एमपीएससी महाराष्ट्राची 'जलप्रणाली' 2021- Drainage System of Maharashtra for MPSC in Marathi

By Saroj Singh|Updated : September 7th, 2021

Drainage System of Maharashtra (Part I) for MPSC exams / महाराष्ट्राची 'जलप्रणाली 2021: कोणत्याही प्रदेशातील मुख्य नदी, तिला मिळणाऱ्या उपनद्या, उपनद्यांना मिळणाऱ्या सहाय्यक नद्या व सहाय्यक नद्यांना मिळणारे नाले ओढे या सर्व लहान मोठ्या प्रवाहांचा वाहण्याचा जो विशिष्ट क्रम असतो त्या प्रवाहाच्या जाळ्याला 'जलप्रणाली' असे म्हणतात. या लेखात, ड्रेनेज सिस्टीमबद्दल फक्त एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस आणि एमपीएससी संयुक्त परीक्षेसाठी महत्वाचे असलेले पैलू तपशीलवार कळू द्या.

हा लेख MPSC राज्य सेवा परीक्षा आणि MPSC संयुक्त परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे.
Table of Content

महाराष्ट्राची 'जलप्रणाली'

जलप्रणाली'

कोणत्याही प्रदेशातील मुख्य नदी, तिला मिळणाऱ्या उपनद्या, उपनद्यांना मिळणाऱ्या सहाय्यक नद्या व सहाय्यक नद्यांना मिळणारे नाले ओढे या सर्व लहान मोठ्या प्रवाहांचा वाहण्याचा जो विशिष्ट क्रम असतो त्या प्रवाहाच्या जाळ्याला 'जलप्रणाली' असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध वैशिष्ट्ये आहेत आणि महाराष्ट्र चा भौगोलिक प्रदेश सुद्धा याला अपवाद नाही. महाराष्ट्राचा प्रदेश हा विविधतेने नटलेला आहे.  येथील भौगोलिक वैशिष्टयांमुळे महाराष्ट्रातील नदीप्रणालीला विशिष्ट आकार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रात विविध  प्रकारची जलप्रणाली आढळते:

 1. वृक्षाकार जलप्रणाली: या प्रकारात प्रमुख नदी व तिला मिळणाऱ्या उपनद्या यांचा विकास वृक्षाच्या मुळाप्रमाणे झालेला दिसतो. उदा. गोदावरी, भीमा.
 2. समांतर जलप्रणाली: एखाद्या प्रदेशात एकाच दिशेने उतार असल्यामुळे या उतारावरून वाहणाऱ्या नद्या एकमेकांना समांतर असतात. उदा. कोकणातील नद्या .
 3. केंद्रत्यागी जलप्रणाली: या पर्वतावरून उगम पावणाऱ्या नद्यांचे प्रवाह एका उंच केंद्राकडून  सर्व दिशांना वाहत जातात . उदा. महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या नद्या.
 4. अनिश्चित जलप्रणाली: जेथे लहान मोठे सरोवरे, तलाव असतात तेथे नद्या विशिष्ट असा प्रवाह तयार करू शकत नाहीत. जलप्रणालीचा हा एक नद्यांचा समन्वय नसणारा प्रकार आहे. मुख्यतः भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आढळून येतात.

महाराष्ट्रातील नदीप्रणाली

सह्याद्री पर्वताला प्रमुख जलविभाजक मानून महाराष्ट्रातील नदीप्रणालीचे दोन विभाग पडतात: 

     १. पूर्व वाहिनी नद्या, उदा. गोदावरी, कृष्णा.

     २. पश्चिम वाहिनी नद्या, उदा. नर्मदा, तापी आणि कोकणातील नद्या

महाराष्ट्र नदी-बेसिन नकाशा

 

महाराष्ट्रातील नद्यांची खोरे

महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत आणि पठारावरील इतर निरनिराळ्या पर्वत रांगामुळे मुख्यतः नद्यांची ४ खोरे आढळून येतात.

 •    गोदावरी खोरे
 •    कृष्णा आणि भीमा खोरे
 •    तापी-पूर्णा खोरे
 •    कोकणातील नदी खोर 

 1. गोदावरीचे खोरे

 गोदावरी:

