे | |
प्रश्नांची संख्या | GS पेपर 1 - 100 प्रश्न |
CSAT पेपर 2 - 80 प्रश्न | |
एकूण गुण | GS पेपर 1 - 200 गुण |
CSAT पेपर 2 - 200 गुण | |
निगेटिव्ह मार्किंग | 0.5 |
निवडींची संख्या | 4 |
परीक्षेचा कालावधी | 120 मिनिटे |
चाचणी प्रकार | MCQs |
माध्यम | मराठी आणि इंग्रजी भाषा |
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022: परीक्षेची अडचण पातळी
आम्ही प्रत्येक विभागासाठी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ची अडचण पातळी सादर केली आहे. अर्जदार विभागवार तक्त्यामध्ये प्रश्नांची पातळी तपासू शकतात.
पेपर 1: सामान्य अध्ययन
MPSC राज्यसेवा पूर्व 2022 च्या प्रश्नपत्रिकेत, पॉलिटी, सामान्य विज्ञान, इतिहास आणि चालू घडामोडींना जास्तीत जास्त महत्त्व दिले जाते. तपशीलवार MPSC Analysis खालीलप्रमाणे आहे:
विषय | अडचण पातळी |
सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान | मध्यम ते सोपे |
भारतीय राजकारण | मध्यम ते सोपे |
चालू घडामोडी | मध्यम ते कठीण |
भारतीय इतिहास | मध्यम ते कठीण |
भूगोल | मध्यम ते सोपे |
पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र | मध्यम ते सोपे |
अर्थव्यवस्था | मध्यम ते कठीण |
पेपर 2: MPSC CSAT
MPSC राज्यसेवा पूर्व 2022 परीक्षेचा दुसरा पेपर दुपारी 3 ते 5 या वेळेत दुसऱ्या शिफ्टमध्ये घेण्यात आला. पूर्व पेपरची एकूण काठीण्य पातळी मध्यम ते सोपी होती, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये 50% पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका समाविष्ट होत्या. तुम्ही खाली वेगवेगळ्या विषयांवरील प्रश्नांचे वितरण पाहू शकता.
विषयाचे नाव | काठीण्य पातळी |
उताऱ्यांचे आकलन (द्विभाषिक) (Bilangual) | मध्यम |
उताऱ्यांचे आकलन (मराठी) | मध्यम ते कठीण |
उताऱ्यांचे आकलन (इंग्लिश) | मध्यम ते कठीण |
गणित व बुद्धिमत्ता | मध्यम ते कठीण |
तार्किक क्षमता | मध्यम ते कठीण |
निर्णय क्षमता | सोपे |
एकूण | मध्यम |
MPSC राज्यसेवा पूर्व 2022 साठी चांगले प्रयत्न (Good Attempts)
MPSC Question Paper चे विश्लेषण केल्यानंतर, 'Byjus Exam Prep' च्या तज्ञांनी MPSC च्या प्रिलिम्स परीक्षेसाठी चांगले प्रयत्न शेअर केले आहेत. हे उपस्थित उमेदवारांच्या प्रतिकिया आणि वाजवी परीक्षा प्रयत्नांवर आधारित आहे.
MPSC Prelims Exam 2022: Good Attempts | ||
Exam Date | Paper | Good Attempts |
21 August 2022 | Paper 1: General Studies | 86 to 90 |
Paper 2: CSAT | 60-66 |
MPSC राज्यसेवा पूर्व 2022 मधील प्रश्नांचे वेटेज
खालील तक्त्यामध्ये, या पेपरचे प्रश्नचिन्हांचे वेटेज दिले आहे:
पेपर 1: General Studies (सामान्य अध्ययन)
विषय | प्रश्न संख्या |
सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान | 17 |
भारतीय राजकारण | 15 |
चालू घडामोडी | 12 |
भारतीय इतिहास | 12 |
भूगोल | 17 |
पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र | 7 |
अर्थव्यवस्था | 10 |
Maharashtra Specific GK | 4 |
Miscellaneous | 6 |
100 प्रश्न |
पेपर 2: MPSC CSAT
अनु.क्र. | विषयाचे नाव | प्रश्न संख्या |
01 | उताऱ्यांचे आकलन (द्विभाषिक) (Bilangual) | 40 (8 उतारे) |
02 | उताऱ्यांचे आकलन (मराठी) | 5 (1 उतारा) |
03 | उताऱ्यांचे आकलन (इंग्लिश) | 5 (1 उतारा) |
04 | गणित व बुद्धिमत्ता | 15 |
05 | तार्किक क्षमता | 10 |
06 | निर्णय क्षमता | 5 |
एकूण | 80 | 80 प्रश्न |
MPSC राज्यसेवा पूर्व 2022 चे विभागवार विश्लेषण
परीक्षेत बसलेले उमेदवार विषयवार विश्लेषण पाहू शकतात:
GS Paper 1
- सामान्य अध्ययन पेपर 1 मधील एकूण प्रश्नांचे स्वरूप हे मध्यम वर्गातील होते. यावेळी सामान्य विज्ञान या विषयावर जवळपास 20 प्रश्न होते. तसेच भारतीय राज्यव्यवस्था या विषयावर सुद्धा मुबलक (17 प्रश्न) विचारण्यात आले होते. फक्त सामान्य विज्ञान वरील प्रश्न तुलनेने अवघड होते, बाकी सर्व प्रश्नांची काठीण्य पातळी सोपी होती.
