एमपीएससी दैनिक चालू घडामोडी - MPSC Daily Current Affairs 13th September 2021

By Ganesh Mankar|Updated : September 13th, 2021

चालू घडामोडी जवळजवळ प्रत्येक सरकारी परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्वात महत्वाच्या विभागांपैकी एक आहे, ती राज्य सेवा असेल  किंवा इतर परीक्षा. म्हणूनच, दररोजच्या चालू घडामोडींवर लक्ष ठेवणे आपल्या तयारीचा एक अमूल्य भाग आहे. येथे आम्ही तुम्हाला सर्व संबंधित चालू घडामोडींसह सामायिक करणार आहोत जे तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आजच्या चालू घडामोडीतील महत्वाची माहिती पुढे दिलेली आहेत. हा घटक एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा,एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र पोलीस भरती इत्यादी परीक्षा साठी फार महत्त्वाचा आहे. 

Table of Content

दैनिक चालू घडामोडी/Daily Current Affairs 13th September 2021

तेलंगणात Medicine From The Sky’ योजनेची सुरुवात

byjusexamprep

  • ‘मेडिसिन फ्रॉम द स्काय’योजनेची सुरुवात तेलंगणा या राज्यात करण्यात आली.
  • केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि तेलंगणाचे मंत्री के टी रामाराव यांची उपस्थितीत  या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
  • उद्देश:ड्रोन वापरून दुर्गम भागात लस आणि आवश्यक वस्तू पोहोचवने.
  • नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीड्रोन धोरण तयार करण्यात आले आहे. प्रत्येक तीन महिन्यांनंतर याचं विश्लेषण केले जाईल.
  • संपूर्ण देशासाठी एक मॉडेल तयार करण्यासाठी आयटी मंत्रालय,विमान मंत्रालय,राज्य सरकार,आरोग्य मंत्रालय हे सर्व काम करतील.
  • केंद्र ड्रोन नियम 2021:

मुख्य बदल:

  • विमानतळाच्या परिमितीपासून 8 ते 12 किमी दरम्यान ग्रीन झोनमध्ये 400 फूट आणि 200 फूट पर्यंत उड्डाण परवानगी आवश्यक नाही.
  • सूक्ष्म ड्रोन (गैर-व्यावसायिक वापरासाठी), नॅनो ड्रोन आणि आर अँड डी संस्थांसाठी पायलट परवाना आवश्यक नाही.
  • भारतात नोंदणीकृत परदेशी मालकीच्या कंपन्यांनी ड्रोन ऑपरेशन्सवर कोणतेही बंधन नाही.
  • DGFT द्वारे नियमन करण्यासाठी ड्रोन आणि ड्रोन घटकांची आयात.
  • कोणत्याही नोंदणी किंवा परवाना जारी करण्यापूर्वी कोणत्याही सुरक्षा मंजुरीची आवश्यकता नाही.
  • हवाबंदपणाचे प्रमाणपत्र, अद्वितीय ओळख क्रमांक, पूर्व परवानगी आणि R&D घटकांसाठी दूरस्थ पायलट परवान्याची आवश्यकता नाही.
  • ड्रोन नियम 2021 अंतर्गत ड्रोनचे कव्हरेज 300 किलोवरून 500 किलो पर्यंत वाढले. हे ड्रोन टॅक्सींना देखील कव्हर करेल.
  • क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि त्याच्याद्वारे अधिकृत प्रमाणपत्र संस्थांना सुपूर्द केलेल्या हवाई योग्यतेचे प्रमाणपत्र जारी करणे.
  • निर्माता स्व-प्रमाणन मार्गाद्वारे डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर त्यांचा ड्रोनचा अद्वितीय ओळख क्रमांक तयार करू शकतो.
  • ड्रोन नियम, 2021 अंतर्गत जास्तीत जास्त दंड INR 1 लाख केला. तथापि, इतर कायद्यांच्या उल्लंघनाच्या संदर्भात हे दंड लागू होणार नाही.
  • मालवाहतुकीसाठी ड्रोन कॉरिडॉर विकसित केले जातील.
  • व्यवसायासाठी अनुकूल नियामक व्यवस्था सुलभ करण्यासाठी ड्रोन प्रमोशन कौन्सिलची स्थापना केली जाईल.

(Source – AIR News)

24 पैकी 5 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांपैकी प्रकल्प पूर्ण नाशिक जिल्ह्यात

byjusexamprep

  • नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मितीच्या 24 प्रकल्पांपैकी पाच पूर्ण झाले आहेत.
  • अजून दहा प्रकल्प लवकरच सुरु करण्यात येतील होतील.
  • जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता हि तयारी केली आहे.
  • ऑक्सिजन निर्मितीचे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले
  • नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मंधारे, नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

(Source – AIR)

साताऱ्यात फीट इंडिया फ्रीडम रनचं आयोजन  

byjusexamprep

  • आजादी का अमृतमहोत्सव" कार्यक्रमाअंतर्गत साताऱ्यात नेहरु युवा केंद्र, एनएसएस आणि शिवाजी विद्यपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं फीट इंडिया फ्रीडम रनचं सातारा इथल्या छत्रपती शाहू क्रिडा संकूल ते यशंवतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पर्यंत आयोजन केलं होतं.
  • रोज अर्धा तास व्यायामासाठी आपल्या निरोगी आरोग्यासाठी हा संदेश या रनमधून दिला गेला.
  • अशा उपक्रमांमधल्या सहभागामुळे देशाच्या सक्षमीकरणात मोठी मदत होईल, असं मत आयोजकांनी व्यक्त केलं.
  • या रन मधे युवक वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता.

