पानिपतची लढाई, त्याचे भौगोलिक आणि भू-राजकीय परिणाम, अफगान-मराठा युद्ध, Battle of Panipat

By Ganesh Mankar|Updated : February 15th, 2022

भारतासाठी डोकेदुखी समजल्या जाणाऱ्या तालिबानने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली आहे. तालिबानने आपल्या सैन्याच्या एका तुकडीला पानिपत असे नाव दिले आहे. तालिबानने भारताला चिडवण्यासाठी हे कृत्य केल्याचं मानलं जात आहे. काबूलहून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तालिबानने नांगरहार प्रांतात लष्कराचे ऑपरेशनल युनिट तयार केले असून, त्याला पानिपत असे नाव देण्यात आले आहे. तालिबान सर्वसाधारणपणे इस्लामिक हे नाव दिते, परंतु अफगाणांच्या शौर्याचे आणि भारताच्या पराभवाचे प्रतीक असलेल्या भारतातील एका जागेवरून तालिबानने आपल्या सैन्य तुकडीचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे तालिबानने या नावाचा वापर भारताला अपवित्र आणि चिथावणी देण्यासाठी केला आहे, असे मानले जात आहे. 

आजच्या या लेखात आपण पानिपतची लढाई याच्याविषयी ची संपूर्ण माहिती घेणार आहोत.  

Download BYJU'S Exam Prep App and prepare General Knowledge for Maharashtra State exams.

Table of Content

पानिपतची लढाई

byjusexamprep

 • पानिपत हा हरयाणातील अवघ्या ५६ चौरस किमीवर पसरलेला एक छोटा जिल्हा आहे, जो करनाल लोकसभा मतदारसंघात येतो. हा जिल्हा हातमागासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. 
 • पण भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. या जिल्ह्यातील युद्धांनी भारताचा इतिहास पूर्णपणे बदलून टाकला. 
 • खरे तर येथे १५२६, १५५६ व १७६१ मध्ये तीन महत्त्वाची युद्धे लढली गेली. 
 • पानिपतच्या पहिल्या लढाईत खुरासनहून आलेल्या बाबराने इब्राहिम लोधीचा पराभव करून भारतावर कब्जा केला. येथूनच भारतातील मुघल राजाची स्थापना झाली. 
 • त्यानंतर ५ नोव्हेंबर १५५६ रोजी पानिपतचे दुसरे युद्ध झाले. ही लढाई सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य, (हेमू) व अकबर यांच्यात झाली. 
 • पानिपतची तिसरी लढाई इ.स. १७६१ साली मराठा सेनापती सदाशिव राव भाऊ यांचे सैन्य आणि अफगाण शासक अहमदशाह अब्दाली यांचे सैन्य यांच्यात झाली. या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. 
 • या युद्धामुळे अफगाणांचा विजय आणि भारताचा पराभव हे चिन्ह आहे, त्यामुळेच तालिबान पानिपतच्या नावाचा वापर भारताला अपभ्रंश करण्यासाठी करत आहे. 

byjusexamprep

पानिपत सैन्य तुकडी चे काम काय असेल?

byjusexamprep

 • तालिबान कडून स्थापित करण्यात आलेल्या पानिपत या लष्करी तुकडी ही तापी (TAPI) गॅस पाईपलाईन च्या संरक्षणार्थ बनवली गेलेली आहे. 
 • जरी याचा उद्देश तापी गॅस पाईपलाईन च्या संरक्षणाचा असला परंतु आंतरराष्ट्रीय संबंधांचे तज्ञ याला भारताविरुद्ध असलेला एक कट म्हणत आहे. 

TAPI पाइपलाइन

byjusexamprep

 • TAPI पाइपलाइन, ज्याला पीस (Peace pipeline) पाइपलाइन देखील म्हणतात, ही 1,814 किमी लांबीची नैसर्गिक वायू पाइपलाइन आहे जी तुर्कमेनिस्तानमधून उगम पावते आणि भारतापर्यंत पोहोचण्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून जाते.
 • तुर्कमेनिस्तानच्या वायू साठ्याचे मुद्रीकरण करणे आणि नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षा सुधारण्यासाठी शेजारच्या देशांना त्यांचा पुरवठा करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.
 • हा प्रकल्प तापी पाइपलाइन कंपनी (टीपीसीएल) या चार वैयक्तिक सरकारी गॅस कंपन्यांनी स्थापन केलेल्या तुर्कमेनगाझ (तुर्कमेनिस्तान), अफगाण गॅस (अफगाणिस्तान), आंतरराज्यीय गॅस सेवा (पाकिस्तान), आणि भारतीय वायू प्राधिकरण आणि इंडियन ऑईल (भारत) यांनी स्थापन केला आहे.
 • पाइपलाइनच्या विकासासाठी या चार देशांनी डिसेंबर २०१० मध्ये आंतरसरकारी करार (आयजीए) आणि गॅस पाइपलाइन फ्रेमवर्क करार (जीपीएफए) वर स्वाक्षऱ्या केल्या.
 • तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत पाईपलाईन ही एक नैसर्गिक वायू पाईपलाईन आहे जी गॅलकिनिश (Galkynysh) - तापी पाईपलाईन कंपनी लिमिटेडने आशियाई विकास बँकेच्या सहभागाने विकसित करणार आहे.

byjusexamprep

 या घटकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:

पानिपतची लढाई, Download PDF मराठीमध्ये

Related Important Articles:

संविधानाची ऐतिहासिक उत्क्रांती

भारताचे राष्ट्रपती

1857 चा उठाव

भारताचा प्राकृतिक भूगोल

शेतकरी उठाव

राष्ट्रीय उत्पन्न

More From Us:

Maharashtra Static GK 

MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English

Important Government Schemes For MPSC 

NCERT Books for MPSC State Exam 2022

Maharashtra State Board Books PDF

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Download BYJU'S Exam Prep App

byjusexamprep Daily, Monthly, Yearly Current Affairs Digest, Daily Editorial Analysis, Free PDF's & more, Join our Telegram Group Join Now

Comments

write a comment

FAQs

 • पानिपतची पहिली लढाई इ.स. 1526 मध्ये इब्राहिम लोधी व बाबर यांच्यात झाली, बाबराने ही लढाई जिंकली.

 • अहमदशाह अब्दालीने पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव केला.

 • 1761 मध्ये मराठा साम्राज्य आणि आक्रमक अफगाणी लष्कर (अहमदशाह अब्दाली) यांच्यात झाला.

 • पानिपतची तिसरी लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी दिल्लीच्या उत्तरेस सुमारे ६० मैल (९५.५ किमी) अंतरावर पानिपत येथे मराठा साम्राज्याच्या उत्तरेकडील मोहिमेची एक फौज आणि अफगाणिस्तानचा राजा अहमदशाह दुर्रानी आणि दोआबचे रोहिला अफगाण आणि अवधचा नवाब शुजा-उद-दौला यांची युती यांच्यात झाली. या युद्धाच्या वेळी बाळाजी बाजीराव हा मराठा शासक होता.

Follow us for latest updates