- चालू घडामोडी या घटकावर आयोगाने 2021 पासून ते मार्च 2022 पर्यंत चे प्रश्न विचारले होते.
- इतिहासामध्ये प्राचीन व मध्ययुगीन वर प्रत्येकी दोन असे एकूण चार प्रश्न विचारण्यात आले होते. आधुनिक भारताचा इतिहास या घटकावर प्रश्न यावेळी थोडे अवघड होते.
- भारतीय राज्यव्यवस्था या विषयावर या वेळी थोडे प्रश्न FACTUALहोते, जसे की कलम घटनादुरुस्ती. परंतु एकूणच या विषयावर प्रश्न सोपे होते. या विषयावर दोन प्रश्नही चालू घडामोडी व अर्थव्यवस्था यांच्या Section मध्ये विचारले होते.
CSAT Paper 2
CSAT पेपर ची एकूण स्वरूप हे 'मध्यम' या वर्गातील होते. यावेळी पहिल्यांदाच CSAT हा Qulifying होता, परंतु तरी पेपर हा क्वालिफाय होण्यासाठी सोपा होता.
द्विभाषिक उतारे फार सोपे विचारण्यात आलेले होते. म्हणजेच प्रश्न जसेच्या तसे उताऱ्या मधुन सोडवता येत होते, फक्त मराठी व इंग्रजी भाषा मधला उतारा अवघड स्वरूपातील होता.
यावेळी Reasnonig च्या प्रश्नांवर सर्वात जास्त आयोगाचा भर होता, त्यामुळे खूप मोठ्या वाक्याचे आपल्याला रीजनिंग्ज प्रश्न या प्रश्नपत्रिकेत दिसतील.
तसेच खालील घटकांवर या प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारण्यात आले होते:
- काळ-काम
- कॅलेंडर
- प्रोबबिलिटी
- योग्य अनुमान यांची निवड करा
- गृहितके
- अंक जोडी निवडा
- वेन डायग्राम
- दिशा
- ट्रेनची उदाहरणे
MPSC राज्यसेवा पूर्व अपेक्षित कट ऑफ 2022
MPSC राज्यसेवा पूर्व 2022 परीक्षा विश्लेषण आणि पुनरावलोकनानुसार, परीक्षेसाठी अपेक्षित कट-ऑफ खाली दिले आहेत.
MPSC राज्यसेवा पूर्व 2022 अपेक्षित कट-ऑफ - (To be notified)
MPSC राज्यसेवा पूर्व 2022 मधील विचारलेले प्रश्न
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये खालील प्रश्न विचारण्यात आले:
पेपर 1: General Studies
MPSC प्रिलिम 2022 च्या परीक्षेत, GS पेपर 1 मधून एकूण 100 आणि CSAT पेपर 2 मधून 80 प्रश्न विचारले जातात.
- खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात ?
- 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या दोन टोकांमध्ये 33 V विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युतधारा वाहते. 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युत धारा वाहू देण्यासाठी त्याच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल ?
- खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नांव कोणते आहे ?
- सोनार (साउंड नेव्हीगेशनल श्रेणी) तंत्र
- दोन समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे, जर दोन समतल आरशामधील कोन 30 अंश असल्यास, मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील ?
- खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पती मध्ये वृद्धत्व निर्माण करते ?
- डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफिला च्या मादीचा, डोळ्यांचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या नरा बरोबर संकरण झाले, तर त्यांच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी ड्रॉसोफिलांच्या डोळयांचा रंग कोणता असेल ?