 • गोदावरीचा उगम मध्य भारतात पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथे होतो आणि १,४६५. किमी वाहून हि नदी आंध्र प्रदेशमध्ये  बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. ही नदी महाराष्ट्रात 668 किमी वाहते. लांबी, पाणलोट क्षेत्र आणि प्रवाह या दृष्टीने गोदावरी ही भारतीय द्वीपकल्पावरील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरीचे खोरे सुमारे ३,१२,८१२ चौ.कि.मी.पर्यंत पसरलेले आहे, ज्यात महाराष्ट्राने 49% (१,५३,७७९ चौ.कि.मी.) व्यापले आहे. ही महाराष्ट्राव्यतिरिक्त, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओरिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते.
 • गोदावरीला खालच्या भागात पावसामुळे पुराचा सामना करावा लागतो. राजामुंद्री नंतर गोदावरी विविध शाखा मध्ये विभागली जाते. ज्यामुळे मोठा त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे.  ही नदी 'पवित्र नदी' म्हणून  मानली जाते. गोदावरीच्या आकार व विशालतेमुळे तिला ‘वृद्ध गंगा किंवा दक्षिणा गंगा’ असेही संबोधले जाते. तिला उजव्या तीराने प्रवरा, सिंदफणा, दारणा, मुळा, बोर, बिंदुसरा, कुंडलिका आणि डाव्या तीराने कादवा, शिवणा, पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती, या उपनद्या मिळतात. गोदावरीचा प्रवाह नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या महाराष्ट्रातील जिल्ह्यातून जातो.

गोदावरीच्या महत्वाच्या उपनद्या

मांजरा : या नदीचा उगम बालाघाट डोंगर रांगेत बीड जिल्ह्यातील पाटोद्याजवळ होतो.  हि नदी ७२४ कि.मी. वाहत जाऊन कुंडलवाडीजवळ गोदावरीस मिळते.

पूर्णा : या नदीचा उगम अजिंठा पर्वत रांगेत होतो.   हि नदी २७४ कि.मी. वाहत जाऊन कंठेश्वर येथे  गोदावरीस मिळते.

वर्धा : ही नदी सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिण उतारावर उगम पावते. या नदीचा प्रवाह सामान्यतः दक्षिण उत्तर असून तिचा महाराष्ट्रातील प्रवाह ४५५ कि.मी. आहे.

वैनगंगा : वैनगंगा ही  नदी मैकल पर्वत रांगेत मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकडी जवळ उगम पावते.  हि नदी उत्तर-दक्षिण दिशेने ३०० कि.मी. वाहते.

 2. कृष्णा-भीमा खोरे

कृष्णा

 •  ही नदी  महाबळेश्वर येथे उगम पावते. तिच्या एकूण प्रवाहाची लांबी १,४०० कि.मी. आहे. ही नदी  महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागातून वाहते. आणि शेवटी बंगालच्या उपसागरास मिळते. या नदीच्या खोऱ्याचे क्षेत्रफळ २,५८,९४८ चौ.कि.मी. आहे. गंगा, गोदावरी, ब्रह्मपुत्रानंतर कृष्णा नदी पाण्याच्या प्रवाहाच्या बाबतीत  चौथ्या क्रमांकाची नदी आहे. तिला कृष्णवेणी असेही म्हणतात. महाराष्ट्रात ही नदी २८२ कि.मी. वाहते आणि या नदीचे पाणलोट क्षेत्रफळ २८,७०० चौ.कि.मी आहे. हि नदी महाराष्ट्रातील कोल्हापूर , सांगली आणि सातारा या जिल्ह्यातून वाहते. कृष्णेच्या मुख्य उपनद्या म्हणजे कोयना, वारणा, पंचगंगा (कोल्हापूरची जीवनरेखा), दूधगंगा इ. ह्या आहेत.

 भीमा

 • भीमा नदीचा उगम कर्जत जवळ भीमाशंकर डोंगरावर होतो. ही नदी  महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून ८६१ कि.मी. वाहते. भीमा ही कृष्णेची मुख्य उपनदी आहे. ह्या नदीचा प्रवाह महाराष्ट्रातून ४५१ कि.मी. वाहतो. ह्या नदीच्या खोऱ्याने  ७०,६१४ चौरस कि.मी. क्षेत्र व्यापले आहे. महाराष्ट्रात भीमा खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ ४६,१८४ चौ. कि.मी. आहे. ही नदी पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहते. सोलापूर जिल्ह्यातील भीमेच्या काठावर, पंढरपूर हे एक सुप्रसिद्ध पवित्र ठिकाण आहे. येथे ही नदी चंद्रभागा म्हणून ओळखली जाते कारण या ठिकाणी तिचा आकार चंद्रासारखा झाला आहे.  भीमेच्या डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या म्हणजे वेळ, पुष्पावती, घोड, सीना, मीना, कुकडी, बोरी, भोगावती आणि  उजव्या तीरावर भामा, इंद्रायणी, पवना, मूळ -मुठा, नीरा, मान उपनद्या येऊन मिळतात.

