एमपीएससी यूरोपीयनांचे भारतातील आगमन 2021- Arrival of Europeans in India for MPSC in Marathi

By Ganesh Mankar|Updated : October 9th, 2021

Arrival of Europeans in India for MPSC exams / यूरोपीयनांचे भारतातील आगमन 2021: 1453 साली ऑटोमन तुर्कस्तानने बायझेन्टाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टन्टिनोपाल (आताचे इस्तंबूल) हे शहर जिंकल्याने भारत-युरोप यांमधील 'इराणचे आखात-कॉन्स्टन्टिनोपाल-इटली' हा खुष्कीचा व्यापारी मार्ग बंद झाला.परिणामी भारताकडे जाणाऱ्या नव्या व्यापारी मार्गांचा अथवा समुद्रमार्गांचा शोध लावणे युरोपियनांना क्रमप्राप्त ठरले. राज्य सेवा परीक्षेत आणि एमपीएससी कम्बाईन एक्झाम मध्ये या घटकावर प्रश्न येतात. तसेच, पोलीस भरती, आरोग्य विभाग यांसारख्या सर्वच परीक्षांमध्ये भौतिकशास्त्र या विषयांवर प्रश्न येतात. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आजच्या या  लेखात आपण विविध युरोपियनांचे भारतात कशाप्रकारे आगमन झाले ते आता आपण बघणार आहोत.

यूरोपीयनांचे भारतातील आगमन

युरोपियन कंपन्यांच्या स्थापनेचा क्रम

क्रम 

                            युरोपियन कंपन्या

वर्ष 

1

पोर्तुगीज

1498

2

इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी

1600

3

डच ईस्ट इंडिया कंपनी

1602

4

फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी

1664

पोर्तुगीज

 • वास्को द गामा:वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला. तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत या बंदरात 20 मे 1498 रोजी उतरला. कालिकतचा हिंदू राजा झामोरीनने त्याचे स्वागत केले.
 • पोर्तुगीज वसाहती - पश्चिम किनाऱ्यावर कोचीन, गोवा, दमन, चोल (1531), दीव (1532) साष्टी/ सालसेट व वसई (1534) इत्यादी.
 • गव्हर्नर: 1505 ला फ्रान्सिस्को डी अल्मेडा याला भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले. 1509 ला अल्फान्सो डी अल्बुकर्क हा दुसरा गव्हर्नर झाला. त्याने 1510 मधे विजापूरच्या आदिलशाहकडून गोवा जिंकून घेतले.

डच

 • मार्च 1602 मधे हॉलंडमधील काही व्यापाऱ्यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.
 • 1759 मध्ये बेदाराच्या लढाईत डचांचा इंग्रजांकडून पराभव झाला आणि करारानुसार, डचांनी इंडोनेशियावर आणि ब्रिटीशांवर भारत, श्रीलंका आणि मालेवर नियंत्रण मिळवले.
 • वसाहती: त्यांनी 1605 मध्ये मसुलीपट्टनम येथे त्यांचा पहिली वसाहत उभारला. त्यांचे इतर वसाहती पुलीकट, चिनसुरा, पाटणा, बालासोर, नागा पट्टणम, कोचीन, सुरत, कारिकल आणि कासिमबाजार येथे होते.

इंग्रज

 • 1599 मधे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.इंग्लंडची राणी एलिझाबेथने या कंपनीला 31 डिसेंबर 1600 मध्ये सनद देऊन पुढील 15 वर्षांसाठी भारतासहित पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा एकाधिकार दिला.
 • इंग्रजांची भारतातील पहिली वखार 1611 मधे मसलीपट्टणम येथे स्थापन झाली होती.मुघल बादशाह जहांगीरने 1613 मध्ये सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी दिली.
 • इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याचा राजदूत म्हणून 1615 मधे सर थॉमस रो जहांगीरच्या दरबारात आला व तेथे तो 1618 पर्यंत थांबला या काळात अनेक ठिकाणी व्यापारी वसाहती स्थापन करण्याच्या परवानग्या त्याने मिळवल्या.
 • 1717 मध्ये, जॉन सुरमनने फारुखसियारकडून एक फरमान मिळवला, ज्याने कंपनीला मोठ्या सवलती दिल्या.  या फार्मनला कंपनीचे मॅग्ना कार्टा म्हटले गेले आहे.
 • प्लासीची लढाई (1757):  इंग्रजांनी बंगालचा नवाब सिराजुद्दौलाचा पराभव केला.
 • बक्सरची लढाई (1764) : कॅप्टन मुनरोने मीर कासिम (बंगाल), शुजाउद्दौला (अवध) आणि शाह आलम दुसरा (मुघल) यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला.

फ्रेंच

 • 1664 मध्ये फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. फ्रेंचाची भारतातील पहिली वसाहत 1668 मध्ये केरॉन नेमण्यात याने सुरत येथे स्थापन केली. 1669 मध्ये मसलीपट्टणम येथे वसाहत येथे स्थापन केली.
 • 1673 मधे मार्टिन व लेस्पी यांनी वालीकोंडपुरमच्या मुघल गव्हर्नरकडून एक गाव मिळवले हेच गाव पुढे पाँडिचेरी म्हणून विकसित झाले. मार्टिनला पहिला गव्हर्नर नेमण्यात आले.
 • 1690 मध्ये फ्रेंचांनी मुघलांकडून बंगालमधील चंद्रनगर मिळविले. 1725 मध्ये माहे व यानम व 1739  मध्ये कारीकल मिळविले.
 • 1742 मध्ये डूप्ले हा फ्रेंच गव्हर्नर म्हणून भारतात आला.

अधिक माहितीसाठी PDF Download करा,येथे क्लिक करा: 

यूरोपीयनांचे भारतातील आगमन,Download PDF  मराठीमध्ये 

To access the content in English, click here:

Arrival of Europeans in India

Other Important Subject Links

Rock System in Maharashtra for MPSC Study Notes

एमपीएससी संविधानाची ऐतिहासिक उत्क्रांती 2021- Historical Evolution of the Constitution in Marathi

Soil in Maharashtra for MPSC Study Notes

एमपीएससी भारताची किनारपट्टी फॉर पंसक एक्साम 2021- Coastal Plain of India for MPSC in Marathi

एमपीएससी महाराष्ट्रातील प्रशासकीय एकके- Administrative Units of Maharashtra for MPSC in Marathi

महाराष्ट्राचा भूगोल एमपीएससी परीक्षा 2021- Geography of Maharashtra for MPSC in Marathi

Geography of Maharashtra Study Notes for MPSC Exam 2021

एमपीएससी भारतीय राज्यघटनेची निर्मिती 2021- Making of the Indian Constitution for MPSC in Marathi

एमपीएससी संविधानाची ऐतिहासिक उत्क्रांती 2021- Historical Evolution of the Constitution in Marathi

Light Study Notes of Physics for MPSC State Exam 2021

एमपीएससी विद्युतधारा 2021- Current Electricity for MPSC State Exams in Marathi

Current Electricity Study Notes for MPSC State Exam 2021

Sound Study Notes for MPSC State Exam 2021

एमपीएससी ध्वनी 2021- Sound for MPSC in Marathi

एमपीएससी भौतिकशात्रातील काही मूलभूत संज्ञा 2021- Basic Terminologies of Physics for MPSC in Marathi

एमपीएससी भारतातील बेरोजगारी आणि दारिद्रय 2021- Unemployment and Poverty in India for MPSC in Marathi

एमपीएससी महाराष्ट्राची 'जलप्रणाली' 2021- Drainage System of Maharashtra for MPSC in Marathi

एमपीएससी प्रकाश 2021- Light for MPSC State Exam in Marathi

More From Us:

MPSC Current Affairs 2021: Download in Marathi & English

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

NCERT Books for MPSC State Exam 2021

Maharashtra Police Bharti 2021 Exam: Complete Study Material/संपूर्ण अभ्यास साहित्य  

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Posted by:

Ganesh MankarGanesh MankarMember since Aug 2021
Community Manager for Maharashtra State Exams
Share this article   |

Comments

write a comment

FAQs

 • Gradeup is now BYJU'S Exam Prep that offers the most comprehensive preparation for all exams. Get Monthly/Weekly Current Affairs, Daily GK Update, Online Courses, Latest Pattern Test Series and detailed Study Material from the top faculty at your fingertips. Want to learn more? Do not hesitate to contact our customer care here.

 • एमपीएससी (MPSC)च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत इतिहास या विषयावर जवळपास पंधरा ते वीस प्रश्न येतात.

 • एमपीएससी (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षेत इतिहास या विषयावर एकूण पंधरा प्रश्न येतात.

 •  नाही ! एमपीएससी (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षेत फक्त आधुनिक भारताचा इतिहास यावर प्रश्न येतात.

 • होय! महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत दोन ते तीन प्रश्न हे इतिहास या विषयावर येतात.

 • होय! एमपीएससी (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये इतिहास हा विषय असतो. तसेच PSI/STI/ASO मुख्य परीक्षा पेपर 2 मध्ये इतिहासाविषयी असतो.

Follow us for latest updates