महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती वितरण
महाराष्ट्राचा खूप मोठा भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील प्राचीन खडक हा दाबला गेला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात फारसे खनिज संपत्ती सापडत नाही. एकूण क्षेत्रफळापैकी फक्त बाबी 12.33% क्षेत्रफळात खनिजसंपत्ती सापडते. तसेच महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे वितरण देखील असमान आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 11 जिल्ह्यात खनिजसंपत्ती प्रामुख्याने सापडते. देशातील खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 4.03 टक्के तर देशात महाराष्ट्राचा खनिज उत्पादनात 11 वा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रातील खनिज संपत्ती ची प्रमुख क्षेत्रे
कोकण व दक्षिण महाराष्ट्र: सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड,ठाणे,कोल्हापूर
पूर्व विदर्भ: नागपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,यवतमाळ
महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे विभागीय वितरण
महाराष्ट्रातील प्रमुख साधन संपत्तीचा उत्पादन निहाय क्रम (2017-18 च्या महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालनुसार)
- कोळसा
- चुनखडी
- बॉक्साईड
- कच्चे लोखंड
- कच्चे मॅगनीज
भारतातील एकूण खनिज साठा पैकी महाराष्ट्रातील खनिज साठे निहाय क्रम
अ.क्र. | खनिजे | साठा % |
1 | मॅगनीज | 40 |
2 | बॉक्साईड | 21 |
3 | लोहखनिज | 20 |
4 | क्रोमाइट | 10 |
5 | चुनखडी | 9 |
मॅगनीज
- भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रात मॅगनीजचा 40 टक्के साठा आहे.
- भारतात मॅगनीज चे सर्वाधिक साठे ओरिसा या राज्यात आहे.
- मॅगनीज उत्पादनात भारताचा सहावा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रातील साठे
- भंडारा-तुमसर तालुक
- नागपूर-सावनेर रामटेक तालुका
- सिंधुदुर्ग-सावंतवाडी ,वेंगुर्ला ,कणकवली (फोंडा)
- भंडारा - या जिल्ह्यात सापडलेले मॅंगनीजचे साठे गोंडिटे मालेच्या खडकाशी संबंधित असून ते प्रामुख्याने तुमसर तालुक्यात आढळतात.
- नागपूर - सावनेर तालुक्यातील खापा गावापासून पूर्वेस रामटेक तालुक्यापासून भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यापर्यंत या जिल्ह्यात मॅंगनीज आढळते. हा पट्टा पुढे मध्य प्रदेशात जातो. नागपूर जिल्ह्यातील कंडी, मानसाळ, रामडोंगरी, कोडेगाव, खापा भागात मॅंगनीजचे साठे आढळतात.
- सिंधुदुर्ग - या जिल्ह्यातील सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथे विखुरलेले मॅंगनीजचे साठे आढळतात. याशिवाय कणकवली तालुक्यातही मॅंगनीजचे साठे आढळतात.
लोहखनिज
- महाराष्ट्रात भारतातील एकूण साठ्यापैकी 20 टक्के साठा आहे.
- महाराष्ट्रात लोहखनिज मुख्यतः हेमेटाइट प्रकाराचे आहे.
- महाराष्ट्रात सुरज्यागड, तालुका:एटापल्ली,जिल्हा: गडचिरोली येथे लोहखनिजाची सर्वाधिक साठे आहेत.
महाराष्ट्रातील साठे
- पूर्व विदर्भ: गडचिरोली ,चंद्रपूर ,नागपूर, गोंदिया येथे टॅकोनाईट खडकात लोहखनिज सापडते.
- दक्षिण महाराष्ट्: सिंधुदुर्ग ,कोल्हापूर ,रत्नागिरी ,रायगड येथे जांभा खडकात लोहखनिज सापडते.
- चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील पिपळगाव, भिसी येथे आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील रत्नापूर आणि लोहारडोंगरी येथे लोह खनिजांच्या खाणी आहेत.
- गडचिरोली - गडचिरोली आणि देऊळगाव परिसर लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. उच्च दर्जाचे लोह खनिज येथे मिळते.