 3. तापी-पुर्णा खोरे 

तापी

 • मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगातील मुलताईजवळ हि नदी उगम पावते.  अरबी समुद्रास मिळण्याअगोदर ही ७२४ कि.मी. वाहते. त्यापैकी महाराष्ट्रात या नदीची लांबी २०८ कि.मी. आहे. तापीचे खोरे ६५,१५० चौरस कि.मी. असून ज्यात महाराष्ट्रात खोऱ्याचे  क्षेत्रफळ ३१,६६० चौरस कि. मी. आहे. ही नदी  द्वीपकल्पातील  पश्चिम वाहिनी नद्यांपैकी दुसर्‍या क्रमांकाची नदी आहे. पुर्णा, वेघर, गिरणा, बोरी, पांझरा ह्या तापीच्या डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या आहेत, तर उजव्या किनाऱ्यावरून  बैतूल, अरुणावती, गोमती ह्या नद्या येऊन मिळतात.  ही नदी महाराष्ट्रातील  अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून वाहते. 

पुर्णा

 • पूर्णा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. ती तापी नदीच्या  मुख्य उपनद्यांपैकी एक आहे. तिचा उगम गाविलगड डोंगरावर (मध्य प्रदेश) झाला आहे. . नदीची एकूण लांबी ३३४ कि.मी. आहे. ही नदी अकोला, बुलढाणा आणि जळगाव या  जिल्ह्यातून वाहते. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव गावात पुर्णा नदी तापीला येऊन मिळते. या नदीच्या  गोमती, पेंढी , काटेपूर्णा, मोरना, नळगंगा, नंद, वान इत्यादी उपनद्या आहेत.

कोकण

 •  सह्याद्री टेकड्यांच्या शिखरावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा प्रदेश  हंगामी नद्यांनी व्यापला आहे . पूर्वेकडे सह्याद्रीची उपस्थिती आणि पश्चिमेस अरबी समुद्र आणि सह्याद्रीच्या पश्चिमेस तीव्र उतार यामुळे नद्यांची लांबी लहान बनली आहे. कोकणच्या सर्व नद्या पर्वतावरून अतिशय वेगाने खाली येताना खोदकाम करत येतात  आणि  अरबी समुद्राला जाऊन मिळतात. 

नदी

उगम

लांबी

वैशिष्ट्ये

वैतरणा

त्रंबकेश्वर

१५४ कि.मी.

उपनद्या : सूर्या, तानसा

उल्हास

राजमाची टेकड्या

१२२ कि.मी.

उपनद्या: काळू, भातसा

अंबा

राजमाची टेकड्या

७४ कि.मी.

नदी काठी पाली हे अष्टविनायकाचे ठिकाण

कुंडलिका

सुधागड

६५ कि.मी.

उत्तर आणि दक्षिण कोकण ची सीमा निर्माण करते.

To know about the "Drainage system of Maharashtra (Part II), stay tuned.         

Other Important Subject Links

Rock System in Maharashtra for MPSC Study Notes

एमपीएससी संविधानाची ऐतिहासिक उत्क्रांती 2021- Historical Evolution of the Constitution in Marathi

Soil in Maharashtra for MPSC Study Notes

एमपीएससी भारताची किनारपट्टी फॉर पंसक एक्साम 2021- Coastal Plain of India for MPSC in Marathi

एमपीएससी महाराष्ट्रातील प्रशासकीय एकके- Administrative Units of Maharashtra for MPSC in Marathi

महाराष्ट्राचा भूगोल एमपीएससी परीक्षा 2021- Geography of Maharashtra for MPSC in Marathi

Geography of Maharashtra Study Notes for MPSC Exam 2021

एमपीएससी भारतीय राज्यघटनेची निर्मिती 2021- Making of the Indian Constitution for MPSC in Marathi

एमपीएससी संविधानाची ऐतिहासिक उत्क्रांती 2021- Historical Evolution of the Constitution in Marathi

एमपीएससी यूरोपीयनांचे भारतातील आगमन 2021- Arrival of Europeans in India for MPSC in Marathi

एमपीएससी विद्युतधारा 2021- Current Electricity for MPSC State Exams in Marathi

Current Electricity Study Notes for MPSC State Exam 2021

Sound Study Notes for MPSC State Exam 2021

एमपीएससी ध्वनी 2021- Sound for MPSC in Marathi

एमपीएससी भौतिकशात्रातील काही मूलभूत संज्ञा 2021- Basic Terminologies of Physics for MPSC in Marathi

एमपीएससी भारतातील बेरोजगारी आणि दारिद्रय 2021- Unemployment and Poverty in India for MPSC in Marathi

Light Study Notes of Physics for MPSC State Exam 2021

एमपीएससी प्रकाश 2021- Light for MPSC State Exam in Marathi

Posted by:

Saroj SinghSaroj SinghMember since Dec 2019
Community Manager [https://www.quora.com/profile/Saroj-Singh-745]
Share this article   |

Comments

write a comment

Follow us for latest updates