MPSC संयुक्त मुख्य परीक्षा अर्ज प्रक्रिया 2022
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतेच एमपीएससी संयुक्त गट ब मुख्य परीक्षेसाठी चे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पूर्व परीक्षा पास झालेल्या उमेदवारांनी 27 डिसेंबर 2021 च्या आधी मुख्य परीक्षेला अर्ज करणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 4 सप्टेंबर 2020 रोजी एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा 2020 आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर आयोगाने जाहीर केलेल्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
- नुकतेच आयोगाकडून मुख्य परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकरीता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी आयोगाने सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, तसेच पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे.
- मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याचा कालावधी 13 डिसेंबर 2021 ते 27 डिसेंबर 2021 असा आहे.
- एमपीएससी संयुक्त मुख्य परीक्षा-2022 चे अर्ज 13 डिसेंबर 2021 पासून सुरू झाले.
- स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरल्यास विहित पद्धतीने अर्ज करून आणि चलनाची प्रत मिळवून ऑनलाइन पेमेंट करण्याची प्रक्रिया 27 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
- परीक्षा शुल्क निश्चित तारखेनंतर भरल्यास ते वैध मानले जाणार नाही आणि परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही.
- MPSC संयुक्त 2021-22 जाहिरातीच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Direct Link for MPSC Combined 2022 Online Application, Apply Now!
MPSC संयुक्त परीक्षा 2022 च्या मुख्य अर्जाच्या तारखा
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा 2022 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या तारखा जाणून घेण्यासाठी खालील तक्त्यामधून जाणे आवश्यक आहे.
महत्वाच्या घटना | कालावधी |
MPSC संयुक्त मुख्य 2021-22 ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 13 डिसेंबर 2021 |
MPSC संयुक्त मुख्य 2021-22 नोंदणी अर्जाची शेवटची तारीख | 27 डिसेंबर 2021 |
MPSC संयुक्त मुख्य 2021-22 ऑनलाइन शुल्क भरणे | 27 डिसेंबर 2021 |
MPSC संयुक्त मुख्य 2021-22 ऑफलाइन फी भरणे | 30 डिसेंबर 2021 |
MPSC संयुक्त मुख्य 2021-22 परीक्षेच्या तारखा |
|
अर्ज कसा करावा?/How to Apply Online for MPSC Combined Mains Exam 2022?
MPSC संयुक्त परीक्षा 2022 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा वैध ईमेल आयडी आणि सक्रिय संपर्क क्रमांक वापरून नोंदणी करावी लागेल.
The following are the Steps for the MPSC Combined Apply Online 2022:
- पायरी 1: उमेदवारांनी सर्वप्रथम आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ उघडावे.
- पायरी 2: त्यानंतर उमेदवारांनी आपल्या प्रोफाइलचा तपशील भरावा.
- पायरी 3: त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल तेथे तुम्हाला ऑनलाइन एप्लीकेशन म्हणून एक सेक्शन दिसेल.
- पायरी 4: तेथे तुम्हाला एक यादी दिसेल, त्यात संयुक्त गट ब मुख्य परीक्षा हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करावे.
- पायरी 5: त्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी आपलाय करत आहात त्याची पात्रता आधी बघून घेणे.
- पायरी 6: तेथे तुम्हाला तीन पदांसाठीची पर्याय दिसतील. तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल ते पद तुम्ही तिथं निवडू शकतात.
- पायरी 7: त्यानंतर तुमचे परीक्षा स्थळ निवडावे.
- पायरी 8: तेथे तुम्हाला 'सब्मिट अँड पे' बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करावे.
- पायरी 9: त्यानंतर ऑनलाईन पेमेंट हा पर्याय निवडावा आणि आपले अर्ज शुल्क भरावे.
- पायरी 10: MPSC संयुक्त परीक्षा 2022 अर्जाची प्रिंटआउट घ्या
परीक्षा शुल्क/MPSC Combined Exam 2022 Application Fees
- गैर-मागासवर्गीय उमेदवारांना 544 रुपये ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे लागेल, तर मागासवर्गीय उमेदवारांना MPSC संयुक्त मुख्य परीक्षा 2022 साठी 544 रुपये भरावे लागतील.
The table given below illustrates the MPSC Combined Mains Exam 2022 Application fees for different categories below:
वर्गवारी | अर्ज शुल्क |
मागासवर्गीय नसलेले | ₹ 544 |
मागासवर्गीय | ₹ 344 |
आवश्यक गोष्टी/Prerequisites for MPSC Combined Online Application 2022
MPSC संयुक्त परीक्षा 2022 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना खालील माहिती असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे वैध आणि कार्यरत ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने प्रोफाइल तयार करताना वैध आणि कार्यरत मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.
- आयोगाने विहित तपशीलांसह अर्जदाराच्या अलीकडील छायाचित्राची स्कॅन प्रत.
- फोटो आणि स्वाक्षरी दोन्हीचा आकार 50KB पेक्षा जास्त नसावा.
- छायाचित्र आणि स्वाक्षरी या दोन्हींची परिमाणे 4.5 X 3.5 सेमी पेक्षा जास्त नसावी.
महत्वाची कागदपत्रे/MPSC Combined Online Application 2022 Important Documents
MPSC संयुक्त अर्ज 2022 भरताना, उमेदवारांनी खालील कागदपत्रे सोबत ठेवली पाहिजेत.
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- नॉन-क्रिमी-लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जात/EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- इतर प्रमाणपत्रे जसे की क्रीडा पडताळणी प्रमाणपत्र, माजी सैनिक डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र इ. (लागू असल्यास)
To access the content in English, click here:
MPSC Combined 2022 Application Form
More From Us:
Maharashtra Static GK
MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English
Important Government Schemes For MPSC
NCERT Books for MPSC State Exam 2022
Maharashtra State Board Books PDF
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
Download BYJU'S Exam Prep App

Comments
write a comment