hamburger

[Latest] MPSC संयुक्त परीक्षा सिलेबस 2022

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दुय्यम निबंधक या पदाविषयीचा अभ्यासक्रम MPSC संयुक्त गट ब परीक्षेत जाहीर करण्यात आलेला आहे. काय आहे, या पदाचा अभ्यासक्रम हे आपण आजच्या लेखात बघणार आहोत.

महाराष्ट्र लोक सेवा आयोग, महाराष्ट्र पीएससी आहे, महाराष्ट्र सरकारच्या विभागांना भरतीच्या आधारित विविध परीक्षा घेतात. एक म्हणजे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब स्पर्धा (MPSC Subordinate) परीक्षा. PSI, STI आणि ASO अधिकारी भरतीसाठी ही परिक्षा MPSC दरवर्षी आयोजित करते. या परिक्षेस दुय्यम सेवा परीक्षेस ‘MPSC Combined’ असेही म्हणतात, कारण त्यात एक संयुक्त पूर्व परीक्षा आणि एक संयुक्त मुख्य पेपर असतो.
आजच्या या लेखामध्ये, आपण एमपीएससी संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघणार आहोत.

Download BYJU’S Exam Prep App and prepare General Knowledge for the Maharashtra State exams

MPSC संयुक्त परीक्षा अभ्यासक्रम (MPSC Combined Revised Syllabus)

जर आपण त्याचे बारकाईने विश्लेषण केले, तर आपल्याला आढळेल की महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा खालील दोन कारणांमुळे राज्यसेवा परीक्षापेक्षा सोपी व सुलभ आहे:

  • फक्त एक पूर्व /Prelim पेपर
  • केवळ दोन मुख्य पेपर
  • सर्व पेपर MCQs/वस्तुनिष्ठ स्वरूपात असतात 

\

MPSC गट-ब संयुक्त परीक्षेची रचना (Stages of Exam)

एमपीएससी संयुक्त गट ब अभ्यासक्रमावर चर्चा करण्यापूर्वी, आपण एमपीएससी संयुक्त परीक्षा निवड प्रक्रिया कशी असते ते बघूया. एमपीएससी संयुक्त परीक्षेचा नमुना तीन टप्प्यांवर आधारित आहे:

  1. पूर्व (१ पेपर – १०० गुण) 
  2. मुख्य (२ पेपर – ४०० मार्क) 
  3. शारिरीक चाचणी व मुलाखत (केवळ PSI साठी) 

MPSC गट-ब संयुक्त (पूर्व) परीक्षा (MPSC Combined Prelims Exam Pattern)

खाली दिलेल्या सारणी मध्ये एमपीएससी संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचा Exam Pattern देण्यात आला आहे:

विषय व संकेतांक

एकूण प्रश्न

एकूण गुण

माध्यम

कालावधी

प्रश्नपत्रिकेचे

स्वरुप

सामान्य क्षमता चाचणी

100

100

English & Marathi

एक तास

वस्तुनिष्ठ

  •  प्रत्येय चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणामधून कमी करण्यात येईल 
  • टीपः अंतिम गुणवत्ता यादीसाठी Prelim चे गुण मोजले जात नाहीत. 

MPSC गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम / MPSC Combined Prelims Exam Syllabus 

  • चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील 
  • नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) 
  • इतिहास : आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास 
  • भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी , जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान , प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
  • अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न , शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या , दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी. 
  • सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र(Physics), रसायनशास्त्र(Chemistry), प्राणीशास्त्र(Zoology), वनस्पतीशास्त्र(Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene). 
  • बुद्धिमापन चाचणी व अंक गणित : बेरीज, बाजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक , बुध्यांक मापानाशी संबंधित प्रश्न.