- व्हायरॉईड्स खालीलपैकी कोणत्या तीन विशेष गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात ?
- खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत ?
पेपर 2: CSAT
खाली आम्ही MPSC प्रिलिम्स प्रश्नपत्रिका 2022 मधील CSAT पेपर 2 चे काही महत्वाचे प्रश्न दिले आहेत:
- सोबतची तेलुगू, हिंदी, मराठी व गुजराती या चार भाषा बोलणारे विद्यार्थी दाखवणारी वेन आकृति अभ्यासा. दिलेल्या भाषा बोलणाऱ्यांची संख्या अनुक्रमे 61, 65, 73 व 69 अशी आहे. फक्त मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निवडा.
- रिना, टिना आणि हिना यांनी एकाच वेळी एकाच दिशेने एकाच बिंदूपासून वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती धावायला सुरुवात केली. एक फेरी रिनाने 70 सेकंदात, टिनाने 105 सेकंदात आणि हिनाने 175 सेकंदात पूर्ण केली. त्या तिघी किती वेळाने पुन्हा प्रारंभिक बिंदूजवळ भेटतील ?
- आगगाडी ‘M’ मेरठवरुन सकाळी 5.00 वाजता सुटते व दिल्लीला सकाळी 9.00 वाजता पोहचते. आगगाडी 'N' दिल्लीवरून सकाळी 7.00 वाजता सुटते व मेरठला सकाळी 10.30 वाजता पोहचते. तर दोन्हीं आगगाडीची एकमेकांस ओलांडण्याची नेमकी वेळ कोणती असेल ?
- कोण्या एका समूहाच्या सर्व व्यक्तींना कोणत्याही प्रश्नाला दोन वाक्यात उत्तरे द्यायची सवय आहे आणि त्यापैकी एक वाक्य नेहमीच सत्य असते आणि दुसरे नेहमीच असत्य असते. एका प्रवाशाची या समूहाच्या तीन व्यक्तींची गाठ पडली. त्यांच्यापैकी एक व्यक्ती डॉक्टर आहे. दुसरी व्यक्ती वकील आहे आणि तिसरी व्यक्ती शेतकरी आहे. त्यांच्या व्यवसायासंबंधीच्या प्रश्नाला त्यांनी दिलेली उत्तरे अभ्यासा आणि पुढील पर्यायांतून सत्य विधान निवडा.
- सहा जणांच्या कुटुंबात पुरुष व स्त्रियांची संख्या समान आहे. त्यांच्यात दोन वडील आणि दोन मुलगे आहेत. त्या कुटुंबाच्या सदस्यांबद्दलची अधिक माहिती पुढे दिली आहे. राम कुटुंबातील वयाने सर्वात मोठा आहे तर नीता वयाने सर्वात लहान आहे. शेतकरी हे लेखक व शिवाय डॉक्टर यांचे वडील आहेत. नीता, समीरची बहीण आहे व दोघंही कुमारवयीन आहेत. त्यांची आई शिक्षिका आहे. जयेश आणि नादिरा हे कुटुंबातील एकमेव जोडपे आहे. अॅनाचे लग्न झालेले नाही व ती रामची मुलगी आहे. राम व लेखक व्यक्ती यांच्यातील नात्याचे वर्णन करणारा पर्याय निवडा.
- दया, माया, साया, जिया व निया या गृहिणी आहेत व त्यांचा गट त्यांच्या वसाहतीतील बागेची काळजी घेतो. त्यांना सुट्टीत शेला, कोटा, मोहा, हेटा आणि वेला या ठिकाणांना भेट द्यायची होती. त्यांनी मार्च, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने या सुट्टीसाठी निवडले. पुढे काही अधिकची व संबंधित तथ्ये दिली आहेत. जियाने डिसेंबरमध्ये सुट्टी घेतली पण मोहा किंवा हेटाला भेट दिली नाही. माया जूनमध्ये शेलाला गेली. दया कोटाला गेली पण मार्च किंवा सप्टेंबरमध्ये नाही. निया मार्चमध्ये सुट्टीवर गेली परंतु हेटाला पूर्वी भेट दिल्यामुळे ती तेथे गेली नाही. नोव्हेंबरमध्ये सुट्टी घेतलेल्या व्यक्तीचे नाव निवडा.