(Source – AIR)

खाद्य तेल आणि खाद्य तेल बियांच्या आयातीवरच्या शुल्कात सूट देण्याचा केंद्रसरकारचा निर्णय 

byjusexamprep

  • केंद्र सरकारनं खाद्य तेल आणि खाद्य तेल बियांच्या आयातीवरच्या शुल्कात सूट द्यायचा निर्णय घेतला आहे.
  • यासंदर्भात केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागानं काल अधिसूचना जारी केली.
  • खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमती कमी व्हाव्यात आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी हा निर्णय घेतला असून, आजपासून ही अधिसूचना लागू केली असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.

(Source – PIB)

परराष्ट्र व्यवहार मंत्री मीनाक्षी लेखी  पोर्तुगाल आणि स्पेनच्या दौऱ्यावर

byjusexamprep

  • भारताच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी पोर्तुगाल आणि स्पेनच्या दौऱ्यावर जात आहेत.
  • 12 तारखेपासून ते 14 सप्टेंबरपर्यंत पोर्तुगाल दौरा आणि 17 तारखेपर्यंत स्पेनचा दौरा असेल.
  • या दौऱ्यात त्या भारतीय सांस्कृतिक परिषदेच्यावतीनं आयोजित कार्यक्रमात भारतीय नागरिकांशी संवाद साधतील.
  • तसंच भारताचं विकास प्रक्रियेतील सहकार्य या विषयावरील परिसंवादातही त्या सहभागी होणार आहेत.

(Source – AIR)

व्हायकॉम18’कडे ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे प्रक्षेपण अधिकार  

byjusexamprep

  • 2022मध्ये कतारला होणाऱ्या‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या प्रक्षेपणाचे अधिकार रिलायन्सचे पाठबळ असलेल्या व्हायकॉम18’ नेटवर्कने 450 कोटी रुपयांना मिळवले आहेत.
  • सोनी, स्टार स्टार स्पोर्ट्स या बडय़ा वाहिन्यांना धक्का देत ‘व्हायकॉम18’ने देशातीलक्रीडा प्रक्षेपण उद्योगात प्रथमच आव्हान निर्माण केले आहे.
  • 2010 पर्यंत विश्वचषक फुटबॉल स्पर्धास्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रक्षेपित होत होती. 2012 मध्ये सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने 2014 (रिओ) आणि 2018 (रशिया) या दोन विश्वचषक स्पर्धाचे प्रक्षेपण अधिकार मिळवले.
  • तसेचस्पेनमधील ला लिगा, इटलीमधील सेरी ए, फ्रान्समधील लीग-वन, अबू धाबी टेन-10 लीग, रस्ते सुरक्षा जागतिक क्रिकेट मालिका, कॅरेबाओ चषक या स्पर्धा ‘व्हायकॉम18’वर प्रक्षेपित होतात.

(Source – PIB)

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढं ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

byjusexamprep

  • राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची राज्य शासनाची अधिसूचना सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली आहे.
  • याबाबतचा संपूर्ण अधिकार राज्य निवड निवडणूक आयोगाचा असल्यानं, त्यात राज्य सरकार हस्तक्षेप करु शकत नाही असही न्यायालयानं म्हटलं आहे.
  • इतर मागास वर्गीय-ओ.बी.सी. आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांहून जास्त झाल्यानं राज्यातील काही स्वराज्य संस्थांमधील निवडी सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्या. तिथं पोटनिवडणुका घेण्याचं आयोगान नियोजन केलं.
  • मात्र, कोरोना विषाणू संसर्गाचं कारण देत राज्य सरकारनं त्या पुढे ढकलण्याची विनंती केली होती

(Source – AIR News)

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल

byjusexamprep

  • भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांचे नाव रविवारी जाहीर केले. त्यांचा शपथविधी आज दुपारी होईल.
  • विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पटेल यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.
  • मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
  • भूपेंद्र पटेल हे 2017च्या विधानसभा निवडणुकीत घाटलोडिया मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार शशिकांत पटेल यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव करून निवडून आले होते.

भूपेंद्र पटेल यांच्याबद्दल

  • भूपेंद्र पटेल हे गुजरातमधील घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून सध्या आमदार आहेत.
  • ते पाटीदार समाजाचे नेते आहेत. पटेल 59 वर्षांचे आहेत.
  • ते अहमदाबादच्या शिलाजचा रहिवासी आहेत.
  • त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे.
  • ते दादा भगवान यांनी स्थापन केलेल्या अक्रम विज्ञान चळवळीचे अनुयायी आहेत
  • 2010 ते 2015 पर्यंत ते तहलतेज प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले.
  • 2015-17 मध्ये ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते.
  • 2008-10 मध्ये ते एएमसी स्कूल बोर्डाचे उपाध्यक्षही होते.
  • त्यांनी मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याने जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. साडेतीन वर्षांनंतर त्यांच्याकडे राज्य अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
  • ते पटेल असोसिएशनचे सरदार धाम आणि विश्व उमिया फाउंडेशनचे विश्वस्त आहेत.

(Source – AIR)

चालू घडामोडी ची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, येथे क्लिक करा:

 दैनिक चालू घडामोडी-13 सप्टेंबर 2021,डाउनलोड PDF मराठीमध्ये 
Daily Current Affairs-13th September 2021, Download PDF in English

More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य  

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment

Follow us for latest updates