- गोंदिया - गोरेगाव तालुक्यात मॅग्नेटाइट प्रकाराचे लोह धातू आढळते. गोंदिया जिल्ह्यातील आग्नेय खडकांमध्ये लोह खनिज आढळते.
- सिंधुदुर्ग - रेंडी, वेंगुर्ला तालुक्यातील आसोली आणि या जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात काही ठिकाणी लोह खनिज साठा आढळतो. रेडीन जवळील टेकड्यांमध्ये दोन किमी लांब लोह खनिज साठा आहे.
कोल्हापूर - या जिल्ह्यातील शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यात लोह खनिजांचे साठे आढळतात.
लोह खनिजाची वैशिष्ट्ये:
- सध्याचे युग हे लोखंडाचे युग असल्याचे म्हटले जाते. विजेचे खांब रेल्वे रेल्वे
- लोह खनिज हे अत्यंत महत्वाचे खनिज आहे. सध्याच्या औद्योगिक युगात या धातूला विशेष महत्त्व आहे. सर्वात लहान टाचेपासून सर्वात मोठ्या मशीनपर्यंत सर्व काही लोखंडापासून बनलेले आहे.
- बांधकामामध्ये लोखंडाचा वापर उल्लेखनीय आहे. या धातूवर विविध कारखाने अवलंबून असल्याने लोहखनिजाला कारखान्यांचा कणा म्हणतात.
बॉक्साईट
- भारतातील 21 टक्के साठे बॉक्साईटचे उत्पादन फक्त महाराष्ट्रात होते.
- जांभा खडकात बॉक्साईट साठा आढळतातआत.
- बॉक्साईटचा उपयोग ॲल्युमिनियम निर्मितीसाठी होतो.
- जगात बॉक्साईटच्या उत्पादनात भारताचा पाचवा क्रमांक लागतो.
- भारतात ओडिशा राज्यात बॉक्साईटचे साठे व उत्पादनात हे राज्य प्रथम आहे.
- महाराष्ट्रात फक्त कोकण मध्ये बॉक्साईटचे साठे सापडतात.
महाराष्ट्रातील साठे
- कोल्हापूर: शाहूवाडी ,राधानगरी ,चंद्रगड तालुके
- रायगड:मुरुड ,रोहा, श्रीवर्धन
- रत्नागिरी: दापोली, मंडणगड,
- सांगली:शिराळा तालुका
- पालघर: तुंगार टेकड्या
- सिंधुदुर्ग :अंबोली घाट
कोल्हापूर - या जिल्ह्यातील शाहूवाडी, राधानगरी आणि चंदनगड तालुक्यात बॉक्साइटचे साठे आढळतात. येथील बॉक्साईट बेळगाव येथील भारतीय अॅल्युमिनियम कंपनीच्या अॅल्युमिनियम कारखान्यात धातू उत्पादनासाठी वापरला जातो.
रायगड - या जिल्ह्यातील बॉक्साईट ठेवी प्रामुख्याने मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन तालुक्यांत केंद्रित आहेत.
ठाणे - जिल्ह्यात सालसेट बेट आणि तुगर हिल्सच्या प्रदेशात बॉक्साईटचा साठा आहे. येथील साठा निकृष्ट प्रकारचा आहे. या भागांव्यतिरिक्त, मुंबई उपनगर (बोरीवली, जोगेश्वरी, गोरेगाव), सिंधुदुर्ग जिल्हा, आंबोली घाट प्रदेश आणि रत्नागिरी जिल्हा (दापोली आणि मंडणगड तालुका) येथे बॉक्साइटचे साठे आढळतात.
चुनखडी
- भारतातील एकूण संख्या पैकी नऊ टक्के साठे महाराष्ट्रात आहेत.
- महाराष्ट्रात भारताच्या एकूण उत्पादनापैकी फक्त दोन टक्के उत्पादन करतो.
- महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे सर्वाधिक साठे आहेत.
- विध्ययन खडकात प्रामुख्याने चुनखडी आढळते.