- पुढे एक मुख्य विधान दिले असून त्यानंतर (a), (b), (c) आणि (d) अशी नामनिर्देशने असलेली विधाने दिली आहेत. 1ल्या विधानात 2रे विधान अंतर्निहीत असणारी आणि दोन्ही विधाने एकत्रितपणे मुख्य विधानाशी तर्कसंगत असतील अशी क्रमवार जोडी निवडा. जर तुमच्याकडे तिकिट असेल तरच तुम्ही नाटक पाहू शकता.
- आयेशा पदवीसाठी 1950 - 2010 या कालखंडातील साहित्याचा अभ्यास करत आहे. अभ्यासासाठी तिने पुस्तक खरेदी करण्याचे ठरवले. स्थानिक दुकानात उपलब्ध असलेल्या संबंधित अशा पाच पुस्तकांची माहिती खाली दिलेली आहे.
- A आणि B एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु दोन दिवसांनंतर B ला काम सोडावे लागले आणि उरलेले काम A ने पूर्ण केले. हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले ?
- एका पिशवीमध्ये 3 पांढरे, 2 निळे व 5 लाल चेंडू आहेत. जर यादृच्छिक पद्धतीने पिशवीमधून 1 चेंडू जर काढला, तर काढलेला चेंडू लाल नाही, याची संभाव्यता किती आहे ?
- खालील संख्यांचा मध्यांक X' आहे असे मानू 13, 8, 15, 14, 17, 9, 14, 16, 13, 17, 14, 15, 16, 15, 14. जर 8 ऐवजी 18 ही संख्या घेतली, तर येणारा मध्यांक 'Y' येतो. तर 'X' आणि 'Y' यांची बेरीज किती ?
- पुढे दिलेल्या अभिव्यक्ती अभ्यासून अपरिचित भाषेची संरचना ओळखा. यासाठी दोन गृहीतके वापरा : नियमाला अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीतून साधित नियम लागू पडतात.
MPSC राज्यसेवा पूर्व मागील वर्षाचे विश्लेषण
कोणत्याही परीक्षेचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी त्या परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका चे विश्लेषण करणे गरजेचे असते. हेच महत्त्व जाणून विद्यार्थ्यांसाठी खाली मागील वर्षाच्या पूर्व परीक्षेचे संपूर्ण विश्लेषण देण्यात आलेले आहे.
GS Paper 1
MPSC राज्यसेवा पूर्व पेपर 1 सामान्य अध्ययन या विषयामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय असतात. पेपर क्रमांक एक मध्ये सर्वात जास्त प्रश्न ही सामान्य विज्ञान या घटकावर बघायला मिळतात. विषय निहाय संपूर्ण विश्लेषण खालील तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहे:
अनु.क्र. | विषयाचे नाव | प्रश्न संख्या | काठीण्य पातळी |
01 | सामान्य विज्ञान | 20 | मध्यम ते कठीण |
02 | इतिहास | 15 | मध्यम |
03 | भूगोल | 15 | मध्यम ते कठीण |
04 | राज्यव्यवस्था | 15 | सोपे-मध्यम |
05 | अर्थव्यवस्था | 15 | मध्यम ते कठीण |
06 | चालू घडामोडी | 15 | मध्यम |
07 | पर्यावरण आणि पर्यावरण शास्त्र | 5 | मध्यम |
एकूण | 100 | मध्यम |
CSAT Paper 2
MPSC राज्यसेवा पूर्व पेपर 2 ची एकूण काठीण्य पातळी मध्यम असते. MPSC राज्यसेवा पेपर 2 चे प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतात. खाली दिलेल्या सारणी मध्ये एमपीएससी राज्यसेवा पूर्व CSAT Paper 2 पेपरचे संपूर्ण विश्लेषण देण्यात आलेले आहे:
अनु.क्र. | विषयाचे नाव | प्रश्न संख्या | काठीण्य पातळी |
01 | उताऱ्यांचे आकलन (द्विभाषिक) (Bilangual) | 40 (8 उतारे) | मध्यम |
02 | उताऱ्यांचे आकलन (मराठी) | 5 (1 उतारा) | सोपे |
03 | उताऱ्यांचे आकलन (इंग्लिश) | 5 (1 उतारा) | मध्यम |
04 | गणित व बुद्धिमत्ता | 15 | सोपे-मध्यम |
05 | तार्किक क्षमता | 10 | मध्यम ते कठीण |
06 | निर्णय क्षमता | 5 | मध्यम |
एकूण | 80 | सोपे-मध्यम |
To access the content in English, click here: MPSC Rajyaseva Prelims 2022 Exam Analysis.
Related Links | |
Comments
write a comment