MPSC गट-ब संयुक्त (मुख्य) परीक्षा/MPSC Combined Revised Mains Exam Pattern

या टप्प्यात वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या मुख्य परीक्षा आहेत , त्यामुळे त्यांचा अभ्यासक्रमही. पण 4 पदांसाठी पेपर -1 चा अभ्यासक्रम सारखा आहे. (संयुक्त पेपर नव्हे) 

  1. PSI मुख्य परीक्षा
  2. STI मुख्य परीक्षा
  3. ASO मुख्य परीक्षा 
  4. Sub Registrar मुख्य परीक्षा 

खाली दिलेल्या सारणी मध्ये एमपीएससी संयुक्त गट ब मुख्य परीक्षेची परीक्षापद्धती देण्यात आली आहे:

पेपर क्र. व संकेतांक

विषय व संकेतांक

एकूण प्रश्न

एकूण गुण

माध्यम

कालावधी

प्रश्नपत्रिकेचे

स्वरुप

पेपर 1

भाग A: मराठी,

भाग B: इंग्रजी &

भाग C: सामान्य ज्ञान

50 + 30+ 20 = 100

100 + 60+ 40 = 200

मराठी

&

इंग्रजी

एक तास

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

पेपर 2

सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान

100

200

मराठी

&

इंग्रजी

 

एक तास

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

 Note: प्रत्येय चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणामधून कमी करण्यात येईल 

MPSC मुख्य परीक्षा अभ्यासक्रम/ MPSC Combined Revised Mains Exam Syllabus

पेपर 1 चा अभ्यासक्रम (PSI, STI, ASO, Sub Registrar)

  • मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्‍यावरील प्रश्‍नांची उत्तरे 
  • इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage. 
  • सामान्य ज्ञान:घडामोडी- जागतिक तसेच भारतातील,माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५, संगणक व माहिती तंत्रज्ञान आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र, इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य. 

PSI: पेपर 2 चा अभ्यासक्रम/MPSC PSI Mains Exam Syllabus

  1. बुद्धिमत्ता चाचणी 
  1. महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राच्या रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पुर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), Migration of population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्या व त्यांचे प्रश्‍न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.
  2. महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ 
  1. भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रसतावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका. 
  1. मानवी हक्क व जबाबदार्‍या – संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानव, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदार्‍या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक प्रथा या सारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान. 
  1. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 
  1. भारतीय दंड संहिता, 1860 
  1. फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 
  2. भारतीय पुरावा अधिनियम, 1872 

STI: पेपर 2 चा अभ्यासक्रम/MPSC STI Mains Exam Syllabus

  1. बुद्धिमत्ता चाचणी 
  1. महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (physiographic) विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे. मानवी व सामाजिक भूगोल : लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतरण व त्याचे मूळ (सोर्स) आणि इष्ट स्थळ (डेस्टिनेशन) वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. 
  1. महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळ, राष्ट्रीय चळवळी. 
  1. भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे – शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्य मंत्री व मंत्रिमंडळ, अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ- विधान सभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार व कार्ये, विधी समित्या. 
  1. नियोजन – प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देह्स फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, 73 वी आणि 74वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हान, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल. 
  1. शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास  पायाभूत सुविधांची गरज व महत्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ – जसे उर्जा, पाणी पुरवठा व मलनि:स्सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर, इत्यादी), दळणवळण (पोस्ट व तार, दूरसंचार), रेडीओ, टीव्ही, इंटरनेट क्रायसिस, भारतातील इंफ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व यासंबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय; खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ. डी.आय. आणि इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयाचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता. 
  1. आर्थिक सुधारणा व कायदे – पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थ व्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या. GST, विक्रीकर, VAT, WTO शी संबंधित कायदे/नियम. 
  1. आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ– जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंतप्रवाह, रचना व वाढ, एफ.डी.आय. व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, आय.एम.एफ., जागतिक बँक, आय.डी.ए. इंटरनेशनल क्रेडीट रेटिंग. 
  2. सार्वजनिक वित्त व्यवस्था– महसुलाचे साधन, टॅक्स, नोन- टॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील कर सुधारणा आढावा, राज्यपातळीवरील कर सुधारणा, VAT सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भर, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तुट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझर्व्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्यस्तरावरील आढावा. 

MPSC ASO: पेपर 2 चा अभ्यासक्रम /MPSC ASO Mains Exam Syllabus

  1.  बुद्धिमत्ता चाचणी 
  1. महाराष्ट्राचा इतिहास– सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळ, राष्ट्रीय चळवळी. 
  1. महाराष्ट्राचा भूगोल– महाराष्ट्राचा रचनात्मक (physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (physiographic) विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे. मानवी व सामाजिक भूगोल : लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतरण व त्याचे मूळ (सोर्स) आणि इष्ट स्थळ (डेस्टिनेशन) वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. 
  1. भारतीय राज्यघटना– घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे – शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्य मंत्री व मंत्रिमंडळ: भूमिका, अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ- विधान सभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार व कार्ये व भूमिका, विधी समित्या. 
  1. राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कार्ये) – केंद्र सरकार, केंद्र विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ). 
  1. जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन 
  2. न्यायमंडळ – न्यायमंडळची रचना, एकात्मिक न्यायमंडळ – कार्ये, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये – लोकपाल व लोकायुक्त आणि लोक न्यायालय , संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका. 
  3. नियोजन– प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मुल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देह्स फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, 73 वी आणि 74वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हान, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.