- चुनखडीचा सिमेंट तयार करण्यासाठी वापर होतो.
- पुणे, धुळे, नंदुरबार, सांगली या जिल्ह्यात कनिष्ठ दर्जाचे चुनखडीचे साठे आहेत.
महाराष्ट्रातील साठे
- यवतमाळ:मांजरी,वांजरी,राजुर
- चंद्रपूर: वर्धा,राजुरा
- नागपूर :रामटेक सावनेर
क्रोमाइट
- महाराष्ट्रात दहा टक्के साठा उपलब्ध आहे.
- सामान्य दर्जाचे क्रोमाइट महाराष्ट्रात आढळते.
महाराष्ट्रातील साठे
- नागपूर:कणकवली
- भंडारा:पवनी
- सिंधुदुर्ग:टंका
दगडी कोळसा
- महाराष्ट्रात दगडी कोळसा चे चार टक्के साठे आहेत.
- महाराष्ट्रात उच्च व मध्यम प्रतीचा कोळसा आढळतो.
- कोळसा उत्पादनात चीन प्रथम क्रमांकावर आहे.
- भारतात झारखंड या राज्यात सर्वाधिक दगडी कोळसा आढळतो.
- भारतात छत्तीसगड या राज्यात सर्वाधिक उत्पादन होते.
- राज्यात वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यात प्रामुख्याने दगडी कोळसा सापडतो.
- राज्यात दगडी कोळसा पूर्व विदर्भातील गोंडवनि खडकात आढळतो.
महाराष्ट्रातील साठे
- चंद्रपूर:बल्लारपूर
- नागपूर:उमरेड
- यवतमाळ:वनी
दगडी कोळशाचे प्रकार:
लिग्नाइट, बिट्युमेनी कोळसा व अँथ्रॅसाइट हे कोळशाचे मुख्य प्रकार मानले जातात.
डोलोमाईट
- महाराष्ट्र डोलोमाईट चे फक्त एक टक्के साठा आहे.
- 90 टक्के डोलोमाईट चे उत्पादन फक्त लोह व पोलाद निर्मिती मध्ये होते.
- डोलोमाईट चे साठे हे सौसर प्रस्तर समूहाशी संबंधित आहे.
- महाराष्ट्रात प्रामुख्याने रत्नागिरी ,यवतमाळ ,नागपूर येथे साठे आढळतात.
कायनाईट
- एकूण महाराष्ट्रात 15 %उत्पादन घेतले जाते.
- उपयोग हि-यांना पैलू पाडण्यासाठी
- राज्यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कायनाईट साठे आढळतात.
बेराईट
- हे खनिज चंद्रपूर जिल्ह्यात आढळते.
- खनिजांचा अंदाजे साठा 1365 दशलक्ष टन आहे.
- हे खनिज प्रामुख्याने तेल विहीर ड्रिलिंग आणि पेंट उद्योगात वापरले जाते.
तांबे
- नागपूर जिल्ह्यात पुलर, तांबेखानी, कोलारी इत्यादी आणि चंद्रपूर जिल्ह्यात तांबे कमी प्रमाणात आढळतात.
- खनिजांचा अंदाजे साठा 708 दशलक्ष टन आहे.
जस्त
- झिंक समृद्ध खनिजे नागपूर जिल्ह्यातील तांबेखानी, कोलारी, भवारी इत्यादी गावांमध्ये आढळतात आणि परिसरात अंदाजे 27 दशलक्ष टन खनिज साठा आहे.
- जस्त गॅल्वनाइझिंग, बॅटरी, मिश्रधातू, रसायने, संरक्षण इत्यादी उद्योगांमध्ये वापरली जाते.
या घटकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, येथे क्लिक करा:
महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती वितरण,Download PDF मराठीमध्ये
Important Subject Links
More From Us:
Maharashtra Static GK
MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English
Important Government Schemes For MPSC
NCERT Books for MPSC State Exam 2022
Maharashtra State Board Books PDF
MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]
Download BYJU'S Exam Prep App

Comments
write a comment