एमपीएससी भौतिकशात्रातील काही मूलभूत संज्ञा 2021- Basic Terminologies of Physics for MPSC in Marathi

By Ganesh Mankar|Updated : January 14th, 2022

Basic Terminologies of Physics for MPSC exams / भौतिकशास्त्रातील काही मूलभूत संज्ञा 2021: भौतिकशास्त्र हा MPSC च्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचा विषय आहे.  राज्य सेवा परीक्षेत जवळपास यावर सहा ते सात प्रश्न येतात, तसेच एमपीएससी कम्बाईन एक्झाम मध्ये या घटकावर तीन ते चार प्रश्न येतात , पोलीस भरती, आरोग्य विभाग यांसारख्या सर्वच परीक्षांमध्ये भौतिकशास्त्र या विषयांवर प्रश्न येतात. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. 

Table of Content

भौतिकशास्त्रातील काही मूलभूत संज्ञा

भौतिकशास्त्र विषयावर एमपीएससी आयोगाने प्रत्येक परीक्षेत प्रश्न विचारलेच आहेत. आपण आज भौतिकशास्त्रातील काही मूलभूत संज्ञा बघणार आहोत.  भौतिकशास्त्राचा पाया पक्का करण्यासाठी आपल्याला या संज्ञा माहिती असणे आवश्यक आहे तेच आता आपण पुढे बघू या.

अंतर (Distance) & विस्थापन (Displacement):

  • अंतर म्हणजे आरंभ बिंदू व अंतिम बिंदू या मधील मार्ग क्रम असतो.
  • अंतर ही Scalar quantity आहे.
  • आरंभ बिंदू व अंतिम बिंदू यांच्यातील कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. म्हणजेच विस्थापन = चाल + दिशा.
  • विस्थापन ही Vector quantity आहे.
  • विस्थापन कधीही अंतरापेक्षा कमी किंवा Same असते.
  • SI: m & CGS: cm

वेग (Velocity):

  • एखाद्या वस्तूने ठराविक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग (Velocity) म्हणतात.
  • वेग = विस्थापन / वेळ
  • SI: m/s & CGS: cm/s

त्वरण (Acceleration):

  • ठराविक कालावधी मध्ये वेगामध्ये होणाऱ्या बदलाला त्वरण असे म्हणतात.
  • त्वरण = v-u/t = वेग बदल / काळ = अंतिम वेग – आरंभ वेग /एकूण कालावधी
  • SI:metre per second per second (m/s2)
  • वेग कमी होत असेल, तर Negative त्वरण असते. वेग वाढत असेल, तर Positive त्वरण असते.

गती विषयक अन्य सूत्रे

    • वेग - काळ संबंध
    • Displacement - काळ (time) संबंध
    • Displacement - वेग संबंध

जडत्व (Inertia):

एखाद्या वस्तूच्या स्थिर किंवा गतीमान अवस्थेच्या बदलाला विरोध करण्याच्या बदलाला विरोध करण्याच्या अवस्थेला Inertia म्हणतात.

विराम अवस्थेतील जडत्व (Inertia at rest):

वस्तूच्या ज्या गुणधर्मामुळे त्याच्या विराम अवस्थेत बदल करताना विरोध घेत असेल, तर त्याला विराम अवस्थेतील जडत्व म्हणतात.

उदा.

  1. बस अचानक सुरु होते तेव्हा प्रवासी मागच्या दिशेने पडतो .
  2. फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडले.
  3. सतरंजी झटकव्यानंतर धूळीचे कण विराम अवस्थित राहतात, त्यामुळे सतरंजी स्वछ होते

गतीचे जडत्व (Inertia due to Motion):

वस्तूच्या गतीमान अवस्थेला विराम अवस्थेत आणताना जी विरोध होतो, त्याला गतीचे जठत्व म्हणतात.

उदा.

  1. पंख्याचे बटण बंद केले तरी तो फिरत असतो. (काही काळ)
  2. चालत्या बसमधून उतरणारा प्रवासी पुढच्या दिशेने पडतो
  3. बस अचानक थांबल्यावर प्रवासी पुढच्या दिशेला झुकला जातो. 

दिशेचे जडत्व (Inertia due to Direction):

वस्तूच्या ज्या गुणधर्मामुळे त्याच्या गतीची दिशा बदलण्यास विरोध होतो, त्याला दिशेचे जडत्व म्हणतात.

उदा-

  1. वाहन गतिमान असताना कशाला लागलेला चिखल वरच्या बाजूला उडतो.
  2. चाकूला धार करतांना धार लावण्याच्या चाकांच्या स्पर्शरेषेवरून ठिणग्या उडताना दिसतात
  3.  Newton चे गती विषयक नियम

पहिला नियम - जडत्वाचा नियम (the law of inertia):

  • जेवा मुखादया वस्तूवर कोणताही बाह्य बल क्रिया करत नसेल, तेव्हा विराम अवस्थेतील वस्तु विराम अवस्थेत राहते, तर गतिमान अवस्थेतील वस्तू गतीमान अवस्थेत राहते, त्यालाच जड़त्वाचा नियम म्हणतात.

दूसरा नियम - the law of force

  • क्रिया बळ व प्रतिक्रिया बळ समान असतात, परंतु त्यांची दिशा परस्पर विरुद्ध असते.

उदा.

  1. बैट ने चेंडू मारणे.
  2. अग्नी बाणाचे उड्डाण.

तिसरा नियम - Action & Reaction:

  • जेव्हाही एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर शक्ती टाकते, तेव्हा दुसरी वस्तू पहिल्यावर समान आणि विरुद्ध शक्ती लावते.
  • संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. तसेच संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते.

उदा.

  1. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळाडू झेल घेतांना हात मागे घेतो.

कारण त्याचा हात आणि चेंडूची गती - त्यांचा कालावधी वाढला म्हणून. त्यामुळे चेंदूचा संवेग कमी होतो व हातावर आघात कमी होतो.

  1. उंच उडी मारण्याच्या मैदानात खेळाडू वाळूच्या जाड थरावर पडेल अशी व्यवस्था केलेली असते.

या घटकाची PDF Download करण्यासाठी, येथे क्लिक करा: 

भौतिकशास्त्रातील काही मूलभूत संज्ञा, Download PDF मराठीमध्ये 

To access in English, click here:

Basic Terminologies of Physics 

Other Important Subject Links

Rock System in Maharashtra for MPSC Study Notes

एमपीएससी संविधानाची ऐतिहासिक उत्क्रांती 2021- Historical Evolution of the Constitution in Marathi

Soil in Maharashtra for MPSC Study Notes

एमपीएससी भारताची किनारपट्टी फॉर पंसक एक्साम 2021- Coastal Plain of India for MPSC in Marathi

एमपीएससी महाराष्ट्रातील प्रशासकीय एकके- Administrative Units of Maharashtra for MPSC in Marathi

महाराष्ट्राचा भूगोल एमपीएससी परीक्षा 2021- Geography of Maharashtra for MPSC in Marathi

Geography of Maharashtra Study Notes for MPSC Exam 2021

एमपीएससी भारतीय राज्यघटनेची निर्मिती 2021- Making of the Indian Constitution for MPSC in Marathi

एमपीएससी संविधानाची ऐतिहासिक उत्क्रांती 2021- Historical Evolution of the Constitution in Marathi

एमपीएससी यूरोपीयनांचे भारतातील आगमन 2021- Arrival of Europeans in India for MPSC in Marathi

एमपीएससी विद्युतधारा 2021- Current Electricity for MPSC State Exams in Marathi

Current Electricity Study Notes for MPSC State Exam 2021

Sound Study Notes for MPSC State Exam 2021

एमपीएससी ध्वनी 2021- Sound for MPSC in Marathi

Light Study Notes of Physics for MPSC State Exam 2021

एमपीएससी भारतातील बेरोजगारी आणि दारिद्रय 2021- Unemployment and Poverty in India for MPSC in Marathi

एमपीएससी महाराष्ट्राची 'जलप्रणाली' 2021- Drainage System of Maharashtra for MPSC in Marathi

एमपीएससी प्रकाश 2021- Light for MPSC State Exam in Marathi

More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य  

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment

FAQs

  • एमपीएससी (MPSC) राज्यसेवा पूर्वपरीक्षेत भौतिकशास्त्रावर जवळपास सहा ते सात प्रश्न येतात.

  • एमपीएससी (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षेत भौतिकशास्त्र या विषयावर तीन ते चार प्रश्न येतात.

  • भौतिकशास्त्र या विषयासाठी आठवी,नववी,दहावी या इयत्तेची विज्ञानाचे पुस्तके वाचले पाहिजेत.

  • होय ! महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये भौतिकशास्त्र या विषयावर एक ते दोन प्रश्न येतात.

  • एमपीएससी (MPSC) PSI/STI/ASO  च्या मुख्य परीक्षेत विज्ञान या विषयावर प्रश्न येत नाही.

Follow us for latest updates