MPSC Sub Registrar Paper 2 Syllabus (दुय्यम निबंधक अभ्यासक्रम)

  1.  बुद्धिमत्ता चाचणी 
  2. महाराष्ट्राचा इतिहास– सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळ, राष्ट्रीय चळवळी. 
  3. महाराष्ट्राचा भूगोल– महाराष्ट्राचा रचनात्मक (physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (physiographic) विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे. मानवी व सामाजिक भूगोल : लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतरण व त्याचे मूळ (सोर्स) आणि इष्ट स्थळ (डेस्टिनेशन) वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. 
  4. भारतीय राज्यघटना– घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे – शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्य मंत्री व मंत्रिमंडळ: भूमिका, अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ- विधान सभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार व कार्ये व भूमिका, विधी समित्या. 

खालील अभ्यासक्रमातील कायदे, नियम व विनियम अद्ययावत केल्याप्रमाणे लागू राहतील:

  1. नोंदणी अधिनियम, १९०८ (The Registration Act, 1908) 
  2.  महाराष्ट्र नोंदणी नियम, १९६१ (Maharashtra Registration Rules, 1961) 
  3.  नोंदणी फी तक्ता (Table of Registration Fees)  
  4. महाराष्ट्र दस्तऐवजांच्या सत्यप्रती आणि नोटिसा दाखल करणे नियम, २०१३ ( The Maharashtra Filing of True Copies of Documents and Notice Rules, 2013)  
  5. महाराष्ट्र ई-रजिस्ट्रेशन आणि ई-फायलिंग नियम, २०१३ (Maharashtra e-Registration and e-Filing Rules, 2013) 
  6.  महाराष्ट्र मुद्रांक कायदा ( Maharashtra Stamp Act )  
  7. महाराष्ट्र मुद्रांक शुल्काचा ई-शुल्कचा भरणा आणि परतावा नियम, २०१३ (Maharashtra e- Payment of Stamp Duty and Refund Rules, 2013)  
  8. महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजारमूल्य निश्चित करणे) नियम, १९९५ (Maharashtra Stamp [ Determination of True Market Value of Property | Rules, 1995)  
  9. विशेष विवाह अधिनियम १९५४ आणि विशेष विवाह नियम, १९६४ ( Special Marriage Act 1954 and Special Marriage Rules, 1964)
  10. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, 1882 ( Transfer of Property Act, 1882 ) (Chapters I, II Section 5 to 9, Chapters III Section 54, Section 55, Chapters IV Section 58, 59 and 59-A, Chapters V Section 105 and 107, Chapters VI Section 118, Chapters VII Section 122 

To download the official MPSC Combined Prelims & Mains syllabus, click here:

MPSC Combined Revised Prelims & Mains Syllabus, Download PDF

To access the content in English, click here: MPSC Combined Exam Prelims & Mains Syllabus

Related Important Links

MPSC Combined Result 2022

MPSC Combined Subordinate Services Prelims Answer Key 2022

MPSC Subordinate Services Cut Off 2022

MPSC Subordinate Services Eligibility Criteria 2022

MPSC Combined Subordinate Services Prelims Question Papers 2022

MPSC Combined Admit Card 2022

Maharashtra Subordinate Services Preparation Tips 2022

MPSC Subordinate Services Syllabus 2022

MPSC Subordinate Services Books 2022

Maharashtra Subordinate Services Salary & Job Profile in English & Marathi

Maharashtra Subordinate Services Exam Pattern 2022

 

More From Us:

Maharashtra Static GK 

MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English

Important Government Schemes For MPSC 

NCERT Books for MPSC State Exam 2022

Maharashtra State Board Books PDF

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Download BYJU’S Exam Prep App

[Latest] MPSC संयुक्त परीक्षा सिलेबस 2022 Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF’s & more, Join our Telegram Group Join Now
Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium