hamburger

MPSC State Services Prelims Result Latest News: MPSC राज्यसेवा परीक्षा निकालाबाबत अपडेट 2020

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

MPSC आयोगाने नुकताच एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे.आयोगाने पूर्वी घेतलेल्या सर्व पूर्व परीक्षेचे मुख्यतः MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे निकाल प्रलंबित आहेत. खूप सारे विद्यार्थी पूर्व परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा करत आहे. त्याच संबंधित आज एक नवीन अपडेट दिले आहे. विद्यार्थी हे अपडेट आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ mpsc. gov. inवर जाऊन बघू शकतात. 

MPSC Prelims Result Latest Update/MPSC राज्यसेवा परीक्षा निकालाबाबत अपडेट

MPSC आयोगाने 2020 पासून घेतलेल्या विविध परीक्षांचे निकाल प्रलंबित होते यातील बहुतेक पूर्वपरीक्षाना एका वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला आहे तरीसुद्धा अजूनही त्या संबंधात कुठलेच अपडेट नव्हते. परंतु आज त्यासंबंधी एक नवीन प्रसिद्धीपत्रक आले आहे. 

The results of various examinations conducted by the MPSC Commission from 2020 onwards are pending. But today a new press release has come out about it.

पूर्वपरीक्षेच्या प्रलंबित निकालाबाबत अपडेट
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित पूर्व परीक्षेचे निकाल अद्यापही प्रलंबित आहेत. परंतु आयोगाने प्रसिद्ध केलेल्या नवीन पत्रात खाली दिलेल्या तीनही परीक्षांचे निकाल तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सदर प्रक्रिया पूर्ण होतात नजीकच्या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येईल. 

Update on pending results of MPSC Civil Services Prelims Exam 
The results of the MPSC Prelims Exam conducted by the Maharashtra Public Service Commission are still pending. However, in a new letter issued by the commission, the process of preparing the results of all the three examinations given below is in the final stage and the results will be announced in the coming weeks.

To download the official announcement, click here:

MPSC State Services Prelims Exam, Download Official PDF

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा दिनांक बाबत अपडेट
आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, एमपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आयोग लवकरच मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करेल.
तसेच उर्वरित सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020 तसेच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 2020 या परीक्षांचा सुद्धा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच त्यांच्या मुख्य परीक्षांचा दिनांक जाहीर करण्यात येईल.

Update regarding MPSC State Service Main Exam Date

According to the Commission’s press release, the Commission will announce the date of the main examination soon after the results of the MPSC pre-examination are declared.
The rest of the Assistant Motor Vehicle Inspectors Pre-Examination 2020, as well as the Maharashtra Civil Engineering Prelims Exam 2020, will also be announced soon after the results of the pre-examination are announced.

अ.क्र. परीक्षेचे नाव पूर्व परीक्षाचा निकाल  मुख्य परीक्षा तारीख 
1 सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020/Assistant Motor Vehicle Inspector 2020 नजीकच्या आठवड्यात  लवकरच जाहीर होईल 
2 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 2020/MPSC Civil Engineering Prelims Exam 2020 नजीकच्या आठवड्यात  लवकरच जाहीर होईल
2 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020/State Civil Services Prelims Exam 2020 नजीकच्या आठवड्यात  लवकरच जाहीर होईल

विविध सामाजिक प्रवर्गांकरीता आरक्षित पदसंख्येबाबत अपडेट

सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी असलेले आरक्षण (SEBC) म्हणजेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर एमपीएससी मधील आधी प्रकाशित झालेल्या जाहिरातीतील आरक्षण व्यवस्था बाबत उमेदवारांमध्ये संभ्रम होता. त्याबाबत सुद्धा आयोगाने काही सूचना केल्या आहेत आयोगाने केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे-
शासनाच्या संबंधित विभागाकडून प्राप्त होणाऱ्या पद संख्या आणि आरक्षणाच्या आधारे आयोगाकडून भरती प्रक्रिया राबविण्यात येते. पदसंख्या आणि आरक्षित जागा हा विषय पूर्णतः शासनाच्या अखत्यारीतील आहे. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार आयोगास विविध सामाजिक व समांतर आरक्षित पदावरील भरतीसाठी प्राप्त होणाऱ्या पदांच्या मागणीपत्राच्या आधारे भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असल्यामुळे विविध सामाजिक घटकासाठी आरक्षित जागा निश्चित करण्याची अथवा तपासण्याची बाब आयोगाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही.

Updates on posts reserved for various social categories

Candidates were confused about the reservation system in the previously published advertisement in MPSC after the Supreme Court cancelled the reservation for Socially and Economically Backward Classes (SEBC) i.e. Maratha Reservation. The Commission has made some announcements in this regard
The recruitment process is carried out by the Commission on the basis of the number of posts and reservations received from the concerned department of the Government. The issue of posts and reserved seats are entirely within the purview of the government. As per the prevailing policy of the Government, the Commission is conducting a recruitment process on the basis of applications received for various social and parallel reserved posts.

More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य  

MPSC State Services Prelims Result Latest News: MPSC राज्यसेवा परीक्षा निकालाबाबत अपडेट 2020 Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF’s & more, Join our Telegram Group Join Now
Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium