hamburger

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 विश्लेषण, Maharashtra Police Bharti Exam Analysis in Marathi

By BYJU'S Exam Prep

Updated on: September 25th, 2023

महाराष्ट्र पोलीस भरती विभागाने रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी ब्रॅडमन या पदासाठी 3 सप्टेंबर 2021 ला परीक्षा घेतली होती.तसेच पुणे,मुंबई.नवी मुंबई,गोंदिया, दौड येथे पोलीस शिपाई पदासाठी 7 सप्टेंबर 2021 ला परीक्षा घेतली होती.आजच्या या लेखात आपण 3 आणि 7 सप्टेंबरला झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे विश्लेषण करणार आहोत. झालेल्या परीक्षेत उमेदवारांना पेपर कसा गेला? तसेच या परीक्षेत कोणत्या घटकावर किती प्रश्न आले? आणि कशा पद्धतीचे प्रश्न आले होते? आणि त्यांची काठिण्यपातळी किती होती? हे सर्व आपण पुढील लेखात बघणार आहोत.

The Maharashtra Police Recruitment Department had conducted the examination for the post of constable for the Navi Mumbai districts on September 22, 2021, and Constable for Pune, Daund, Gondiya, Navi Mumbai, Kohlapur, Ratnagiri, and Mumbai earlier. In this article, we have analyzed the Maharashtra Police Recruitment Examination for its difficulty level. Also how many questions were asked on which section in this exam? And what was the weightage assigned to the various sections such as General Knowledge, Current Affairs, Marathi Grammar, etc. Find the details in the article and also watch the session for free on the Maharashtra Police Bharti Exam Analysis.

Table of content

(more)

Maharashtra Police Bharti Exam Analysis

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 विश्लेषण

नोव्हेंबर 2019  मध्ये 5200 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यात पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलीस पद व पोलीस वाहन चालक यांचा समावेश होता.महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा पहिला पेपर रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एका सत्रात विविध ठिकाणी आयोजित केला होता. आता आपण पुढे या परीक्षेची काठिण्यपातळी कशी होती? तसेच कोणत्या विषयावर किती प्रश्न आले? ते बघणार आहोत.

Applications were invited for 5200 posts. The first paper of the Maharashtra Police Recruitment Examination was conducted in different sessions for students from Ratnagiri and Kolhapur districts and on September 07, 2021, for and Constable for Pune, Daund, Gondiya, Navi Mumbai, and Mumbai districts, for Aurangabad on September 09, 2021, and Mumbai on September 22, 2021. Now, what was the level of rigor of this exam? Also how many questions came upon which topic? Check all the answers below.

Maharashtra Police Bharti 2021: Paper Analysis/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा विश्लेषण 2021:पेपर पॅटर्न 

The important details of the exam based on the question paper are provided here. This will put an end to all the doubts about the exam pattern and changes in the exam.

विभागांची संख्या

3

प्रश्नांची संख्या

100

एकूण गुण

100

नकारात्मक गुणपद्धती

कोणतेही नकारात्मक गुणपद्धती नाही

पर्यायांची संख्या

4

परीक्षा कालावधी

90 मिनिटे

परीक्षेचे स्वरूप

बहुपर्यायी

परीक्षेची भाषा

मराठी भाषा  

\ 

Maharashtra Police Bharti Exam 2021:Exam Difficulty Level/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021: काठिण्यपातळी (3 सप्टेंबर 2021)

We have presented the difficulty level of the Maharashtra Police Bharti Exam 2021 for each section. Candidates can check the section-wise question level in the table. 

September 03, 2021

विषय 

काठिण्यपातळी

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

मध्यम-कठीण

मराठी व्याकरण

सोपे-मध्यम

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

सोपे-मध्यम

परीक्षेची एकूण काठिण्यपातळी

सोपे-मध्यम

Pune (September 07, 2021)

विषय 

काठिण्यपातळी

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

 मध्यम-कठीण

मराठी व्याकरण

 मध्यम-कठीण

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

 सोपे-मध्यम

परीक्षेची एकूण काठिण्यपातळी

 सोपे-मध्यम

Daund (September 07, 2021)

विषय 

काठिण्यपातळी

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

मध्यम-कठीण

मराठी व्याकरण

सोपे-मध्यम

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

सोपे-मध्यम

परीक्षेची एकूण काठिण्यपातळी

सोपे-मध्यम

Mumbai (September 07, 2021)

विषय 

काठिण्यपातळी

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

मध्यम-कठीण

मराठी व्याकरण

सोपे-मध्यम

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

मध्यम-कठीण

परीक्षेची एकूण काठिण्यपातळी

सोपे-मध्यम

Navi Mumbai(September 07, 2021)

विषय 

काठिण्यपातळी

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

मध्यम-कठीण

मराठी व्याकरण

मध्यम-कठीण

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

सोपे-मध्यम

परीक्षेची एकूण काठिण्यपातळी

सोपे-मध्यम

Nagpur (September 07, 2021)

विषय 

काठिण्यपातळी

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

मध्यम-कठीण

मराठी व्याकरण

सोपे-मध्यम

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

मध्यम-कठीण

परीक्षेची एकूण काठिण्यपातळी

सोपे-मध्यम

September 09, 2021

विषय 

काठिण्यपातळी

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

मध्यम-कठीण

मराठी व्याकरण

सोपे-मध्यम

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

मध्यम-कठीण

परीक्षेची एकूण काठिण्यपातळी

सोपे-मध्यम

Navi Mumbai(September 22, 2021)

विषय 

काठिण्यपातळी

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

सोपे-मध्यम

मराठी व्याकरण

सोपे-मध्यम

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

मध्यम-कठीण

परीक्षेची एकूण काठिण्यपातळी

मध्यम-कठीण

उस्मानाबाद (September 23, 2021)

विषय 

काठिण्यपातळी

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

मध्यम-कठीण

मराठी व्याकरण

सोपे-मध्यम

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

मध्यम-कठीण

परीक्षेची एकूण काठिण्यपातळी

मध्यम-कठीण

Maharashtra Police Bharti Exam 2021:Good Attempts/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021: किती प्रश्न सोडवलेत

Maharashtra Police Bharti Exam 2021:Good Attempts/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021: किती प्रश्न सोडवलेत?

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या प्रतिक्रियांवरून तसेच परीक्षेची काठिण्यपातळी आणि परीक्षेचा वेळ या सर्वांवर उमेदवारांनी 90 ते 95 दरम्यान प्रश्न सोडवले असतील तर तो एक चांगला प्रयत्न मानला जाईल.

Based on the feedback received from the students sitting for the exam as well as the level of difficulty of the exam and the timing of the exam, if the candidates have solved the questions between 90 to 95 with about 90% accuracy, it will be considered as a good attempt.

District-wise Good Attempts

District 

Attempt

 रायगड   90-95
 पुणे   91-93
 मुंबई   90-94
 गोंदिया   89-94
 नवी मुंबई   92-94
 दौंड   88-92
 नागपूर   90-94
उस्मानाबाद 88-92

Maharashtra Police Bharti Exam 2021:Questions Marks Weightage/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 : विषय निहाय विश्लेषण 

विषय

प्रश्न संख्या

गुण

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

28

28

मराठी व्याकरण

19

19

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

53

53

 Total

एकूण प्रश्न संख्या: 100

एकूण गुण: 100

 टीप: प्रत्येक प्रश्‍न हा एका गुणांसाठी होता आणि या परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुणपद्धती नव्हती./No negative marking system for this exam.

Pune (September 07, 2021)

विषय

प्रश्न संख्या

गुण

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

28

28

मराठी व्याकरण

19

19

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

53

53

 Total

एकूण प्रश्न संख्या: 100

एकूण गुण: 100

Mumbai (September 07, 2021)

विषय

प्रश्न संख्या

गुण

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

30

30

मराठी व्याकरण

21

21

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

49

19

 Total

एकूण प्रश्न संख्या: 100

एकूण गुण: 100

Navi Mumbai(September 07, 2021)

विषय

प्रश्न संख्या

गुण

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

28

28

मराठी व्याकरण

19

19

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

53

53

 Total

एकूण प्रश्न संख्या: 100

एकूण गुण: 100

Nagpur (September 07, 2021)

विषय

प्रश्न संख्या

गुण

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

28

28

मराठी व्याकरण

19

19

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

53

53

 Total

एकूण प्रश्न संख्या: 100

एकूण गुण: 100

Navi Mumbai(September 22, 2021)

विषय

प्रश्न संख्या

गुण

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

39

39

मराठी व्याकरण

22

22

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

39

39

 Total

एकूण प्रश्न संख्या: 100

एकूण गुण: 100

उस्मानाबाद (September 23, 2021)

विषय

प्रश्न संख्या

गुण

अंकगणित & बुद्धिमत्ता चाचणी

33

33

मराठी व्याकरण

33

33

चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

34

34

 Total

एकूण प्रश्न संख्या: 100

एकूण गुण: 100

Maharashtra Police Bharti Exam 2021:Section-wise Review/ महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021: घटक निहाय विश्लेषण

उस्मानाबाद (23 September 2021)

  1. भारतातील पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारी व्यक्ती
  2. राज्य आणि नृत्य प्रकार जोड्या
  3. जागतिक महिला दिवस
  4. उस्मानाबाद मधून कोणत्या डोंगररांगा जातात
  5. ट्राफिक जंक्शन वर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणत्या रंगाच्या दिव्याचा वापर केला जात नाही
  6. गाडी चालवताना रुग्णवाहिनीच्या सायरन आवाज आल्यास काय करावे
  7. पोलीस निरीक्षक यांचे यांच्या गणवेशात खांद्यावर काय असते
  8. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे
  9. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत
  10. उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही
  11. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण
  12. 2019 मध्ये झालेल्या टोकियो ऑलम्पिक मध्ये भारताला किती पदके मिळाली
  13. महाराष्ट्रामध्ये वाहन चालक परवाना परवाना चाचणीसाठी चालकाला कोणत्या आकाराम मधून गाडी चालवावी लागते
  14. फॉग लाइट केव्हा वापरले जातात
  15. P1/P2 पार्किंग स्कीम म्हणजे काय
  16. रस्त्यावर प्रवास करतांना वाहनांचा अपघात झाला असेल तर जखमींना वैद्यकीय मदतीसाठी साठी कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल
  17. अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत
  18. झेब्रा क्रॉसिंग कशाकरता आखलेली असते
  19. RTO म्हणजे काय
  20. न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम काय
  21. मोटार वाहन कायदा 1988
  22. WHO चे मुख्यालय कुठे आहे
  23. प्रचलित नियमाप्रमाणे तीन मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील उजव्या बाजूची लिंक कशासाठी वापरले जाते
  24. CCTNS चा अर्थ काय
  25. मराठी वृत्तपत्राचे जनक
  26. महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकावर आहे
  27. 2019 क्रिकेट वर्ल्ड कप उपविजेता संघ कोणता
  28. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे
  29. ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती
  30. जेव्हा तुम्ही रस्त्याने जाताना शाळा अगर रुग्णालयाचे चिन्ह पहाल तर काय कराल
  31. दुचाकी वाहनावर दोन पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करीत असल्यास काय करावे
  32. चार चाकी हलके वाहन शिकाऊ चालक परवान्यासाठी किमान वयाची पात्रता किती
  33. आरटीओकडून दिला जाणारा वाहतूक परवाना हा कोणत्या वापरासाठी आहे हे कसे ओळखावे
  34. HSRP म्हणजे काय

Navi Mumbai (September 22, 2021)

  1. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते
  2. ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात
  3. मराठीतील पहिले प्रवासवर्णन ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास पुस्तकाचे लेखक
  4. महाराष्ट्र शासन माहिती अधिकार दिन
  5. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला
  6. शिवाजी महाराजांनी पहिला जिंकलेला किल्ला कोणता
  7. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला
  8. पोलीस हा विषय राज्य घटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट आहे
  9. पिवळा फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात
  10. कोणत्या वर्षाच्या कारकीर्दीत भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्ली येथे नेण्यात आली
  11. जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात  ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते याला कारणीभूत बाब कोणती
  12. जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण?
  13. रस्ता चिन्ह
  14. मोटार वाहन कायदा 1988 कलम 29
  15. मोटार वाहन नियम 1989
  16. मोटार वाहन नियम 1989 नुसार एखादे वाहन नियुक्त केलेल्या पार्किंग जाणे व्यतिरिक्त वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने उभे राहू दिले असेल तर कोणता पोलीस अधिकारी ते वाहन तात्काळ ताब्यात घेऊ शकतात
  17. वाहनचालकांना गॉगलचा वापर केव्हा करू नये
  18. मोटार वाहन नियम 1989 नुसार लोकसेवा वाहनातून नेता येतील अशा व्यक्तींची संख्या मोजताना किती वर्षाच्या आतील बालकास मोजण्यात येत नाही
  19. V.M. संपूर्ण अर्थ काय
  20. B.D  पूर्ण अर्थ काय
  21. मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 113 कशासंबंधी आहे
  22. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 313 अन्वये चालकाने कोणत्या स्थितीत वाहन चालवू नये
  23. मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला वाहन चालवण्यास मानसिक किंवाशारीरिक दृष्ट्या सक्षम नाही वाहन चालवण्याची चिथावणी  देईल तर A हा व्यक्ती कोणत्या कलमान्वये शिक्षेस पात्र राहील
  24. मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये किमान किती कालावधीत हलके वाहनच चालवण्याचे लायसन धारण केल्या केलेली असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला परिवहन वाहन चालवण्याचे चे लायसन देण्यात येत नाही
  25. श्रीवर्धन येथील कोणत्या जातीची सुपारी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे
  26. रस्ता चिन्ह
  27. U.C.C. फुल फॉर्म
  28. मोटार वाहन अधिनियम 1988 च्या तरतुदीनुसार किती वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस कोणत्याही सार्वजनिक जागी कोणतेही परिवहन वाहन चालवता येत नाही
  29. चिन्हाचा अर्थ सांगा
  30. मोटर वाहन नियम 1989 नुसार राज्य परिवहन कडून चालवण्यात येणाऱ्या कोणत्याही परिवहन वाहना मध्ये मालक सोडून गेलेल्या कोणत्याही वस्तूवर हक्क सांगण्यासाठी जास्तीत जास्त किती दिवस मुदत आहे
  31. चिन्हाचा अर्थ
  32. सांगा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला
  33. सावधान करणारे चीन्ह  हे नेहमी कशी असतात
  34. भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झालेल्या देशातील महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील दहाव्या महिला फायटर पायलट कोण ठरल्या आहेत
  35. महाराष्ट्र राज्यातील पन्नासावे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे
  36. प्रकाशवर्ष काय आहे
  37. 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
  38. 2019 ची चौदावी G-20 शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती
  39. 101 वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे

कोल्हापुर जिल्यत पेपर –

आज 3 सप्टेंबर 202021 ला कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा पेपर झाला. झालेला पेपर हा दिलेल्या परीक्षापद्धती पेक्षा खूप वेगळा होता. कारण बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित यांचे मिळून फक्त 28 प्रश्न आले, तर एकट्या सामान्य ज्ञान या विषयावर ते पण 53 प्रश्न आले. तसेच मराठी व्याकरणावर जवळपास 19 प्रश्न आले होते. आता आपण कोणत्या विषयावर कोणत्या घटकावर प्रश्न आलेले आहेत ते पाहूया.

a. सामान्य अध्ययन-

इतिहास:  इतिहास या विषयावर जवळपास चौदा प्रश्न आले आहेत आणि ते सर्वच्या सर्व समाज सुधारक व आधुनिक भारत या विषयावरच आहेत प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत यावर एकही प्रश्न आलेले नाही. 

खालील घटकांवर प्रश्न आलेले आहेत  

  1. इंडियन इंडेपेंडेन्स लीग 
  2. रास्त गुप्ता वर्तमानपत्र
  3.  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
  4.  चवदार  तळे सत्याग्रह 
  5. मराठा वृत्तपत्र 
  6. ‘फ्रंटियर गांधी 
  7. आझाद हिंद सेना
  8.  बंगालची फाळणी 
  9. होमरूल लीग 
  10. सत्यशोधक समाजाची स्थापना 
  11. चले जाव चळवळ 
  12. काँग्रेसमध्ये फूट 
  13. मादाम भिकाजी कामा 
  14. धारासना सत्याग्रह 

राज्यशास्त्र व पंचायत राज:राज्यशास्त्र पंचायत राज या विषयावर जवळपास 10  प्रश्न आले आणि या प्रश्नांचे स्वरूप आता ते अत्यंत सोप्या पद्धतीचे प्रश्न होते. 

खालील घटकांवर प्रश्न आलेले आहेत 

  1. ग्रामसभा
  2.  जिल्हा परिषद
  3.  निवडणूक आयुक्त
  4.  ग्राहक संरक्षण कायदा
  5. राज्यसभेचे सभापती 
  6. ग्रामपंचायतीच्या सचिव 
  7.  एका वर्षातील ग्रामसभा 
  8. संरक्षण दलाचे सरसेनापती 
  9. राज्यसभेचे सदस्य संख्या 

भूगोल :भूगोल या विषयावर महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल अशा दोन्ही घटनांवर प्रश्न विचारले एकूण दहा प्रश्न या विषयावर विचारलेले आहेत. 

खालील घटकांवर प्रश्न आलेले आहेत

  1. पर्वत रांगा 
  2. कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले 
  3. पंचगंगा नदी 
  4. कृष्णा नदी 
  5. कोल्हापूर जिल्ह्यातील धबधबा 
  6. देवस्थान 
  7. व्याघ्र अभयारण्य
  8.  इंद्रावती नदी 
  9. कळसुबाई शिखर
  10.  हेमलकसा स्थळ 

चालू घडामोडी: चालू घडामोडी या विषयावर नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रिडा जगतातल्या घडामोडींवर प्रश्न आलेला आहे. 

खालील घटकांवर प्रश्न आलेले आहेत

  1. टोकियो  ओलंपिक 2020
  2. मीराबाई चानू

b. सामान्य अध्ययन-GK 

या विभागात त्यात मग प्रश्न विचारलेले आहेत. खालील घटकांवर प्रश्न आलेले आहेत

  1. यात कोल्हापूर जिल्ह्यातील राखीव पोलीस दल क्रमांक
  2. कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू 
  3. चेरापुंजी ठिकाण
  4.  चंद्रकांत मांढरे संग्रहालय
  5.  वाऱ्याचा वेग 
  6. सद्भावना दिवस 
  7. चलन 
  8. जागतिक आरोग्य संघटना मुख्यालय
  9. कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा
  10.  बेरुबारी आजार 
  11. आदर पूनावाला 
  12. सध्याचे रेल्वेमंत्री 
  13. इन्सुलिन 
  14. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी
  15.  दाल सरोवर
  16.  आरोग्य विज्ञान विद्यापीठ
  •  ग्राम सभा बोलवण्याची जबाबदारी –
  • महाराष्टरतील जिल्हा परिषदा – 34
  • सागर तळावरील पर्वत रांगा – जलमग्न पर्वत
  • इंडियन इंडिपेडन्स लीग स्थापना – रासबिहारी बोस
  • रास्त गोपतार वृत्तपत्र –  दादाभाई नौरोजी
  • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस स्थापना – अॅलेन ह्युम
  • चवदार तळे सत्याग्रह – बाबासाहेब आंबेडकर
  • निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात ——————राष्ट्रपती
  • ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला सन ————1986
  • कोल्हापूर राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक काय—————–?
  • कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही——————-सिंहगड
  • पंचगंगा व कृष्णा मुद्द्यांचा संगम ——————–नरसिंह वाडी
  • कृष्णा नदीचा उगम——————————— महाबळेश्वर
  • कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे———————–?
  • कोणते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीत————————?
  • ओलंपिक 2020 मध्ये कोणत्या खेळात पदक मिळाले नाही ———-टेबल टेनिस
  • भरतनाट्यम कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे—————तमिळनाडू
  • चेरापूंजी कोणत्या राज्यात आहे ———–मेघालय
  • चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय ———–कोल्हापूर
  • वाऱ्याचा वेग कशात मोजतात ————नॉटस
  • मराठा वर्तमानपत्र भाषा ————इंग्रजी
  • फ्रॉनटीयर गांधी———— खान अब्दुल गफार खान
  • आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यांना काय नाव दिले— शहीद आणि स्वराज्य
  • बंगालची फाळणी कोणी केली ———————लॉर्ड कर्जन
  • होमरूल लीगची स्थापना कोठे केली ———-अड्यार
  • सत्यशोधक समाजाची स्थापना ————महात्मा फुले
  • मीराबाई चानू राज्य——————–मणीपुर
  • सद्भावना जन्मदिवस कोणाचा जन्मदिन ————–?
  • येन चलन———————————-जपान
  • जागतिक आरोग्य संघटना मुख्यालय —————–जिनेवा
  • संरक्षण सेना दलाचे प्रमुख ———————-राष्ट्रपती
  • राज्यसभेचे पदसिद्ध सभापती ——————–उपराष्ट्रपती
  • ग्रामपंचायतीचा सचिव ————————–ग्रामसेवक
  • आर्थिक वर्षात विधानसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक आहे—————?
  • खिद्रापूर देवस्थान———————————–?
  • कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा—————————?
  • सध्याचे रेल्वेमंत्री ——————————–अश्विन वैष्णव
  • CEO आदर पूनावाला ——————सिरम इन्स्टिट्यूट
  • बेरीबेरी आजार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो ————–ब
  • इन्शुलिन संप्रेरक कुठल्या अवयातून होते—————-?
  • कोणते व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील नाही —————–रणथंबोर
  • हेमलकसा कोणत्या जिल्ह्यात आहे ————————-गडचिरोली
  • कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ——————–नाशिक
  • गुप्तवार्ता प्रबोधिनी———————————————–?
  • इंद्रावती नदी कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे————– छत्तीसगड
  • नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनविलेले पोलिसांचे पथक———–?
  • दल सरोवर कोणत्या राज्यात आहे ———–जम्मू काश्मीर
  • आरोग्य विज्ञान विद्यापीठ ——————नाशिक
  • राज्यसभेचे सदस्य संख्या ——————-250
  • सर्वात मोठा ग्रह ——————————गुरु
  • चले जाव चळवळ ——————————1942
  • काँग्रेस फूट लखनऊ ——————————सुरत
  • मादाम भिकाजी कामा भारताचा राष्ट्रध्वज फडकवला ———-स्टुटगार्ट
  • धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजनी ———नायडू

c. मराठी व्याकरण

मराठी व्याकरण या विषयावर जवळपास ते एकोणावीस प्रश्न विचारलेले आहेत.

खालील घटकांवर प्रश्न आलेले आहेत

  1. समास 
  2.  अव्यय 
  3. क्रियापद
  4.  शब्दांची फोड
  5.  योग्य जोडी ओळखा
  6.  शुद्ध शब्द 
  7. शब्दांच्या जाती 
  8. चुकीची जोडी
  9.  समुदाय वाचक शब्द 
  10. अलंकार
  11.  वाक्याचा काळ 
  12.  सामान्य नाम 
  13. शब्दांची जाती 
  14. वाक्यप्रचार 
  15. गटात न बसणारा शब्द 

d. अंकगणित  व बुद्धिमत्ता चाचणी

या विषयावर एकूण 28 प्रश्न आलेले आहेत आणि प्रश्नांचे स्वरूप आता तर हे सोप्या पद्धतीचे प्रश्न होते. 

खालील घटकांवर प्रश्न आलेले आहेत

  1. लांबी रुंदी 
  2. सहसंबंध
  3.  प्रमाण 
  4. गुणाकार
  5.  दिनदर्शिका 
  6. सरासरी वर्ग 
  7. मूळ संख्या 
  8. गुणाकार 
  9. स्थानिक किंमत

गोंदिया/Gondhiya (September 07, 2021)

  1. महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान
  2. कर्करोगासाठी काय वापरतात
  3. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 आली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले
  4. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
  5. इंग्लंड:अटलांटिक महासागर :: ग्रीस: ? महासागर
  6. लोहाचे सर्वात जास्त प्रमाण असणारा धातू
  7. पलामु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे
  8. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात भारतातील मोठा मतदार संघ
  9. भारतातील मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे
  10. भारताचे सरन्यायाधीश रमन्ना यांनी कोणत्या रोजी पदभार स्वीकारला
  11. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक
  12. मेरी कोम कोणत्या खेळाशी संबंधित आहे
  13. जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव
  14. भारतीय राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली
  15. प्रकाशे हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे
  16. गोवा मुक्ती दिन
  17. कागदाचा शोध कोणत्या देशामध्ये लागला
  18. विसंगत घटक ओळखा मीटर, यार्ड, एकर, फर्लांग
  19. विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात
  20. पाणी पंचायत संकल्पना कोणी विकसित केली
  21. आसाम राज्याचे मुख्यमंत्री कोण
  22. विम्बल्डन चॅम्पियनशिप 2019 विजेता खेळाडू कोण
  23. किशोरी अमोंकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायन घराण्या संबंधी आहेत
  24. रोम शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे
  25. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली
  26. कार्बन चे सर्वात कठीण रूप कोणते
  27. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला
  28. नेपाळ चे सध्याचे पंतप्रधान
  29. “कोण ए मेरे वतन के लोगो” गीताचे कवी
  30. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली
  31. रेबीज या आजारात लक्षणे किती दिवसात दिसतात
  32. झोंबि पुस्तकाचे लेखक कोण आहेत
  33. भारतीय हॉकी संघाचे गोलकीपर कोण
  34. पश्चिम बंगालचे सध्याचे राज्यपाल कोण
  35. महाराष्ट्र तंटा मुक्त गाव मोहीम कधी सुरू झाली
  36. सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष
  37. हाय अटीट्युड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे
  38. 1959 मध्ये डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला
  39. युक्रेनची राजधानी
  40. जिम कार्बेट नेशनल पार्क कोणत्या राज्यात आहे

पुणे/Pune (September 07, 2021)

  1. महाराष्ट्र किनारपट्टी प्रकार
  2. कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही
  3. ऑलिव रीडले कशाची जात आहे
  4. भारताचा प्रथम नागरिक कोण
  5. घाटांचा योग्य क्रम
  6. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष
  7. भारतामधील सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे
  8. नाबार्ड कोणाला पतपुरवठा करते
  9. अण्णाभाऊ साठेंची कादंबरी
  10. युनिसेफचे कार्य कशा संबंधित आहे
  11. भारताच्या नियंत्रक आणि महा लेखापरीक्षकाची नियुक्ती कोणाकडून होते
  12. CRPF ची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली
  13. संगणकाची भाषा
  14. द्राक्षांचा प्रकार
  15. देशाची कायदा निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था
  16. राज्यघटनेचे कलम 51A
  17. सीआरपीएफ स्थापना दिवस
  18. P2P चा अर्थ काय होतो
  19. क्योटो करार कशासंबंधी आहे
  20. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या तरतुदीनुसार दाद मागता येते
  21. कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही
  22. राज्य आणि राजधान्या जोड्या
  23. जागतिक चिमणी दिवस
  24. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी कोठे आहे
  25. पोलीस क्षेत्रा संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती
  26. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व जिल्ह्यांच्या जोड्या
  27. LIC संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे
  28. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा धडा कशासंबंधी होता
  29. मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते
  30. भामरागड टेकड्या कोठे स्थित आहेत
  31. SEZ कशा संबंधी आहे
  32. राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली
  33. अमोनियाचे रूपांतर नाइट्रेट मध्ये होणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रियेला काय म्हणतात
  34. कोणते पक्षी अभयारण्य नाही
  35. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशींवर आधारित आहे
  36. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली
  37. मेरी कोम कोणत्या खेळाशी संबंधित आहे
  38. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे
  39. आर्य महिला समाज स्थापना कोणी केली
  40. उच्च दर्जाचे लोखंड निर्मिती साठी कोणता धातु वापरला जातो
  41. भंगडा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे
  42. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो
  43. कोणता हरितगृह वायू नाही
  44. कोणता बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ आहे
  45. चारा चौरी चौरी चौरा घटनेचे घटनेने हे आंदोलन संपुष्टात आले
  46. खालीलपैकी कोणता मालवेअर अथवा व्हायरस नाही

मुंबई/Mumbai (September 07, 2021)

  1. आयर्न मॅन या स्पर्धेत कोणता क्रीडाप्रकार दिसून येत नाही
  2. “हू व्हेअर शुद्रज” ग्रंथ कोणी लिहिला
  3. रक्तक्षय म्हणजे काय
  4. विम्बल्डन 2021 पुरुष एकेरी विजेता
  5. 2021 कुंभमेळा कोणत्या शहरात झाला
  6. ऑगस्ट 2019 पर्यंत भारतात covid-19 च्या किती लाटा आल्या
  7. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले
  8. अफगाणिस्तान देशाची राजधानी
  9. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती
  10. शिवडी-न्हावाशेवा सागरी पूल कोणत्या शहरांना जोडतो
  11. इंडियन प्रीमियर लीग 2020 चे विजेतेपद कोणी जिंकले
  12. खालीलपैकी कोणती कोविड 19 साठी लस नाही
  13. पोलीस पदतालिक योग्य क्रम
  14. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय
  15. चिकन गुनिया होण्यासाठी कारणीभूत घटक
  16. “लेट मी से इट नाऊ “ पुस्तकाचे लेखक
  17. शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे आणणार्‍या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात
  18. कोणता रक्तगट तुरळक आहे
  19. आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी
  20. 3 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो
  21. 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021 ठिकाण कोणते
  22. 2019 टोक्यो मध्ये पार पडलेल्या स्पर्धेत कोणत्या खेळात भारताला पदक मिळाले नाही
  23. औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण
  24. कोणती संघटना महाराष्ट्र पोलीस संबंधित नाही
  25. महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे
  26. “C-60” चे ब्रीद वाक्य कोणते
  27. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक
  28. भिल्ल आदिवासी जमात कुठे दिसून येते
  29. राष्ट्र राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो
  30. 2019 मध्ये कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला
  31. ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणाला ओळखतात
  32. भारताची मध्यवर्ती बँक कोणती
  33. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात
  34. सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे
  35. तंबाखू मध्ये असणारा विषारी द्रव्य कोणते
  36. तोक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर आले
  37. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो
  38. “ग्रे हाऊंड” हे नक्षल विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे
  39. भारताचा राष्ट्रपती राजीनामा कोणाला देतात
  40. कुसुमाग्रज प्रतिष्ठान कडून देण्यात येणाऱ्या जन्मस्थान 2019 चे विजेते कोण
  41. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती का लागतो
  42. 2019 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला
  43. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोण
  44. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे
  45. कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन पाळला जातो
  46. भारतामध्ये करोंना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जाते
  47. वैश्विक द्रावक म्हणून कोणाला ओळखले जाते
  48. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे
  49. राजीव गांधी खेल रत्न अवार्ड चे नाव बदलून काय ठेवण्यात आले
  50. ॲन्टीलिया या प्रसिद्ध निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली

नागपूर/ Nagpur (September 07, 2021)

  1. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत
  2. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत
  3. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत
  4. ऑलम्पिक स्पर्धेत खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही
  5. आर बी आय चे मुख्यालय कोठे आहे
  6. कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही
  7. राज्यसभा किती वर्षांनी बरखास्त होते
  8. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहेत
  9. कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही
  10. भारताचे 48 वे सरन्यायाधीश कोण
  11. 2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार
  12. RT-PCR फुल फॉर्म
  13. परिसीमन आयोगाचे अध्यक्ष
  14. कोणत्या राज्याने विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली
  15. 2021 ओलंपिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली
  16. पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष
  17. पेंच राष्ट्रीय उद्यानाचे नाव
  18. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी झाली
  19. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला
  20. उपराष्ट्रपती हे कशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
  21. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय याची स्थापना कोणी केली
  22. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे
  23. कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे
  24. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला
  25. वर्गिस कुरियन कशासंबंधी आहेत

औरंगाबाद / (September 09, 2021)

  1. महानगरपालिका आयुक्त ला केव्हाही परत बनवण्याचा अधिकार कोणाला असतो
  2. औरंगाबाद शहर काय म्हणून ओळखले जाते
  3. करोंना व्हायरस महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते
  4. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले
  5. मोरचूद रासायनिक सज्ञा
  6. करोंना व्हायरस हे वास्तविक काय आहे
  7. कूफर च्या  पेशी कशात आदळतात
  8. वनस्पतींच्या वाढीसाठी किती अन्नद्रव्यांची आवश्‍यकता असते
  9. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत
  10. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण
  11. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे
  12. पॅथो डिटेक्ट टेस्टिंग किट हे कोणाच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मायला डिस्कवरी सोल्युशन कंपनीने बनवले
  13. जगातील पहिला करोंना पॉझिटिव प्राणी कोणत्या देशात आढळला पाणी
  14. पंचायत संकल्पनेचे जनक
  15. भारताचे पहिले उपपंतप्रधान
  16. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली
  17. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती
  18. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी
  19. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली
  20. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार
  21. सत्यमेव जयते घोष वाक्य कोणी लोकप्रिय केले
  22. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले
  23. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोणी शपथ दिली
  24. एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक
  25. पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पडला
  26. बाल हत्या प्रतिबंध कायदा कधी पास झाला
  27. संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थांच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले
  28. राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला
  29. जागतिक तंबाखू विरोधी दिवस
  30. ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देतो
  31. महानदी हे पुस्तक कोणी लिहिले
  32. महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क सातारा येथे कधी स्थापन केले गेले
  33. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले
  34. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे
  35. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्णमहोत्सव कोणत्या वर्षी झाला
  36. जागतिक पशु दिन
  37. राज्य घटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यता ही प्रथा नष्ट करण्यात आली
  38. 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत
  39. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते
  40. हृदय विकाराचा झटका येऊ नये महणून कोणते औषध वापरतात.
  41. महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली
  42. भारतातील सर्वात नवीन राज्य
  43. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बसले आहे
  44. महिलांवरील हिंसाचार हिंसाचार निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो
  45. लोकसभेचे एकूण सदस्य संख्या
  46. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे
  47. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले
  48. नटसम्राट नाटकाचे लेखक
  49. भारतीय राज्य घटना तयार करण्याचे घटना समितीचे कोण सदस्य नव्हते
  50. जायकवाडी धरणाच्या जलाशयात कोणत्या नावाने संबोधले जाते
  51. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोठे आहे
  52. जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा सूरजकुंड मेळावा कोणत्या राज्यात सुरू झाला आहे
  53. कोणत्या संस्थेने रूग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी संक्रमण विरोधी कापड तयार केले
  54. भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कोठे उभारण्यात आले
  55. ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली
  56. अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली
  57. बर्फ उष्णतेचा ……. आहे
  58. हाडांमध्ये हा तंतुमय घटक असतो
  59. दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट
  60. जागतिक साक्षरता दिन
  61. माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात तारीख
  62. जागतिक जागतिक हिंदी दिवस
  63. करोंना  व्हायरस प्रकार
  64. राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष
  65. चीन बाहेर कोणत्या देशात करोंना मुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली
  66. कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे
  67. संपूर्ण सौर उर्जेवर चालणारे विमानतळ कोणते
  68. करोंना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून कोणी घोषित केले आहे

महाराष्ट्र पोलीस भरती 2021 परीक्षेसंबंधी काही महत्त्वाचे लेख/ Important Links for Maharashtra Police Bharti Exam 2021

Name

Link

Maharashtra Police Bharti Exam 2021 Answer Key/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 उत्तरतालिका

Click here

Maharashtra Police Bharti Exam 2021 Question Paper PDF/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका

Click here

Maharashtra Police Bharti Exam 2021 Expected Cut-Off/महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा 2021 अपेक्षित कटऑफ

Click here

 
Our Apps Playstore
POPULAR EXAMS
SSC and Bank
Other Exams
GradeStack Learning Pvt. Ltd.Windsor IT Park, Tower - A, 2nd Floor, Sector 125, Noida, Uttar Pradesh 201303 help@byjusexamprep.com
Home Practice Test Series Premium